एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2022 माहिती | Ekatmik Bal Vikas Seva Yojana

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात बालकांच्या विकासासाठी तसेच किशोरावस्थेतील मुली आणि गरोदर महिला यांच्याकरिता महत्त्वपूर्ण अशी एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबविण्यात येत आहे. लहान बालकांचा विकास व्हावा त्यांना योग्य ते पोषण मिळावे तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहावे त्यांना शाला-पूर्व शिक्षण मिळावे तसेच किशोरावस्थेतील मुलीची योग्य ती काळजी घेता यावी तसेच गरोदर आणि स्तंनदा महिला यांचा विकास व्हावा या उद्देशाने ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे.

 

आयसीडीएसच्या एकात्मिक बाल विकास सेवा(Ekatmik Bal Vikas Seva Yojana) अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी केंद्र चालविण्यात येत आहे. हे अंगणवाडी केंद्र महिला व बाल विकास विभागामार्फत चालविण्यात येत असते.

 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रमुख उद्दिष्टे

Ekatmik Bal Vikas Seva Yojana

1. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषणाचा दर्जा सुधारणे

2. लहान मुलांच्या सामाजिक, मानसिक व शारीरिक विकास करण्यासाठी प्रयत्न करणे.

3. लहान मुलांची आरोग्य संतुलित राहण्याकरिता मदत करणे.

4. कुपोषणाला प्रतिबंध करणे.

5. गर्भवती महिलांना तसेच लहान मुलांच्या मातांना पौष्टिक आहाराचा पुरवठा करणे.

6. लहान मुलांचे व गरोदर मातांची आरोग्य चांगले राहील याची दक्षता घेणे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना वेबसाईट

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेस(Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2022 Maharashtra) अंगणवाडी असे ओळखले जाते. वरील सर्व सेवा अंगणवाडी मार्फत पुरवण्यात येत असतात. आयसीडीएसच्या Ekatmik Bal Vikas Seva Yojana अंतर्गत “अंगणवाडी” चालविण्यात येत असतात. अंगणवाडी केंद्र हे अंगणवाडी मध्ये असणाऱ्या सहायिका तसेच अंगणवाडी कर्मचारी हे चालवित असतात. Ekatmik Bal Vikas Seva Yojana अंतर्गत चालविण्यात येणारा अंगणवाडी हा महत्वपूर्ण असा उपक्रम आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत हे चालविण्यात येत आहे.

हे नक्की वाचा:- शेतकरी योजना 2022-23 संपूर्ण यादी. आत्ताच अर्ज करा

एकात्मिक बाल विकास सेवा(Ekatmik Bal Vikas Seva Yojana Maharashtra)उपक्रमांतर्गत अंगणवाडी केंद्राद्वारे गावातील लहान मुलांना आणि त्यांच्या मातांना पायाभूत सुविधा पुरविण्यात येते. आपल्या महाराष्ट्र राज्य या उपक्रमाचे 553 प्रकल्प कार्यान्वित आहेत.

 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवा

आपल्या महाराष्ट्र राज्यात खालील सेवा पुरविण्यात येतात.

1. लसीकरण अभियान

2. पोषण आणि आरोग्य शिक्षण अभियान

3. आरोग्य तपासणी अभियान

4. अनौपचारीक शाला-पूर्व शिक्षण अभियान

 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना Ekatmik Bal Vikas Seva Yojana Maharashtra अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या अंगणवाडीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी अशा सेविका यांना सरकारतर्फे मानधन सुद्धा देण्यात येत असते. गावातील लहान बालकांचे आरोग्य सुरळीत राहावे. याकरिता हे कर्मचारी प्रयत्न करत असतात. महाराष्ट्र राज्यातील महिला व बाल विकास विभाग राज्यातील नवजात बालकांच्या आरोग्यासाठी सदैव तत्पर असते.

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान योजना ची नवीन यादी आली! आत्ताच डाऊनलोड करा

एकात्मिक बाल विकास सेवा योजना संदर्भातील ही माहिती इतरांना देखील शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.