इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी 80 टक्के सबसिडी मिळवा; असा करा अर्ज | Electric Vehicle Subsidy Scheme Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने इलेक्ट्रिक वाहन धोरण ठरवण्यात आलेली असून आपल्या महाराष्ट्र राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी 80 टक्के पर्यंत सबसिडी योजना राबविण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येत असल्यामुळे राज्यामध्ये वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण राहील व पर्यावरणाचा समतोल राहील. जर तुम्हाला सुद्धा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायची असेल तर शासनाच्या या योजनेअंतर्गत 80 टक्के सबसिडी आपण इलेक्ट्रिक वाहनावर मिळू शकतो. तर चला जाणून घेऊया इलेक्ट्रिक वाहन खरेदी अनुदान (Electric Vehicle Subsidy Scheme Maharashtra ) संदर्भात माहिती.

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात वातावरणात होणारे मोठ्या प्रमाणातील बदल तसेच दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण हे नियंत्रणात ठेवण्याची आवश्यकता असल्यामुळे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन इलेक्ट्रिक धोरण हे ठरवण्यात आलेले आहे. इलेक्ट्रिक वेहिकल धोरण 2021 नुसार आता राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये असणाऱ्या बॅटरीच्या क्षमतेच्या नुसार electric vehicle subsidy अनुदान देय असणार आहे.

 

Electric vehicle subsidy मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत वाहनांची नोंदणी करण्यात सुद्धा सूट देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या बाबतीत शासन जागरूक असून त्यामुळे शासनाने शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्था यांचे मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या वाहनांना इलेक्ट्रिक बॅटरी वाहनेच खरेदी करण्याची सांगितले आहे. याकरिता महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे. Subsidy On Electric Vehicle in Maharashtra

 

electric vehicle dhoran maharashtra नुसार इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी चालना मिळावी जास्तीत जास्त लोकांनी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावे याकरिता अनेक प्रकारची सूट तसेच प्रोत्साहन हे पुरविण्यात येत आहे. राज्यातील लोकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग करावा याकरिता ही पावले उचलण्यात येत आहे.

यापूर्वीसुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन धोरण 2018 (Electric Vehicle Subsidy Scheme Maharashtra)हे लागू करण्यात आलेले होते परंतु या इलेक्ट्रिक वाहन खरेदी धोरणामध्ये सुधारणा करून 2021 हे राबविण्यात आले आहे. नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार बॅटरी इलेक्ट्रीक व्हेईकल ( BEV) च्या खरेदीदारांसाठी अनुदानित करण्यात येत आहे. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत आहे.