मुदत ठेव म्हणजे काय? Fixed Deposit माहिती मराठी | Fixed deposit information in Marathi

मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मुदत ठेव(Fixed Deposit) हा शब्द ऐकला असेल. बऱ्याच जणांना मुदत ठेवी संदर्भात थोडीफार माहिती असेल. बऱ्याच जणांनी मुदत ठेवी मध्ये गुंतवणूक सुद्धा केलेली असेल. परंतु मुदत ठेव म्हणजे काय? हे आपण आपल्या मराठी भाषेमध्ये विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. मुदत ठेव काय असते? यामध्ये व्याजाचा दर काय असतो. मुदत ठेवी चे प्रकार तसेच ऑनलाइन एफ डी कशी करावी? Fixed deposit information in Marathi याविषयी विस्तृत माहिती जाणून घेऊया.

 

मुदत ठेव म्हणजे काय आहे? What is Fixed Deposit in Marathi

मित्रांनो मुदत ठेव म्हणजे FD – Fixed deposit होय. एखाद्या बँकेमध्ये किंवा पतसंस्थेमध्ये किंवा इतर संस्थांमध्ये ज्या संस्था आपल्याला Fixed Deposit सुविधा पुरवीत आहेत, या संस्थांमध्ये आपले पैसे फिक्स काळाकरिता फिक्स व्याजाच्या दराने ठेवणे होय. आजच्या काळात पैसा हा सर्व काही आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या पैशाची आपण बचत केली पाहिजे तसेच आपल्याकडे असलेला पैसा आपण वाढवला पाहिजे. आपला भविष्यकाळ सुरक्षित ठेवण्याकरिता आपण आपल्या पैशाची बचत करणे आवश्यक आहे. सध्या बचत ठेव म्हणजेच Fixed Deposit या योजना खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. फिक्स डिपॉझिट मध्ये व्याज चा दर हे पूर्व निर्धारित असते.

 

मुदत ठेव सुविधा कोण पूरविते?

मित्रांनो मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट सुविधा ही आजकाल आपल्याला अनेक सरकारी तसेच प्रायव्हेट बँका, सहकारी पतसंस्था, जिल्हा बँका तसेच निमसरकारी बँका व पोस्ट ऑफिस उपलब्ध करून देत आहे.

 

Fixed Deposits आणि पैशाची सुरक्षितता

मित्रांनो मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलेले पैसे हे सुरक्षित असतात त्याचप्रमाणे फिक्स डिपॉझिट वरील रकमेवर निश्चित दराने व्याज मिळत असते. फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवलेल्या पैशावर शेअर बाजाराचा किंवा इतर कोणत्याही घटकांचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे मुदत ठेवी मध्ये ठेवलेले पैसे सुरक्षित असतात. Fixed Deposit Mahiti Marathi

Fixed Deposit माहिती मराठी  Fixed Deposit Mahiti Marathi

आता आपण What is Fixed Deposit in Marathi जाणून घेऊया. Fixed Deposit ला शॉर्ट मध्ये FD असे म्हणतात. आजकाल आपल्याला प्रत्येकाच्या तोंडातून एफडी हा शब्द ऐकायला येत आहे. सुरक्षित असलेल्या गुंतवणूक पर्यायांपैकी एफडी हा एक पर्याय आहे. FD मध्ये पैसे गुंतवल्यानंतर बचत खात्यापेक्षा जास्त दराने व्याज मिळत असते. यामध्ये व्याजाचा दर हा फिक्स असतो. व पैशांची सुरक्षितता असते. आपण एफडी मध्ये पैसे गुंतवल्यानंतर एफडी कधीही रद्द करू शकतो. तसेच एफ डी मधून पैसे काढू शकतो. त्याचप्रमाणे बऱ्याच वित्तीय संस्था ह्या FD वर कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध करून देतात. Fixed deposit information in Marathi

FD गुंतवणूक करत असताना एकरकमी पैसे आपल्याला जमा करावे लागतात. म्हणजेच आपल्याला जेवढे पैसे एफडी मध्ये गुंतवायचे आहे. तेवढे पैसे एकदाच भरावे लागते. तुम्ही ज्या एफ डी मध्ये गुंतवणूक करत आहात त्याचा व्याजाचा परतावा हा ठराविक दराने आधीच पूर्वनिर्धारित केलेला असतो. वेगवेगळ्या वित्तीय संस्थांमध्ये FD चे व्याजाच्या परताव्याचे दर हे वेगवेगळे आहे. काही संस्था एफडीवर जास्त परतावा देतात, तर काही कमी देतात. FD च्या माध्यमातून आपण दहा वर्षाच्या कालावधी करिता गुंतवणूक करू शकतो. यापेक्षा कमी कालावधी करिता सुद्धा FD करण्याची सुविधा उपलब्ध आहे. FD च्या माध्यमातून जर आपल्याला दर महिन्याला येणारे व्याज आपल्या खात्यात जमा करायचे असेल तर, त्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असते.

हे नक्की वाचा:- ठिबक सिंचन अनुदान योजना नवीन अर्ज सुरू. आत्ताच अर्ज करा

मुदत ठेवीचे प्रकार Types of Fixed Deposit in Marathi

Fixed Deposits चे प्रामुख्याने खालील प्रकार पडतात. ते आता आपण जाणून घेऊया.

