या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी 1 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर; निधी वितरणाचा शासन निर्णय जाहीर | Falbag Lagwad Yojana Anudan

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान देण्यात येत असते. मित्रांनो राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करून आर्थिक दृष्ट्या समृद्ध व्हावे. फळबाग लागवडीच्या माध्यमातून जास्त उत्पन्न कमवून स्वतःचा आर्थिक विकास साधून घ्यावा यासाठी शेतकऱ्यांना फळबाग लागवड करताना मदत व्हावी म्हणून अनुदान देण्यात येत असते. राज्य शासनाच्या मार्फत Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana ही राज्यात सुरू आहे.

मित्रांनो या भाऊसाहेब फुंडकर Falbag Lagwad Yojana अंतर्गत राज्य शासन वेळोवेळी नवीन शासन निर्णय काढून तसेच वेगळी आर्थिक तरतूद करून फळबाग लागवडीला चालना देत आहे. मित्रांनो फळबाग लागवड करणारे तसेच फळबाग उत्पादक शेतकरी इतर शेतकऱ्यांपेक्षा जास्त समृद्ध असतात. फळबाग लागवडीतून मिळणारे उत्पन्न इतर पिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. त्यामुळे शासन वेळोवेळी फळबाग लावण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देते.

 

फळबाग लागवडीसाठी निधी मंजूर

त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी राज्य शासनाने 01 कोटी 68 लाख रुपये इतका निधी मंजूर करून तो वितरण करण्यास मान्यता दिली आहे. मित्रांनो राज्यातील फळबाग लागवडीचे प्रमाण वाढावे हा या मागील उद्देश असून अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी शासनाने हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत जे अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी फळबाग लागवड करतील अश्या शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे.

 

सविस्तर शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

फळबाग लागवडीचा निधी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?

मित्रांनो अनुसूचित जाती प्रवर्गातील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येत आहे. आपल्या राज्यात फळबाग लागवड करण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना व रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना सुरू आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती विशेष घटक योजना अंतर्गत समाविष्ट लाभार्थ्यांना व अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना आणि भाऊसाहेब फुंडकर प्रभाग लागवड योजनेच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे.

फळबाग लागवडीकरिता निधी वितरित करण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संदर्भ क्रमांक 5 मधील शासन निर्णयानुसार मागणी करण्यात आलेली होती. त्यामुळे सदर फळबाग लागवड योजने करिता अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 168 कोटी रुपये 1 कोटी 68 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

सविस्तर शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदान कसे मिळवायचे?

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या फळबाग लागवड योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतात फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. जर तुम्हाला सुद्धा फळबाग लागवड करायची असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवरून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या घटकांतर्गत अर्ज करू शकतात. किंवा जर तुमच्या गावांमध्ये पोखरा योजना असेल तर या अंतर्गत देखील तुम्ही अर्ज करू शकतात.