दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना; जमीन खरेदी 100% अनुदान | Dadasaheb Gayakwad Sabalikaran Swabhiman Yojna

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने जमीन खरेदी करण्याकरिता 100% अनुदान देणारी महत्त्वपूर्ण अशी दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आपण शेतजमीन खरेदी करू शकतो व त्याचा संपूर्ण खर्च शासनाच्या वतीने करण्यात येईल. जमीन खरेदी करण्याकरिता शंभर टक्के अनुदान पुरवणाऱ्या या dadasaheb gaikwad sabalikaran yojana अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार तसेच अर्ज कोठे करायचा? या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

शेतकरी मित्रांनो आपले महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतजमीन नसलेल्या शेतकऱ्यांकरिता त्यांना शंभर टक्के अनुदानित तत्त्वावर शेत जमिनीचे वाटप करत आहे. मित्रांनो आजच्या काळात ज्यांच्याकडे जमीन नाही ते स्वतःहून जमीन खरेदी करू शकत नाही कारण की पूर्वीला 50 ते 60 हजार रुपये एकराप्रमाणे येणारी जमीन आज दहा ते पंधरा लाख रुपये एकर झालेली आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटक तसेच आर्थिक दृष्ट्या मागासलेली व्यक्ती आजच्या काळात नवीन जमीन खरेदी करू शकत नाही. त्यामुळे अशा नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाह करिता कोणतेही साधन नसल्यामुळे सरकार त्यांना जमीन खरेदी करण्याकरिता dadasaheb gaikwad sabalikaran yojana 2022 अंतर्गत 100 टक्के अनुदान वितरित करीत आहे.

 

शासनाच्या या दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना (dadasaheb gaikwad sabalikaran yojana) अंतर्गत आपण पात्र असल्यास हे जमीन खरेदी करून त्यावर शंभर टक्के अनुदान मिळवून ती जमीन मोफत मिळवू शकतो.

 

दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत कोण लाभ मिळवू शकतो? dadasaheb gaikwad sabalikaran yojana

शेतकरी मित्रांनो या दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर जमीन वितरित करण्यात येत असून या योजनेअंतर्गत खालील घटकांना लाभ देण्यात येत आहे.

1. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध या घटकातील जमीन नसलेल्या व्यक्तींना लाभ मिळवता येतो.

2. नव बौद्ध घटकातील भूमिहीन व शेतमजुरांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो.

 

या योजने अंतर्गत किती जमीन मिळते?

मित्रांनो दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना(Dadasaheb Gayakwad Sabalikaran Swabhiman Yojna) अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर जमीन वितरित करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन ही शासनाच्या वतीने शंभर टक्के अनुदानित तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येत आहे..

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता शासनाच्या वतीने ही जमीन 100% अनुदान तत्वावर वितरित करण्यात येत आहे. जर तुम्ही सुद्धा नवबौद्ध घटकातील जमीन असलेले किंवा बेरोजगार असाल तर शासनाच्या या योजनेअंतर्गत मोफत जमीन मिळवण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा.

 

शंभर टक्के अनुदानावर जमीन खरेदी करण्याकरिता अर्ज कसा करायचा?

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने जमीन खरेदी करण्याकरिता शंभर टक्के अनुदान पुरवणारी महत्त्वपूर्ण अशी dadasaheb gaikwad sabalikaran yojana ही राज्यात सुरू असून या योजनेअंतर्गत नवबौद्ध घटकातील तरुणांना अर्ज करण्याची आवाहन करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अधिक माहिती तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये मिळणार आहे. तसेच तुमच्या गावातील तलाठी तसेच ग्रामसेवक यांना तुम्ही या योजने संदर्भात अधिक माहिती विचारू शकतात.

या योजनेअंतर्गत आत्ताच अर्ज करा dadasaheb gaikwad sabalikaran yojana form

जमीन खरेदी करण्याकरिता शंभर टक्के अनुदान देणारी दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना संदर्भातील ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. अश्याच योजना संदर्भातील माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.