कार इन्शुरन्स म्हणजे काय आहे? कार इन्शुरन्स चे प्रकार | Car Insurance Information In Marathi

मित्रांनो कार हे चार चाकी वाहन असून याची किंमत जास्त असते, म्हणजेच हे महागडी वस्तू आहे. एक सर्वसामान्य माणूस त्याच्या मनातील स्वप्न पूर्ण करून एक महागडी कार खरेदी करतो. तेव्हा त्याची स्वप्न पूर्ण झालेली असली तरी सुद्धा त्या कारचा अपघात झाल्यास एवढ्या मोठ्या महागड्या कार चे पूर्णतः नुकसान होऊ शकते. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीचा विमा काढत असतो, त्याचप्रमाणे कारचा सुद्धा विमा काढण्यात येत असतो. त्यामुळे आपण आपल्या कारचा विमा काढणे महत्त्वाचे आहे. आज काल एक्सीडेंट चे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. त्यामुळे आपल्या वाहनांना व आपल्याला सुरक्षा कवच म्हणून कार इन्शुरन्स हा प्रत्येकाने काढलाच पाहिजे. आजच्या या पोस्टमध्ये आपण कार इन्शुरन्स म्हणजे काय आहे? कार इन्शुरन्स चे प्रकार कोणते आहेत? याविषयी विस्तृत माहिती Car Insurance Information in Marathi जाणून घेणार आहोत. 

 

मित्रांनो फक्त कारचाच नाहीतर, आपण घेतलेल्या प्रत्येक वाहनांचा विमा काढला पाहिजे. कार इन्शुरन्स Car Insurance Mahiti Marathi काढल्यामुळे आपण होणाऱ्या नुकसानी पासून सुरक्षा कवच मिळवू शकतो. जर एखादी दुर्घटना घडली, तर आपण विमा कंपनीकडे दावा दाखल करून नुकसान भरपाई मिळवू शकतो. तर चला जाणून घेऊया कार इन्शुरन्स विषयी संपूर्ण माहिती car insurance information in marathi.

कार इन्शूरन्स म्हणजे काय आहे? What is car insurance in Marathi

मित्रांनो कार इन्शुरन्स(Car Insurance) म्हणजे हे आपल्या कार साठी एक विमा कवच आहे. ज्यामुळे त्या कारच्या मालकाला आर्थिक संरक्षण प्राप्त होते. आपण घेतलेला वाहनांना अनेक प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागतो. जसे की अपघात होणे, आपले वाहन चोरी जाणे, वाहनांना आग लागणे, गाडीचे पार्ट चोरीला जाणे तसेच पाण्यापासून वाहनांना धोका निर्माण होणे. अशा अनेक बाबींपासून संरक्षण आपल्याला कार इन्शुरन्स प्रदान करते. वरील सर्व बाबी कार इन्शुरन्स मध्ये समाविष्ट असल्यामुळे जर आपल्या कारला वरीलपैकी कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून आपल्याला आर्थिक संरक्षण प्राप्त होते. अशा प्रकारचा कुठलाही अपघात झाल्यास आपण आपल्या वाहनाला तसेच आपल्याला होणारे मोठे नुकसान टाळू शकतो.

 

कार चा इन्शुरन्स काढणे बंधनकारक आहे का? is car insurance mandatory?

आपल्या भारत देशामध्ये कारचा इन्शुरन्स काढणे, हे बंधनकारक नाही. तरीसुद्धा आपण आपल्या सुरक्षेच्या तसेच आपल्या वाहनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या कारचा इन्शुरन्स काढणे आवश्यक आहे.

कार चा इन्शुरन्स का घेतला पाहिजे? Why should you take car insurance?

आपण कार इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती (Car Insurance Information in Marathi) जाणून घेत आहोत. आता आपण कारचा विमा का काढला पाहिजे? याविषयी माहिती जाणून घेऊया. खाली दिलेल्या पॉईंटच्या माध्यमातून तुम्हाला कारचा इन्शुरन्स का काढला पाहिजे, याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

1. अपघातामुळे कारचे झालेली नुकसान भरून काढण्याकरिता.

2. आपण पाहिलेले कार घेण्याची स्वप्न हे धुळीत मिळू नये म्हणून.

3. कार इन्शुरन्स काढल्यामुळे विमाधारक व्यक्तीला आर्थिक संरक्षण प्राप्त होते.

4. कार इन्शुरन्स घेतल्यामुळे जीवितहानी आणि मालमत्ता नुकसानीसाठी संरक्षण प्राप्त होते.

5. आपल्या वाहनांवर येणाऱ्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटांपासून सुरक्षा मिळते.

6. आपल्या कारचा कार इन्शुरन्स असल्यास आपल्याला विमा कवच प्राप्त असल्यामुळे, कारचे नुकसान होण्याची काळजी संपते.

 

कार इन्शुरन्स चे प्रकार कोणते आहेत? Types of car insurance in Marathi

कार इन्शुरन्स चे तीन प्रकार आहेत. आता आपण Types of car insurance in Marathi जाणून घेऊया. कार इन्शुरन्स चे खालील प्रकार पडतात.

 

1. Third-Party Insurance

कार इन्शुरन्स चा हा पहिला प्रकार आहे. हा एक थर्ड पार्टी कार इन्शुरन्स असून या इन्शुरन्स मध्ये मोजक्या प्रमाणात विमा कवर होतो. थर्ड पार्टी कार इन्शुरन्स च्या माध्यमातून तिसऱ्या पक्षाला मालमत्ता आणि व जीवित हानी करीता संरक्षण मिळत असते. Third-Party Insurance काढल्यानंतर स्वतःच्या वाहनाला किंवा जीवित हानी किंवा मालमत्तेला संरक्षण मिळत नसते. कारण की हे थर्ड पार्टी विमा आहे.

