पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (चारित्र्य प्रमाणपत्र) असे काढा ऑनलाईन character certificate maharashtra

मित्रांनो विविध शासकीय फॉर्म भरण्याकरिता तसेच नोकरी करिता व परदेशात स्थलांतर करण्यासाठी आपल्याला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट ( चारित्र्य प्रमाणपत्र ) सादर करावे लागत असते. तसेच जर तुम्हाला एखादी शासकीय किंवा निम शासकीय जॉब करायची असल्यास तुम्हाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच चरित्र सर्टिफिकेट(character certificate) मागितली जाते. त्यामुळे हे महत्त्वपूर्ण असलेले पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढायचे? याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे Required Documents For Character Certificate

खालील कागदपत्रे आपल्याला चारित्र्य प्रमाणपत्र Character Certificate Online Maharashtra काढण्याकरिता आवश्यक आहे.

1. टीसी

2. जन्म दाखला

3. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा ड्राइविंग लायसन्स

4. रेशन कार्ड किंवा पासपोर्ट

5. कंपनी लेटर

वरील कागदपत्रासहित आपल्याला ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज करून पोलीस स्टेशनमध्ये फॉर्म सबमिट करा.character certificate online maharashtra

 

पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (चारित्र्य प्रमाणपत्र) ऑनलाइन काढण्याची प्रोसेस How to Apply For Character Certificate online

चारित्र्य प्रमाणपत्र ऑनलाईन(Character Certificate online) पद्धतीने काढण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.

1. चरित्र प्रमाणपत्र ऑनलाइन (Character Certificate online Process Maharashtra) करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्राच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.

2. खाली दिलेली वेबसाईट तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये ओपन करून घ्या. चारित्र्य प्रमाणपत्र काढण्यासाठी ही ऑफिशियल वेबसाईट आहे.

वेबसाईट:- https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx

3. ही वेबसाईट तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये ओपन केल्यानंतर आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे, त्याकरिता रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.

4. आता तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

5. आता तुम्ही लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला सर्विस या टॅब वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Character Certificate या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

6. आता तुम्हाला विचारलेली व्यवसाय आणि शिक्षण विषयक माहिती प्रविष्ट करा त्यानंतर नेक्स्ट पर्यावर क्लिक करा.

7. त्यानंतर सामान्य माहिती प्रविष्ट करा नंतर नेक्स्ट करा.

8. आता तुम्हाला पोलीस स्टेशनची माहिती प्रविष्ट करायची आहे. माहिती प्रविष्ट केल्यानंतर नेक्स्ट करा.

9. आता तुम्हाला तुमच्या स्वतःचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावयाची आहे. ती अपलोड करून घ्या.

10. तुम्हाला वर दर्शवलेली कागदपत्रे अपलोड करायची आहे. तुम्ही जी कागदपत्रे अपलोड करणार आहात त्या नावासमोर टिक करून ती कागदपत्रे अपलोड करून घ्या.

11. त्यानंतर ‘Continue’ वर क्लिक करून ‘NEXT’ वर क्लिक करा व तुम्ही भरलेला अर्ज बरोबर आहे की नाही तो चेक करून घ्या.

12. आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यामुळे तुम्हाला फी पेड करावयाची आहे. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरू शकता. त्यानंतर पेमेंट करून घ्या.

13. तुम्ही तुमचे पेमेंट यशस्वी केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट रिसिप्ट प्राप्त होईल. आता तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर म्हणजेच एप्लीकेशन आयडी हा सेव करून घ्यायचा आहे. किंवा त्याची प्रिंट काढून घ्या.

14. त्याचबरोबर तुम्ही केलेल्या अर्जाची सुद्धा प्रिंट करून घ्या.

15. आता तुम्ही भरलेला एप्लीकेशन ची प्रिंट घेऊन तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तो फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमच्या अर्जाची CFS द्वारे पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर करण्यात येईल.

 

अशाप्रकारे आपण घरबसल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या साह्याने पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र म्हणजेच चरित्र दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो.