फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अर्ज सुरू | Free Silai Machine Yojana Maharashtra

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांकरिता महत्त्वपूर्ण अशी फ्री शिलाई मशीन योजना ही राबविण्यात येत आहे. या फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत महिलांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा तसेच नवीन छोटासा व्यवसाय स्थापन करता यावा याकरिता मोफत शिलाई मशीन(Free Silai Machine Yojana 2022 Maharashtra) पुरविण्यात येत आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबविण्यात येत असून जिल्ह्यातील महिलांनी मोफत शिलाई मशीन चा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर चला जाणून घेऊया फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र संदर्भात माहिती.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत फ्री शिलाई मशीन योजना(Free Silai Machine Yojana) ची अंमलबजावणी करण्यात येत असून ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना लाभ देण्यात येणार आहे. फ्री शिलाई मशीन(free silai machine Scheme Maharashtra) करिता अर्ज प्रक्रिया ही जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर सुरू झालेली असून संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा व या योजनेचा लाभ मिळवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 

फ्री शिलाई मशीन योजना अटी व शर्ती:-

फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना लाभ मिळणार आहे. फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी येणारे एकूण वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपयांच्या आत असावे लागते. जर एखाद्या कुटुंबाची उत्पन्न यापेक्षा जास्त असेल तर त्यांना लाभ मिळवता येणार नाही. या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन पुरवण्यात येणार असून ज्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे त्यांना ही मशीन इतरांना विकता येणार नाही.

या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय महिलांचे वय मर्यादा ही 18 ते 60 वर्षे ठरवून देण्यात आलेली आहे. जर तुम्ही या वयोगटांमध्ये बसत असेल तर या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे मागील तीन वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या अशा कोणत्याही योजनांचा लाभ न घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला पंचायत समिती मधून आणून जोडावे लागते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागाला देण्यात आलेला असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.

अशाप्रकारे अटी व शर्ती या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेल्या आहे. जर या अटी व शर्तीची पात्रता केली तरच लाभ मिळवता येणार आहे.

महत्वाचं अपडेट : मोफत पीठ गिरणी योजना अर्ज सुरू 

फ्री शिलाई मशीन योजना आवश्यक कागदपत्रे Free Silai Machine Scheme Required Documents

फ्री शिलाई मशीन योजना(Free Silai Machine Yojana) चा लाभ मिळण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. अर्जदार महिलेचे आधार कार्ड

2. अर्जदार महिलेचे बँक पासबुक

3. अर्जदार महिला मागासवर्गीय प्रवर्गातील असल्याबाबत प्रमाणपत्र

4. अर्जदार महिलेने यापूर्वी या योजनेचा लाभ न घेतल्या बाबतचे स्वघोषणापत्र

अशा प्रकारचे चार कागदपत्रे आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरिता आवश्यक आहेत.

 

फ्री शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया :

फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे राबविण्यात येत आहे. फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करा किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा. ऑफलाइन अर्ज करताना अर्जाचा नमुना सर्वात अगोदर डाऊनलोड करून घ्या तो अर्ज व्यवस्थितपणे भरा वर दिलेली सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडा त्यानंतर अर्ज सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी करण्यात येईल व जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला मोफत शिलाई मशीन पुरवण्यात येईल.

शिलाई मशीन योजना अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांना फ्री शिलाई मशीन योजना चा अर्ज हा 5 डिसेंबर 2022 पर्यंत कार्यालयामध्ये सादर करायचा आहे. जर अर्ज वेळेत पोहोचला नाही तर उशिरा येणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. जिल्हा परिषदेच्या या महत्त्वपूर्ण अशा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना शिलाई मशीन पुरवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे.

विडियो पहा :

शिलाई मशीन योजना अर्ज कुठे सबमिट करायचा?

मित्रांनो फ्री शिलाई मशीन योजना (Free Silai Machine Yojana)ही जिल्हा परिषदेअंतर्गत राबविण्यात येणार असल्यामुळे या योजनेचा अर्ज हा तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रांसहित सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्ज पोहोचल्याची पोहोच पावती देण्यात येईल. ही पावती तुम्हाला जपून ठेवायची आहे. सर्व अर्ज जमा झाल्यानंतर अधिकारी अर्जाची तपासणी करून पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना लाभ वितरण करतील.