 

2. Comprehensive Insurance

कार इन्शुरन्स हा एक दुसरा आणि महत्त्वपूर्ण असा प्रकार आहे. Comprehensive Insurance ला आपल्या मराठी भाषेत सर्वसमावेशक विमा असे म्हणतात. हा एक कारचा संपूर्ण विमा असून या विम्या मध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी कव्हर होतात, तसे त्यांच्यापासून संरक्षण प्राप्त होते. जर आपल्या वाहन मुळे समोरच्या व्यक्तीचं किंवा त्यांच्या वाहनाचे नुकसान झाल्यास त्यांना देखील गरजेपुरते संरक्षण या सर्व समावेशक विमा अंतर्गत प्राप्त होते. Comprehensive Insurance च्या माध्यमातून वाहनधारकास त्यांच्या अपघात झालेल्या कारचे नुकसान भरपाई तसेच त्यांच्या झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा दवाखान्याचा खर्च याचे सुद्धा प्रावधान आहे. सर्व समावेशक विमा मध्ये संपूर्ण बाबींकरिता नुकसान भरपाई मिळते जसे की नैसर्गिक आपत्ती येणे त्यामध्ये पूर असेल, भूकंप होणे, जाळपोळ होणे, दंगली होणे व सुनामी होणे अशा प्रकारच्या गोष्टींचा सुद्धा समावेश या विम्यामध्ये आहे.

Comprehensive Insurance चे फायदे

Comprehensive Insurance हा एक सर्वसमावेशक विमा असून, या विमा मध्ये अनेक बाबी कव्हर केल्या जातात. या सर्व समावेशक विम्याचे खालील फायदे आहेत.

या Comprehensive Insurance मध्ये विमाधारकास कायदेशीर बाबी उद्भवल्या नंतर खर्च मिळवण्याचे प्रावधान आहे. या विमा अंतर्गत विमाधारकास अपघात झालेल्या वाहनाची नुकसान भरपाई तसेच वाहन मालकाची सुद्धा नुकसान भरपाई मिळते. या विमा अंतर्गत मानवनिर्मित अपघात तसेच नैसर्गिक अपघात यांच्यापासून संरक्षण मिळते.

 

3. ऍड ऑन इन्शुरन्स Add-on Insurance Covers

कार इन्शुरन्स मधील हा एक तिसरा आणि महत्त्वपूर्ण असा विम्याचा प्रकार आहे. हा एक ॲड ऑन इन्शुरन्स प्रकार आहे. यालाच रायडर विमा म्हणतात. वरील दोन्ही विम्याच्या प्रकारा व्यतिरिक्त हा एक महत्त्वाचा व वेगळा असा विम्याचा प्रकार आहे. हा विमा म्हणजे समजा तुमची कार रस्त्यावर बंद पडली तर त्यावेळेस कार इन्शुरन्स कंपनी कंपनीतर्फे तुमच्या कारच्या जागी येऊन तुमची कार दुरुस्त करून देते. जर तुमच्या कारचे इंजिन खराब झाली, तर कार इन्शुरन्स कंपनी ते बदलून देते. याकरिता तुम्हाला या Add-on Insurance प्रकारात त्या गोष्टी समाविष्ट कराव्या लागतात.

हे नक्की वाचा:- GDP म्हणजे काय? माहिती मराठी

कार इन्शुरन्स करिता आवश्यक कागदपत्रे Documents required for car insurance

आपल्या भारत देशामध्ये कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कारचा कार इन्शुरन्स car insurance in Marathi काढण्याकरिता खालील कागदपत्रे लागतात.

1. ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड

2. रहिवासी दाखला

3. गाडीचे आरसी बुक

4. आधार कार्ड

5. पासपोर्ट साईज चे फोटो

वरील कागदपत्रे कार इन्शुरन्स काढण्याकरिता आवश्यक आहेत.

 

कार इन्शुरन्स काढताना घ्यावयाची काळजी

मित्रांनो आपल्याला आपल्या कारचा इन्शुरन्स काढत असताना खालील बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, तसेच खालील बाबींची काळजी घ्यावी.

1. आपण आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे कार इन्शुरन्स घेतला पाहिजे.

2. कार इन्शुरन्स घेण्यापूर्वी आपण जो कार इन्शुरन्स घेणार आहोत, त्या कार इन्शुरन्स मध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट होतात हे माहिती करून घ्यावे नंतरच कार इन्शुरन्स घ्यावा.

3. आपल्याला जो कार इन्शुरन्स आवश्यक आहे तोच घ्यावा, इतरांच्या कार इन्शुरन्स बरोबर तुलना करू नये.

4. कार इन्शुरन्स घेण्याच्या वेळेस रोड साईट,पर्सनल अकॅसिडेंट , असिस्टंट, अशा बाबी कव्हर होईल, असाच कार इन्शुरन्स सहसा निवडावा.

5. कोणताही कार इन्शुरन्स घेण्यापूर्वी त्या कार इन्शुरन्स बद्दल तसेच कार इन्शुरन्स पुरवणाऱ्या त्या कंपनी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यावी.

हे नक्की वाचा:- Hosting म्हणजे काय? Hosting चे प्रकार कोणते?

कार इन्शुरन्स काढण्याची प्रोसेस कशी आहे?

कार इन्शुरन्स हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटवर जाऊन अप्लाय करून काढता येतो, तसेच आपण ऑफलाइन सुद्धा कार इन्शुरन्स काढू शकतो.

कार इन्शुरन्स संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही माहिती महत्त्वपूर्ण वाटत असल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा.