अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना; मिळवा दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज तात्काळ | Annasaheb Patil Karj Yojana Maharashtra

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील बांधवांना अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना अंतर्गत तात्काळ दहा लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या Annasaheb Patil Karj Yojana Maharashtra अंतर्गत  कर्ज मिळवण्याची प्रक्रिया त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याविषयी विस्तृत माहिती आता आपण जाणून घेऊया.

 

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना annasaheb patil karj yojana  अंतर्गत राज्यातील मराठा बांधवांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याकरिता त्याचप्रमाणे स्वयंरोजगार प्राप्त करण्यासाठी दहा लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज वितरित करण्यात येत आहे. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत कर्ज मिळवण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून संबंधित मराठा समाजातील बांधवांनी लवकरात लवकर कर्ज योजने करिता अर्ज करायचा आहे. या पोस्टमध्ये कर्ज मिळण्यासाठी नोंदणी कशी करायची त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रे यांची सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे annasaheb patil maratha karj yojana

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत ज्या मराठा बांधवांना कर्ज मिळवायचे असतील त्यांच्याकडे खालील कागदपत्र असणे आवश्यक आहे. कागदपत्रांची यादी खाली दिलेली आहे.

1. पॅन कार्ड

2. प्रकल्प अहवाल

3. स्वतःचे आधार कार्ड

4. राशन कार्ड

5. उत्पन्नाचा दाखला

6. व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

7. उद्योग आधार / शॉप ऍक्ट लायसन्स

8. बँक खाते पासबुक

9. पासपोर्ट आकाराचे फोटो

 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत कर्ज कसे मिळवायचे?

मित्रांनो जर तुम्ही मराठा समाजातील असाल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज मिळण्याकरिता अर्ज करायचा असेल तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत कर्ज मिळण्याकरिता तुम्हाला मंडळाच्या अधिकृत साइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. मंडळाच्या ऑनलाइन तर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात याची माहिती तसेच बँकेची माहिती व इतर तपशील सादर करायचा आहे. त्यानंतर अर्ज सबमिट करा योजनेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्याशी संपर्क साधू शकतात.

 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच या वेबसाईटवर जा

 

या योजनेअंतर्गत कोण लाभ मिळवू  शकतो?

या योजनेअंतर्गत मराठा समाजातील कोणताही बेरोजगार तरुण व्यवसायाकरिता कर्ज मिळण्यासाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो.

 

या योजनेअंतर्गत किती प्रकारचे कर्ज मिळते?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तीन प्रकारच्या कर्ज योजना राबविण्यात येत असून यापैकी कोणत्याही योजनेअंतर्गत आपण कर्ज मिळू शकतो. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या कर्ज योजना खालील प्रमाणे आहे.

1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

2. गट कर्ज व्याज परतावा योजना

3. गट प्रकल्प कर्ज योजना

watch video:

 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना(annasaheb patil karj yojana) संदर्भातील ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, या संदर्भात विस्तृत माहिती करिता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती मिळवू शकतात. जर तुम्हाला या कर्ज योजने संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट करून आम्हाला विचारू शकतात. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची आम्ही नक्कीच उत्तर तुम्हाला देऊ. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती करिता दररोज या वेबसाईटवर भेट देत रहा.