डोमेन नेम म्हणजे काय? डोमेन नेम चे प्रकार | Domain Name Information in Marathi

प्रत्येक वेबसाईटला आपले स्वतःचे डोमेन नेम असते. डोमेन नेम म्हणजे त्या वेबसाईट ची विशिष्ट प्रकारची ओळख असते. वेबसाईट करता डोमेन नेम महत्त्वपूर्ण असते. एक प्रकारे वेबसाईटला ओळखण्याकरिता दिलेले नाव म्हणजे डोमेन नेम नसते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना डोमेन नेम काय आहे? Domain Name Information in Marathi डोमेन नेम कसे खरेदी करायचे? त्याचप्रमाणे डोमेन नेम विषयी माहिती माहितही नसेल, किंवा असेल तरीसुद्धा तुम्हाला डोमेन नेम विषयी विस्तृत माहिती नसेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण डोमेन नेम विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. 

 

जर तुम्ही एखादा ऑफलाईन व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमचा व्यवसाय ऑनलाइन करून देशातील तसेच जगभरातील सर्व ग्राहकांशी जुळू शकतात. तुमचा व्यवसाय ऑनलाईन केल्यामुळे आपल्या व्यवसायाचा सेल वाढेल तसेच प्रॉफिट सुद्धा वाढेल. त्याकरिता तुम्हाला तुमची एखादी वेबसाईट तयार करावी लागेल. आणि वेबसाईट करिता आवश्यक असतो तो म्हणजे डोमेन नेम.Domain Name Information in Marathi

 

डोमेन नेम म्हणजे काय? What is Domain Name in Marathi

या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक व्यक्ती आहेत, अनेक वस्तू आहेत या प्रत्येकांना आपले स्वतःचे नाव आहे. या वस्तूंना व्यक्तींना आपण त्यांच्या नावावरून ओळखत असतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या वेबसाईटला डोमेन नेम वरून ओळखत असतो. डोमेन ला आपण आपल्या वेबसाईटचा पत्ता सुद्धा म्हणू शकतो. Domain Name Meaning in Marathi याच्या आधारे यूजर आपल्या वेबसाईटवर प्रवेश करत असतात. प्रत्येक वेबसाईटला आपले स्वतःची डोमेन असते, तुम्ही प्रत्येक वेबसाईटच्या शेवटी .in, .com, .net, .us अशाप्रकारे पाहिले असेल यालाच डोमेन म्हणतात. डोमेन ही आपल्या वेबसाईट ची ओळख असते. डोमेन हे आल्याला खरेदी करावे लागते. Domain खरेदी केल्या नंतर ते आपल्या मालकीचे बनते. आपल्या वेबसाईटला वेगवेगळ्या सर्च इंजिन मध्ये शोधण्यासाठी डोमेन सहाय्य करत असते.Domain Name Information in Marathi, Domain Information in Marathi

 

डोमेन चे प्रकार किती? Type of Domain

डोमेन यांच्या प्रकाराबद्दल विचार केल्यास Domain Name चे अनेक प्रकार आहेत. Domain Name च्या महत्वपूर्ण प्रकाराबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. आज आपण डोमेन च्या दोन महत्त्वपूर्ण प्रकारांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. Domain Name Information in Marathi

Types of domain in marathi :

1. Country Code Top Level Domain

Country Code Top Level Domain(CcTLD) हे सुद्धा एक टॉप लेव्हलचेच डोमेन नेम असते. परंतु हे डोमेन नेम एका विशिष्ट देशाकरिता वापरले जाते. प्रत्येक देशासाठी वेगवेगळे CcTLD असते. जसे की एखाद्या व्यक्तीला आपल्या भारत देशापूर्तीच वेबसाईट मर्यादित ठेवायची असेल, तर तो .in या नावाने डोमेन खरेदी करू शकतो आणि वेबसाईट बनवू शकतो. आपण ज्या देशांमध्ये राहतो त्या देशाचं डोमेन नेम खरेदी करून त्या देशात आपण आपली वेबसाईट रँक करू शकतो.

विविध देशात वापरले जाणारे CcTLD :

.in – India हे डोमेन आपल्या भारत देशात वापरली जाते.

.us – United States फक्त अमेरिकेमध्ये या डोमेन वापर करण्यात येतो. म्हणजेच हे अमेरिकेचे .in India

हे आपल्या भारत देशातील CcTLD आहे.

.jp – Japan हे डोमेन नेम जपान या देशात वापरले जाते. हे जापान या देशातील CcTLD आहे.

