मित्रांनो ग्रामीण भागात अनेक बचत गट महिला चालवत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगार प्राप्त करावा तसेच छोटा मोठा व्यवसाय किंवा एखादा उद्योग स्थापन करून आपली स्वतःची व आपल्या गटातील महिलांची आर्थिक उन्नती करून घ्यावी याकरिता महाराष्ट्र शासन वेळोवेळी महिला बचत गटांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देत असते. वेगवेगळ्या योजना महिला बचत गटा करिता रामभवन त्यांना कर्ज उपलब्ध करून देत असते जेणेकरून महिला बचत गटाला चालना मिळेल व महिलांना स्वतःचा विकास साधता येईल. आजच्या या पोस्टमध्ये आपण अशाच एका बचत गट महिला समृद्धी कर्ज योजना(Bachat Gat Mahila Samruddhi Karj Yojana) संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
बचत गट महिला समृद्धी योजना 2022 ही आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये राबविण्यात येत आहेत. महिला बचत गटासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजना अंतर्गत बचत गटातील महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून या कर्जाचा वापर त्या महिला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच स्वयंरोजगार प्राप्त करण्यासाठी करू शकतात. त्याचप्रमाणे या योजनेचा उद्देश हा ग्रामीण भागामध्ये महिला बचत गटाचे प्रमाण वाढावे हा सुद्धा आहे. Bachat Gat Karj Yojana महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे जास्तीत जास्त महिला बचत गटाशी प्रोत्साहित होऊन जुळतील हा सरकारचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाबरोबरच केंद्र शासन सुद्धा केंद्रीय महिला व बालविकास विभागातर्फे महिलांकरिता वेगवेगळ्या योजना तसेच कर्ज योजना राबवित असते. बचत गटातील महिलांसाठी केंद्र सरकार वेळोवेळी धोरणे आखत असते.
मित्रांनो महिला नेहमी पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आता आपले वर्चस्व निर्माण करत असून महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळे सरकार सुद्धा वेळोवेळी महिलांसाठी स्वयंरोजगार तसेच कर्ज योजना राबवीत आहे. अनेक प्रकारच्या योजना आहेत ज्या डायरेक्टली महिला बचत गटाला वितरित करण्यात येतात. त्यामुळे आपण पाहत आहोत की आपल्या आजूबाजूला अनेक महिला बचत गट स्थापन होत आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला कर्ज घेऊन आपली दैनंदिन खर्च भागवित आहेत, तसेच कुटुंबाची सुद्धा पोषण करीत आहेत. Bachat Gat Karj Yojana
महिला समृद्धी कर्ज योजना
बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार तसेच व्यवसाय करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने कर्ज उपलब्ध करून देत आहेत. या योजनेअंतर्गत आकारण्यात येणाऱ्या व्याजाचा दर अत्यंत कमी असून दिलेल्या वेळेत कर्जाची परतफेड केल्यास महिला बचत गटांना व्याजावर माफी देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना पन्नास हजार रुपये पर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. जर गटातील महिलांची संख्या जास्त असल्यास कर्जाची रक्कम सुद्धा जास्त असणार आहे. Mahila Bachat Gat Karj Yojana
अशा अनेक योजना राबविण्यात येत असून महिलांना या विषयी माहिती नसल्यामुळे त्यांना लाभ मिळवता येत नाही. परंतु वेळोवेळी अशा योजना बद्दल माहिती मिळाल्यानंतर महिलांनी नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे.
कर्ज योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्रता
मित्रांनो महासमृद्धी महिला बचत गट कर्ज योजना अंतर्गत महिला बचत गटांना कर्ज मिळण्याकरिता खालील पात्रता असणे आवश्यक आहे. Bachat Gat Karj Yojana
- बचत गटामध्ये 75 टक्के महिला या अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असावे.
- बचत गट हा महिलांचा असावा
- बचत गटाच्या नावाची बँक खाते असावी
हे नक्की वाचा:- खरीप पिक विम्याचे बाराशे कोटी या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
योजनेअंतर्गत अर्ज कसा व कुठे करायचा?
मित्रांनो महिला बचत गट योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजना साठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन असून संबंधित बचत गटातील महिलांना अर्ज हा महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामध्ये विहित नमुन्यासहित व आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करायचा आहे.
Mahila Bachat Gat Yojana संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.