मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात विविध जिल्हा परिषदे अंतर्गत त्या जिल्ह्यातील नागरिकांकरिता तसेच महिलांकरिता त्याचप्रमाणे मागासवर्गीय तसेच इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गातील तसेच अपंग यांच्याकरिता विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना रोजगाराच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच नागरिकांना स्वयंरोजगार प्राप्त होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी याकरिता विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण अशी योजना जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबविण्यात येत आहे. त्या योजनेचे नाव आहे मोफत पीठ गिरणी योजना महाराष्ट्र आजच्या या पोस्टमध्ये आपण Flour Mill Subsidy Scheme Maharashtra संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या योजना एकाच वेळी राबविण्यात येत असतात त्यापैकी आपण ज्या योजना करिता पात्र आहोत, त्या योजना अंतर्गत अर्ज करू शकतो. प्रत्येक योजने करिता आपल्याला वेगवेगळी फी भरावी लागते परंतु जर आपण पात्र असाल तर जास्त योजनांचा लाभ मिळू शकतो. मोफत पिठाची गिरणी योजना 2022 महाराष्ट्र राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो. mofat pith girani yojana ही जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येत असून संबंधित जिल्ह्यातील अर्ज करावा अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
मित्रांनो मोफत पीठ गिरणी योजना (mofat pith girani yojana)महाराष्ट्र ही जालना जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबविण्यात येत असून जिल्ह्याची नागरिकांना या योजनेअंतर्गत अर्ज करण्यात येणार आहे. मोफत पीठ गिरणी योजना अंतर्गत जिल्ह्यातील अपंग बांधवांना मिनी पिठाची गिरणी (Flour Mill Subsidy Scheme Maharashtra) शंभर टक्के अनुदानावर पुरवण्यात येत आहे. याकरिता संबंधित पात्र अर्जदारांनी अंतिम तारखेच्या आज जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जास्त अर्ज झाल्यास लाभार्थींची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. मोफत पीठ गिरणी योजना अंतर्गत अर्ज करण्याकरिता लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
मोफत पीठ गिरणी योजना आवश्यक कागदपत्रे
मित्रांनो मोफत पीठ गिरणी योजना महाराष्ट्र(Flour Mill Subsidy Scheme)अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे ही योजना जिल्ह्यातील अपंग बांधवांकरिता राबविण्यात येत असल्यामुळे फक्त अपंगांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे खाली कागदपत्रे अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने सबमिट करायची आहे. ज्या लाभार्थ्यांची या योजनेअंतर्गत निवड करण्यात येईल त्यांनाच खालील कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने जोडावे लागतील. Mofat pith girani yojana
- स्वतःचे आधार कार्ड
- ज्या गावात राहतात त्या गावचा रहिवासी दाखला
- अर्जदार दारिद्र रेषेखालील असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र
- कास्ट सर्टिफिकेट -हे तुम्हाला तहसील कार्यालया मधून मिळेल
- अर्जदार दिव्यांग असल्याबाबतचे अपंग प्रमाणपत्र- अर्जदाराकडे 40% किंवा त्या पेक्षा जास्त अपंग असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- यापूर्वी या योजनेअंतर्गत लाभ न घेतल्या बाबतचे ग्रामपंचायत मधील प्रमाणपत्र
मोफत पीठ गिरणी योजना अटी व पात्रता
मित्रांनो मोफत पीठ गिरणी योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आपण खालील अटी व पात्रता यांची पूर्तता करायला हवी. जर आपण खालील अटी व पात्रतेची पूर्तता करत नसाल तर लाभ मिळणार नाही.
- अर्जदार हा जिल्ह्यातील रहिवासी असावा
- अर्जदार हा अपंग असावा
- अर्जदाराने यापूर्वी या योजनेअंतर्गत लाभ मिळवलेला नसावा
- अर्जदाराकडे का सर्टिफिकेट असावे
- अर्जदाराकडे दिव्यांग प्रमाणपत्र असावे
- या योजनेअंतर्गत लाभ मिळाल्यानंतर तुम्हाला पिठाची गिरणी विकता येणार नाही
- पिठाची गिरणीचा वापर आपण स्वतःच्या उपयोगाकरिता तसेच रोजगार प्राप्त करण्याकरिता करू शकतात.
वरील सर्व अटी व पात्रतेची पूर्तता करत असाल तरच या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे.
पिठाची गिरणी योजना अर्ज प्रक्रिया
मित्रांनो पीठ गिरणी योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. संबंधित अर्जदारांना हा जिल्ह्याच्या अधिकृत जिल्हा परिषद वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. खालील प्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे.
- त्यामध्ये तुम्हाला zp yojna jalna किंवा Jalna zp yojana टाइप करून सर्च करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर जिल्हा परिषद जालनाची अधिकृत वेबसाईट आलेली आहे त्यावर क्लिक करा.
- ही योजना समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत राबविण्यात येत असल्यामुळे समाज कल्याण हा पर्याय तुम्हाला त्या वेबसाईट मध्ये निवडायचा आहे.
- आता तुमच्यासमोर विविध योजना आहे त्यापैकी मिनी पिठाची गिरणी योजना हा ऑप्शन निवडा.
- आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून गेट ओटीपी वर क्लिक करायचे आहे.
- आधार कार्डच्या माध्यमातून तुमची पात्रता तपासण्यात येईल जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्यासमोर पीठ गिरणीचा नवीन अर्ज ओपन होईल.
- त्यामध्ये विचारलेली तुमची वैयक्तिक तसेच इतर माहिती प्रविष्ट करा आणि अर्ज online सादर करा
- आता तुम्ही भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढा आणि संबंधित जिल्हा परिषदेमध्ये नेऊन जमा करा.
अश्या प्रकारे आपण पीठ गिरणी योजना(Flour Mill Subsidy Scheme) अंतर्गत ऑनलाइन अर्ज करू शकतो.
mofat pith girani application watch this video
मित्रांनो पीठ गिरणी योजना(pith girani yojana maharashtra) ही सध्या जिल्हा परिषद जालना मध्ये सुरू असल्यामुळे इतर जिल्ह्यातील नागरिकांना या पिठाची गिरणी योजना अंतर्गत लाभ मिळता येत नाही. परंतु जालना जिल्हा परिषदेच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे त्याचप्रमाणे इतर जिल्हा परिषदेचे अंतर्गत सुद्धा पीठ गिरणी योजना महाराष्ट्र राबविण्यात येऊ शकते त्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन अशा योजना बद्दल वेळोवेळी माहिती मिळवावी लागेल व ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल.