अतिवृष्टी अनुदान यादी 2022 महाराष्ट्र | Ativrushti Anudan Yadi 2022 Maharashtra

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली होती. सुरुवातीला पावसाचा खंड सुद्धा पडलेला होता त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वितरित करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनामे करण्याचे काम पूर्ण झालेले असून अतिवृष्टी अनुदान (Ativrushti Anudan) सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान जमा करण्यात आलेले आहे, त्या शेतकऱ्यांची अतिवृष्टी अनुदान यादी सुद्धा प्रकाशित झालेली आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण अतिवृष्टी अनुदान यादी 2022 महाराष्ट्र कशी डाउनलोड करायची? Ativrushti Anudan Yadi 2022 Maharashtra याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 महाराष्ट्र Ativrushti Nuksan Bharpai 2022 Maharashtra

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे या शेतकरी बांधवांची नुकसान झालेले होते व ज्या शेतकऱ्यांची पंचनामे पूर्ण झालेली आहे. अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 महाराष्ट्र (Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2022) अंतर्गत नुकसान भरपाई वितरित करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने या संबंधित महत्वपूर्ण असा शासन निर्णय काढलेला असून त्या शासन निर्णयाच्या आधारे निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे. 

 

अतिवृष्टी अनुदान योजना रक्कम किती मिळणार? Ativrushti Anudan Yojana Maharashtra

शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 महाराष्ट्र(Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2022) अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला 13600 रुपये मिळणार नसून, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात ते पैसे वितरित करण्यात येणार आहे.

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान योजना दुसरी यादी जाहीर. आत्ताच डाऊनलोड करा 

अतिवृष्टी अनुदान कोणत्या शेतकऱ्याला मिळणार?

शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022(Ativrushti Nuksan bharpai 2022) अंतर्गत अतिवृष्टी अनुदान हे ज्या शेतकऱ्यांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान रक्कम जमा होत आहे.

 

अतिवृष्टी अनुदान यादी 2022 डाउनलोड कशी करायची?

शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदान यादी 2022 महाराष्ट्र(Ativrushti Anudan Yadi 2022) नुकतीच जाहीर झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान रकमेचे पैसे जमा झालेले आहे. अशा शेतकऱ्यांची यादी उपलब्ध झालेली आहे. ही यादी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळेल. जसे की जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातील असाल तर गुगलवर अमरावती वेबसाईट हे टाईप करून सर्च करा. त्यानंतर येणाऱ्या ऑफिशियल जाऊन तुम्हाला याद्या डाउनलोड करता येईल.

त्याचप्रमाणे अतिवृष्टी अनुदान यादी 2022 (Ativrushti Anudan Yadi 2022) ही तुम्हाला तुमच्या जिल्हा बँकेमध्ये मिळेल. म्हणजे ज्या जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत, त्या बँकांमध्ये म्हणजेच त्या बँकेतील खात्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे जमा होत आहे. किंवा तुम्ही तलाठी यांना ज्या बँकेतील खाते दिलं होतं त्या बँकेतील शाखेमध्ये तुम्हाला त्या यादी पाहावयाला मिळतील.

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 755 कोटी वितरित

अतिवृष्टी अनुदान यादी दुसरा टप्पा Ativrushti Anudan Yojana

शेतकरी मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यातील काही महसूल मंडळे सुरुवातीला अतिवृष्टीच्या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे अतिवृष्टी अनुदान(Ativrushti Anudan) मिळण्यापासून वंचित राहणार होती. परंतु त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त 755 कोटी रुपये मंजूर केले होते. हा सुद्धा निधी त्या जिल्ह्यातील त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. याच्या सुद्धा याद्या तुम्हाला तुमच्या तलाठी यांच्याकडे उपलब्ध आहे.