वरील उदाहरणावरून तुम्हाला डोमेन नेम च्या या प्रकाराबद्दल नक्कीच महत्त्वपूर्ण माहिती समजली असेल.

2. Top Level Domain(TLD)

डोमेन नेम चा हा सर्वात वापरला जाणारा आणि सर्वात लोकप्रिय असा प्रकार आहे. टॉप लेव्हल डोमेन नेम ला गुगल जास्त प्रेफर करते. गुगल टॉप लेव्हल डोमेन ला बाकी डोमेनच्या तुलनेत जास्त महत्त्व देते. TLD Domain हे SEO Friendly असतात. हे डोमेन सहज Rank होतात. जे लोक ब्लॉगिंग किंवा वेबसाईट मध्ये बऱ्याच दिवसापासून काम करत आहेत, ते सहसा टॉप लेवल डोमेन वापरतात. Domain Information in Marathi

Top Level Domain ची उदाहरणे

.com : हे एक tld domain असून या डोमेन चा वापर Commercial वेबसाईट करिता करण्यात येतो.

.org : हे एक tld domain असून या डोमेन चा वापर Organization वेबसाईट मध्ये केला जातो.

.net : हे एक tld domain असून या डोमेन चा वापर Networking वेबसाईट मध्ये केला जातो.

.edu : हे एक tld domain असून या डोमेन चा वापर हा Educational वेबसाईट मध्ये केला जातो.

.gov : हे एक tld domain असून या डोमेन चा वापर हा Government वेबसाईट मध्ये केला जातो.

 

टॉप लेव्हल डोमेन वापरणाऱ्या वेबसाईट ची उदाहरणे www.google.com, https://en.wikipedia.org अशा अनेक वेबसाईट टॉप लेव्हल डोमेन वापरत आहेत.

 

सब डोमेन काय आहे? What is Sub Domain in Marathi

आपण डोमेन नेम आणि त्यांच्या प्रकार बद्दल माहिती पाहिलेली आहे. आता आपण सब डोमेन म्हणजे काय? ते जाणून घेऊया. Domain Name Information in Marathi

आपण एखादे डोमेन खरेदी केल्यानंतर त्या डोमेन च्या आधारे सब डोमेन क्रिएट करू शकतो. आपण डोमेन खरेदी केल्यानंतर आपल्याला सब डोमेन खरेदी करण्याची गरज पडणार नाही. डोमेन चा एक भाग म्हणजे सबडोमेन असते. डोमेन खरेदी करण्याकरिता आपल्याला पैसे द्यावे लागते. परंतु सब डोमेन खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागत नाही. कारण की डोमेन हे खरेदी केल्या नंतर आपण त्या डोमेन ला सब डोमेन जोडू शकतो.

सब डोमेनचे उदाहरण; www.google.com हे एक मेन डोमेन आहे. आणि www.support.google.com हे त्याचेच सब डोमेन आहे. Support सब डोमेन.

थोडक्यात सब डोमेन म्हणजे एखाद्या मेन डोमेन च्या आधी एखादा शब्द किंवा कीवर्ड ॲड करणे होय.

 

डोमेन नेम पुरविणाऱ्या कंपन्या कोणत्या

आपण डोमेन नेम काय आहे? त्याचे प्रकार तसेच सब डोमेन विषयी माहिती जाणून घेतलेली आहे. आता आपण आपल्या भारत देशात डोमेन नेम पुरविणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. बाजारामध्ये डोमेन नेम पुरविणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, आपण लोकप्रिय असणाऱ्या कंपन्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Domain Name Provider Company List 

खालीलपैकी कुठल्याही कंपनीमधून आपण आपल्या वेबसाईट करिता डोमेन नेम खरेदी करू शकतो. काही कंपन्या डोमेन नेम स्वस्त विकतात तर काही कंपन्या महाग विकतात, त्यामुळे आपल्याला या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हव्या असलेल्या डोमेन नेम ची किंमत जाणून घेऊन नंतर खरेदी करावयाचे आहेत.

1. Godaddy

तुम्ही टीव्हीवर किंवा मोबाईलवर गो डॅडी ची जाहिरात पाहिलीच असेल. (गो डॅडी(Godaddy)ही जगातील तसेच भारतातील सर्वात लोकप्रिय डोमेन नेम पुरविणारी कंपनी आहे. त्याचप्रमाणे गो डॅडी चे डॅशबोर्ड म्हणजेच इंटरफेस हा अतिशय सोपा असल्यामुळे कोणीही सहज तो समजू शकतो. GoDaddy वर मिळणारे डोमेन हे इतरांपेक्षा थोडे महाग असतात. जर तुम्हाला गो डॅडी वरून डोमेन खरेदी करायची असेल तर तुम्हाला एक वर्षापेक्षा जास्त चा प्लॅन निवडावा लागेल. दोन वर्षा पासून किंवा पाच वर्षापर्यंतचा प्लॅन निवडण्यास तुम्हाला GoDaddy वर स्वस्त डोमेन मिळेल.

