फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 1 कोटी 68 लाख रुपयांचा निधी; वाटपास शासनाची मंजुरी | Falbag Lagwad Anudan Yojana

अनुसूचित जाती प्रवर्गातील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी हा निधी नवीन शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करून वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे यापूर्वी अर्ज केलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील फळबाग लागवड करणारे शेतकऱ्यांना तसेच इथून पुढे अनुसूचित जाती प्रवर्गातील नवीन  फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे.

जर तुम्हाला तुमच्या शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी Falbag Lagwad केली पाहिजे. फळबाग लागवडीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. परिणामी शेतकऱ्यांना दरवर्षी फळबाग पिकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे शेतकरी त्यांची परिस्थिती सुधारू शकतात. त्यामुळे राज्य शासनाने सन 2022 23 आर्थिक वर्षाकरिता फळबाग लागवड करण्यासाठी हा निधी Falbag Lagwad Yojana Maharashtra अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

1 कोटी 68 लाख रुपये वितरणाचा शासन निर्णय जाहीर:

शेतकरी बांधवांना राज्य शासनाने राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 68 लाख रुपये इतका निधी मंजूर केला असून त्या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे. निधी वितरणाचा शासन निर्णय आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे. खाली लिंक वरून तुम्ही निधी वितरणाचा शासन निर्णय सविस्तर पाहू शकतात.

सविस्तर शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाप्रकारे आता राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच हा निधी मिळणार आहे.