तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ते असे चेक करा | Check how many SIM cards are in your name

मित्रांनो आपण आपल्या नावावर आधार कार्ड च्या माध्यमातून नवीन सिम कार्ड घेत असतो. सिम कार्ड हे एक महत्त्वाची वस्तू असून ते एक डिजिटल साधन आहे. आजच्या काळात अनेक फसवणुकीच्या घटना या सिम कार्ड द्वारेच होत आहेत. त्यामुळे सिम कार्ड एक महत्त्वाचे साधन असून बरेच व्यक्ती त्याला ऑनलाइन फसवणुकीचे साधन बनवत आहे. त्यामुळे तुमच्या नावावर एखाद्या व्यक्तीने लपून चुकून सिम कार्ड रजिस्टर केलेले आहेत का? हे आपल्याला चेक करता येते. जर आपल्या नावावर आपण वापरत नसलेले सिम कार्ड रजिस्टर असेल Check how many SIM cards are in your name तर ते आपण ऑनलाइन बंद करू शकतो त्याची माहिती काढू शकतो. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत ते चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो ऑनलाईन गुन्हे करणारे व्यक्ती नवीन लोकांना फसवण्याकरिता विविध प्रकारचे प्रयत्न करतात त्यामध्ये खास करून जास्तीत जास्त प्रयत्नही सिम कार्ड च्या माध्यमातून करण्यात येतात. आपले संपूर्ण बँकेची माहिती तसेच इतर सर्व माहिती आपल्या सिम कार्ड सोबत मोबाईल नंबर ला लिंक असते. अनेक वेळा बँकेचे मेसेज बँकेचे ओटीपी आपल्याला आपल्या सिम कार्ड वर प्राप्त होत असतात. जर आपले सिम कार्ड जे आपल्या नावावर असून इतर व्यक्ती वापरत असेल तर त्याचा गैरफायदा सहज घेता येतो. त्यामुळे आपल्या नावावर एकूण किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. Check how many SIM cards are in your name

 

आपले सिम कार्ड बँकेसोबत लिंक असल्यामुळे बँकेतील रक्कम काढण्याकरिता सिम कार्डचा वापर केल्या जाऊ शकतो. आपल्या सिम कार्ड मुळे बँकेला एक्सेस मिळते व बँकेतील व्यवहार करता येते. त्यामुळे तो सिम कार्ड चा नंबर आपण बँकेसोबत दिलेला आहे तो नेहमी आपणच वापरला पाहिजे.

हे नक्की वाचा : sip म्हणजे काय ? sip कशी करायची?

या सर्व गोष्टींना आळा घालण्याकरिता शासनाच्या वतीने नागरिकांना त्यांच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच नागरिकांना जर एखादी सिम कार्ड त्यांच्या नावावर दिसले परंतु ते स्वतः वापरत नसेल किंवा इतर कोणी वापरत असेल त्या व्यक्तीला माहीत नसेल तर ते सिम कार्ड आपण बंद सुद्धा करू शकतो. याकरिता शासनाने एक नवीन वेबसाईट तयार केलेली असून त्यावर आपल्याला सर्व माहिती मिळवता येते.Check how many SIM cards are in your name

 

 

आपल्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत ते चेक करण्याची प्रोसेस The process of checking how many SIM cards are registered in your name

मित्रांनो आपल्याला आपल्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत ते पाहण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

1. सर्वप्रथम सरकारच्या वतीने सिम कार्ड चेक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटवर तुम्हाला जायचे आहे.

2. सिम कार्ड चेक करण्याची वेबसाईट-

3. आता त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर हा ऑप्शन दिसत असेल त्यामध्ये तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेला कोणताही मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी प्रविष्ट करा.

4. आता तुम्हाला खाली ओटीपी सेंड करा या पर्यायावर क्लिक करून तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवायचा आहे.

5. आता तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी आलेला आहे तो त्या ठिकाणी प्रविष्ट करा.

6. आता तुमच्यासमोर तुमच्या नावावर एकूण किती सिम कार्ड रजिस्टर आहेत याची संपूर्ण माहिती आलेली आहे. तसेच जेवढे सिम कार्ड रजिस्टर आहेत तेवढे नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल.

7. आता जर यापैकी तुमच्या एखादा नंबर ओळखीचा नसेल परंतु तो तुमच्या नावावर असेल तर तो तुम्हाला ऑनलाईन बंद करता येतो.

8. त्या ठिकाणी नंबर बंद करा हा पर्याय तुम्हाला दिसत असेल त्यावर क्लिक करून आपल्याला जो नंबर बंद करायचा आहे तो बंद करू शकतो.

अशाप्रकारे आपण आपल्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहे त्याची माहिती काढून जर सिम कार्ड बंद करायची असेल तर ते बंद करू शकतो.