2. Namecheap

Namecheap ही सुद्धा एक लोकप्रिय कंपनी आहे. Namecheap हे आपल्याला स्वस्तामध्ये डोमेन नेम पुरविते. परंतु नेमचीप वर डोमेन खरेदी करताना इंटरनॅशनल डेबिट कार्ड लागते.

3. Bluehost

Bluehost ही कंपनी वेब होस्टिंग आणि डोमेन पुरविणारी प्रसिद्ध कंपनी आहे. Bluehost ही कंपनी होस्टिंग पुरविते त्यामुळे जर आपण Bluehost वर होस्टिंग खरेदी केली तर आपल्याला डोमेन हे फ्री मध्ये देण्यात येते. त्याच प्रमाणे डोमेन सोबत WHOISGuard protection फ्री मध्ये उपलब्ध करून देते.

 

डोमेन नेम ची निवड कशी करायची? डोमेन नेम निवडायच्या टिप्स How to choose a best domain name?

जर तुम्हाला एखादी वेबसाईट तयार करायची असेल तर आपण चांगले डोमेन नेम हे निवडायला पाहिजे. जर तुम्ही निवडलेले डोमेन नेम चांगले असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमची वेबसाईट गुगलमध्ये रँक होईल. आम्ही तुम्हाला डोमेन ची निवड कशी करायची याविषयी काही टिप्स देत आहोत. Domain Name Information in Marathi

1. एखादी वेबसाईट सुरू करताना सर्वप्रथम आपल्या वेबसाईटचे जे निष असेल त्या निश शी संबंधितच आपण डोमेन नेम खरेदी केले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या वेबसाईटवरून सौंदर्य विषयी किंवा सौंदर्य टिप्स देणार असाल तर तुम्ही तुमच्या डोमेन मध्ये beauty या शब्दाचा वापर करावा.

2. डोमेन नेम हे खूप जास्त लांब लचक नसावे. शक्यतो कमी आकाराच्या डोमेन नेम ची निवड करावी.

3. आपण आपल्या वेबसाईट करिता जे डोमेन नेम निवडणार आहोत, ते इतरांच्या वेबसाईट पेक्षा unique असावे.

4. एखादा यूजर आपल्या वेबसाईटवर आल्यानंतर त्याला आपले डोमेन नेम हे वाचण्यास आणि लक्षात ठेवण्यास सोपे असले पाहिजे. जेणेकरून काही दिवसानंतर तुम्ही त्याचा ब्रँड बनवून जास्त ट्राफिक मिळवू शकतात. काही दिवसानंतर यूजर तुमची वेबसाईट डायरेक्टली गुगलमध्ये टाकून तुमच्या वेबसाईटवर येतील.

5. शक्यतो टॉप लेव्हल डोमेन निवडावे

6. डोमेन निवडताना त्या डोमेन मध्ये ट्राफिक असणारे कीवर्ड ॲड केले तर त्याचा आपल्याला फायदा होईल.

 

डोमेन ची किंमत किती असते? How much does a domain cost?

सर तुम्हाला तुमच्या वेबसाईट करिता डोमेन खरेदी करावयाचे असेल तर आपल्याला एका वर्षाकरिता 500 रुपये ते 1500 रुपये पर्यंत खर्च येतो. त्याचप्रमाणे .in डोमेन सहसा स्वस्त असतात. .com डोमेन हे इतर डोमेन पेक्षा थोडी महाग असतात. त्याचप्रमाणे डोमेन ची किंमत ही आपण कोणत्या कंपनीकडून डोमेन खरेदी करत आहोत, त्यावर सुद्धा अवलंबून असते. जर तुम्हाला एखादे डोमेन हवे असेल तर, तुम्ही वर दर्शविलेल्या वेबसाईटवर जाऊन चेक करून घेऊ शकतात. जी कंपनी तुम्हाला स्वस्तामध्ये डोमेन पुरवित असेल तिथून ते खरेदी करून घ्या.

डोमेन नेम संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, ही माहिती इतरांना देखील शेअर करा. अशाच पोस्ट जाणून घेण्याकरिता आपल्या वेबसाईटवर भेट देत चला.