कापसाचा भाव वाढणार, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सध्याची कापसाची परिस्थिती जाणून घ्या | Cotton Market Rate

कापसाचा भाव वाढणार, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सध्याची कापसाची परिस्थिती जाणून घ्या | Cotton Market Rateकापसाची मुख्यता विदर्भ आणि मराठवाडा आणि खानदेश या ठिकाणी लागवड बघावयास मिळते. येथील शेतकऱ्यांचा मुख्यतः शेतीतील पीक म्हणजे कापूस तसेच कापसाला आता भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे एक अर्थकारणासाठी मोठी समस्या कोलमडून पडलेली आहे, राज्यांमध्ये खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात शेती होत असते,त्याचप्रमाणे या दोन पिकांना चांगला भाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते,परंतु कापसाचा भाव अपेक्षेपेक्षाही कमी असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे एक मोठी समस्या उभी राहिलेली आहे

 

त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कापूस या पिकावर ज्याप्रमाणे त्यावर खर्च करावा लागतो तसा भाव मिळत नाही,व नाफ्या ऐवजी त्यांच्या पदरी तोटाच येतो, तसेच कापूस लागवडी झाल्यानंतर कापसावर वेगवेगळ्या किटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. व या कीटकांमुळे विविध प्रकारचे त्वचारोग होण्याची संभाव्यता आहे,तसेच शेतकऱ्यांनी कापसाला योग्य तो भाव मिळावा यासाठी कापूस साठवून ठेवलेला आहे. कापसाची साठवणूक केल्यामुळे कापसाच्या संपर्कात शेतकरी येतात त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे त्वचारोग होण्याची शक्यता आहे , त्यातील एक म्हणजे खाज सुटणे, अंगावर पुरळ येणे अशा विविध प्रकारचे त्वचारोग होण्याची संभाव्यता आहे; त्यामुळे शेतकऱ्यांना जरी वाटत असले की त्यांनी हमीभाव मिळवण्यासाठी कापसाला घरामध्ये साठवून ठेवावे, तरीसुद्धा त्यांना कापूस साठवून ठेवणे शक्य होताना दिसत नाही.

 

जरी शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवलेला आहे, तसेच कापूस साठवून ठेवल्यामुळे कापसाच्या वजनामध्ये घट होते व कापसाचे वजन कमी होण्यास स्थिती निर्माण होते. त्याचबरोबर कापसातील असलेल्या कीटकांमुळे कापसाचा दर्जा खालावतो त्यामुळे कापसाच्या कॉलिटी मध्ये कमीपणा जाणवतो.

 

कापूस दर वाढण्यासाठी पोषक स्थिती निर्माण

कापूस वायद्यावरील बंदी चालू महिन्यामध्ये हटवण्यात यावी, यासाठी शासनाकडून निर्णय घेण्यात येणार तसेच कापूस दरवाढीसाठी पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तज्ञ लोकांनी सुद्धा कापूसाच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता दर्शवलेली आहे;त्यामुळे कापसाच्या दरामध्ये वाढ होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण झालेली आहे.

 

कापसाची निर्यात होण्याची शक्यता

त्याचप्रमाणे कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता यामुळे दर्शविण्यात आलेली आहे,की कापसाची निर्यात बांगलादेशमध्ये सुरळीतपणे सुरू झालेली आहे; भविष्यामध्ये बांगलादेशमध्ये निर्यात वाढणार. इतर देशांमध्ये ही निर्यात करण्यात येणार त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीमध्ये चांगला फायदा होणार आहे, त्याचप्रमाणे निर्यात झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाचा भाव वाढणार आहे. जो देश कापसाचा सर्वात मोठा ग्राहक देश आहे तो देश म्हणजेच चीन. चिनी देखील भारताकडून कापूस खरेदी करण्यासाठी तयारी तयार आहे.

 

शेतकऱ्यांना या योजने मार्फत कमी व्याज दरात मिळतय कर्ज; आता वेळेत आणि गरजेनुसार कर्ज मिळणार; जाणून घ्या कर्ज मिळवण्याची प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे 

 

सरकारकडून कापसाच्या आयातीवर 11 टक्के शुल्क आकारला

शासनाने कापसाच्या आयातीवर अकरा टक्के शुल्क आकारल्यामुळे कापसाच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मध्यंतरी सरकारच्या माध्यमातून हे शुल्क माफ केले होते.व या शुल्कामुळे मध्यंतरी भारतामध्ये कापसाच्या आयातीमध्ये वाढ होत असल्याचे आढळते; परंतु शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे की कापसाच्या आयातीवर अकरा टक्के शुल्क आकारण्यात यावा. यामुळे कापसाच्या दरामध्ये वाढ होण्याची तसेच कापूस वाढण्याची पोषक स्थिती निर्माण होत आहे.

सातबारा उताऱ्यात झाले 11 महत्वपूर्ण बदल; जाणून घ्या नवीन सातबारा कसा आहे, कोणते बदल झालेत 

सध्याचे कापसाचे भाव

आता कापसाला साधारणतः 7500 ते 8000 दरम्यान प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळत आहे, त्याचप्रमाणे काही ठिकाणी भावामध्ये चढ-उतार होत असल्याचे दिसून येते,तसेच काही ठिकाणी आठ हजारापेक्षाही जास्त भाव मिळत असल्याचे दिसते परंतु आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणारी बातमी ही आहे की त्यांना आता चांगला भाव मिळणार आहे;असे तज्ञांनी दरवाढीचा अंदाज बांधलेला आहे.

Leave a Comment