1. स्टॅंडर्ड मुदत ठेवी Standard Fixed Deposits

Standard Fixed Deposits हा एक फिक्स डिपॉझिट चा एक प्रकार आहे. फिक्स डिपॉझिट च्या या प्रकारामध्ये आपण सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंत fd करू शकतो. Standard Fixed Deposits मध्ये व्याजाचा दर हा त्या वित्तीय संस्थेवर अवलंबून असतो. स्टँडर्ड टर्म डिपॉझिट्स अंतर्गत ही एफडी कार्यरत असते.

2. ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवी Senior Citizen Fixed Deposits

FD च्या प्रकारांमधील हा एक महत्त्वाचा असा प्रकार आहे. जर आपण ज्येष्ठ नागरिक असाल तर आपल्याला Senior Citizen Fixed Deposits या स्कीम अंतर्गत मुदत ठेवी करता येते. Senior Citizen Fixed Deposits अंतर्गत मुदत ठेवी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एनबीएफसी व बँका 0.25% ते 0.50% पर्यंत जास्त व्याज देतात. ज्येष्ठ नागरिकांकरिता ही एक अतिरिक्त सवलत देण्यात येते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या मुदती ठेवीवर कर लावण्यात येत नाही.

3.आवर्ती ठेव Recurring Deposit

मुदती ठेवीचा तिसरा व महत्त्वपूर्ण असा प्रकार म्हणजे आवर्ती ठेव होय. Recurring Deposit हा एक फिक्स डिपॉझिट चाच प्रकार आहे. फिक्स डिपॉझिट च्या या प्रकारांमध्ये सुद्धा व्याजाचा दर हा आधीच ठरलेला असतो. फिक्स डिपॉझिट च्या या प्रकारामध्ये आपल्याला मासिक किंवा त्रे मासिक पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे हा प्रकार सुद्धा व्यापारी वर्ग किंवा मजूर वर्ग यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.

4. NRI मुदत ठेव NRI Fixed Deposit

फिक्स डिपॉझिट च्या प्रकारांमधील चौथा व महत्त्वाचा प्रकार म्हणजे NRI Fixed Deposit होय. Nri आहे मुदत ठेवीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे NRI Fixed Deposit अंतर्गत मुद्दल रकमेवर तसेच

व्याजावर कोणत्याही प्रकारचा कर आकारण्यात येत नाही. NRI Fixed Deposit अंतर्गत भारतीय चलनामध्ये किंवा परदेशी चलनामध्ये रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यावर वार्षिक 30 टक्के कर आकारण्यात येतो. NRI Fixed Deposit अंतर्गत विदेशी नागरिकांना सुद्धा गुंतवणुकीची संधी प्राप्त होते.

5. कॉर्पोरेट मुदत ठेव (Corporate Fixed Deposit

FD च्या प्रकारांमधील Corporate Fixed Deposit हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रकार आहे. हा प्रकार कॉर्पोरेट संस्थाद्वारे राबविण्यात येतो. बँका तसेच इतर संस्थांच्या तुलनेत Corporate FD जास्त व्याज देते. त्यामुळे यामध्ये जोखीम सुद्धा जास्त असते. पैशाची सुरक्षितता या प्रकारांमध्ये कमी होते कारण की जर ती संस्था दिवाळीखोर झाल्यास तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते. FD च्या या प्रकारामध्ये जास्त जोखीम व जास्त परतावा आहे.

हे नक्की वाचा:- रब्बी पिक विमा अर्ज सुरू

मुदती ठेवी मध्ये ऑनलाईन गुंवणुक कशी करायची? How to invest online in fixed deposits?

अनेक प्रायव्हेट बँका तसेच सरकारी बँका त्यांच्या ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने FD मध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. नेट बँकिंग मोबाईल बँकिंग किंवा त्या बँकांच्या ऑफिशियल मोबाईल ॲप्लिकेशन वरून आपल्याला ऑनलाइन एफ डी मध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होत आहे. FD मध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्याचा फायदा म्हणजे आपल्याला घरबसल्या एफ डी मॅनेज करता येते. त्यातील रक्कम चेक करता येते. तसेच एफडीतून पैसेही घरबसल्या काढता येतात.

 

मुदत ठेवीवर व्याजदर किती असतो? What is the interest rate on fixed deposit?

मित्रांनो आपण कोणतीही गुंतवणूक करत असताना सर्वात पहिल्यांदा चेक करतो, तो म्हणजे त्या गुंतवणुकीवर मिळणारा व्याजदर. आपण FD मध्ये गुंतवणूक करत असताना सर्वात पहिल्यांदा व्याजाचा दर पाहून त्या एफ डी मध्ये गुंतवणूक करत असतो. आपण किती कालावधी करिता मुदती ठेवी मध्ये गुंतवणूक करणारा आहोत, यानुसार आपल्याला व्याजाचा दर ठरवून दिला जातो. प्रत्येक बँक तसेच वित्तीय संस्था यांच्याद्वारे मुदती ठेवीवर दिले जाणारे व्याजाचे दर हे वेगवेगळे असतात. खास करून सहकारी पतसंस्था व प्रायव्हेट बँका मुदती ठेवीवर जास्त व्याजाचा दर पुरवितात.

सध्या मुदती ठेवीवर (Fixed Deposit) 5% ते 8% पर्यंत व्याज दिले जाते. हे वित्तीय संस्थेनुसार बदलत राहते.

मुदती ठेवी (Fixed Deposit-FD) संदर्भातील विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडली असेल. ही माहिती महत्त्वपूर्ण वाटत असल्या चित्रांना देखील नक्की शेअर करा.