अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा 1238 कोटी रुपये निधी मंजूर | Ativrushti Bharpai 2022 Dusra Tappa

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई करिता दुसऱ्या टप्प्याचा निधी वितरित केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने यापूर्वी अतिवृष्टी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करिता निधी वितरित केलेला असून आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टीच्या पहिल्या टप्प्यातून वगळलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्या अंतर्गत बाराशे अडतीस कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. आजच्या पोस्ट मध्ये आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसऱ्या टप्प्यावर Ativrushti Bharpai 2022 Dusra Tappa निधी वितरण संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

आपल्या महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरून काढण्याकरिता म्हणजेच अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याकरिता nuksan bharpai 2022 ही जाहीर करण्यात आलेली होती. या नुकसान भरपाई अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये प्रमाणे रक्कम सुद्धा वितरित करण्यात आलेली असून त्यांची सुद्धा यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. Ativrushti Bharpai 2022 Dusra Tappa

 

परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील असे बरेच शेतकरी होते की ज्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते परंतु त्यांना अतिवृष्टीच्या निकषात बसत नसल्यामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या पहिल्या टप्प्यापासून वंचित रहावे लागले होते. त्यामुळे अशा नुकसान रस्ते शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने हे शेतकरी निकषात बसत नसताना सुद्धा नवीन शासन निर्णय काढून तसेच नवीन निधीची तरतूद करून अतिवृष्टी नुकसान भरपाई(Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) दुसरा टप्पा जाहीर केला होता

मोफत सायकल योजना महाराष्ट्र; मुलींना मिळणार मोफत सायकल

त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (nuksan bharpai list Maharashtra)चे रकमेचे वितरण करण्याकरिता 1238 कोटी रुपये निधी वितरणास मंजुरी सुद्धा दिली होती. अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असून बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या पहिल्या टप्प्या अंतर्गत लाभ मिळालेल्या नसेल तर आता दुसऱ्या टप्प्याचा निधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.

 

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील लाभ देण्याकरिता तलाठी व ग्रामसेवक यांच्या अंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे सुरू असून संपूर्ण याद्या तहसील कार्यालयामध्ये जमा झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.Ativrushti Bharpai 2022

 

नुकसान भरपाई शासन निर्णय आत्ताच पहा- 

अतिवृष्टी नुकसान भरपाई(Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) च्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या 13 हजार 600 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत करण्यात आलेली होती त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना सुद्धा एवढीच रक्कम वितरित करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे 33% किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसऱ्या टप्प्याची रक्कम जमा करण्यात येईल.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा निधी कधी वितरित होणार? Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2nd List

शेतकरी मित्रांनो दुसऱ्या टप्प्याची निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली असून लवकरच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असून लवकरच या याद्या सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येणार आहे.