घरकुल यादी 2022-23 महाराष्ट्र जाहीर; आत्ताच डाउनलोड करा आणि नाव चेक करा | Gharkul Yadi 2022-23 Maharashtra

मित्रांनो पी एम आवास योजना अंतर्गत देशातील बेघर व आर्थिक दृष्ट्या कमकुवत व बेगर घटकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर बांधण्याकरिता अनुदान देण्यात येत आहे. यालाच आपण महाराष्ट्रात घरकुल योजना असे म्हणतो. या पीएम आवास योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यात घरकुल योजना महाराष्ट्र राबविण्यात येत असून या योजनेची घरकुल यादी 2022-23 महाराष्ट्र (Gharkul Yadi 2022-23 Maharashtra) ही नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. पीएम आवास योजना अंतर्गत पंतप्रधान आवास योजना ग्रामीण(PM Awas Yojana Gramin) राबविण्यात येत आहे या घरकुल योजनेची ग्रामीण भागातील व्यक्तींची नवीन यादी नुकतीच जाहीर झाली आहे.

 

पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. घरकुल योजनेच्या नवीन यादी मध्ये ग्रामीण भागातील बेघर लोकांचा समावेश करण्यात आलेला असून यादीत (Gharkul Yadi Maharashtra)नाव असलेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर घरकुल योजना 2022 अंतर्गत घराचे बांधकाम सुरू करायचे असून वेळोवेळी अनुदान मागणी करायची आहे. घरकुल योजनेच्या नवीन यादी मध्ये आपले नाव आपण चेक करू शकतात, आजच्या या पोस्टमध्ये आपण नवीन घरकुल यादी कशी पहायची? याविषयी सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत.

घरकुल यादी 2022-23 महाराष्ट्र(Gharkul List Maharashtra) ही केंद्र शासनाच्या पीएम आवास योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीत नाव असलेल्या प्रत्येकाला घरकुल मिळणार आहे.

 

घरकुल यादी डाऊनलोड कशी करायची?

घरकुल योजनेची नवीन यादी डाऊनलोड करण्याकरिता तुम्हाला खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करायची आहे. gharkul yadi maharashtra 2022

  1. सर्वप्रथम पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.(डायरेक्टली घरकुल पाहण्याची लिंक खाली दिलेली आहे)
  2. आता या ठिकाणी तुम्हाला एबीसीडी असे अनेक पर्याय दिसत असेल त्यापैकी h हा पर्याय आहे H. Social Audit Reports यामध्ये Beneficiary details for verification या पर्यायावर क्लिक करा
  3. आता सर्वप्रथम आपले महाराष्ट्र राज्य निवडून घ्या.
  4. त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात, ज्या जिल्ह्यात तुमचे घर आहे ते जिल्हा निवडा
  5. आता तुमचा तालुका निवडून द्या.
  6. आता ज्या गावातून तुम्ही घरकुल योजना अंतर्गत अर्ज केलेला आहे ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करा.
  7. आता नवीन घरकुल यादी पाहण्याकरिता वर्ष 2022-23 निवडून द्या.
  8. खालील दिलेल्या अंकांची उत्तर सोडवून त्याची उत्तर खालच्या रकान्यामध्ये भरा. आता तुम्हाला योजनेमध्ये पीएम आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडायचा आहे.
  9. वरील सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी सबमिट करा आता तुमच्यासमोर तुमच्या गावातील घरकुल योजना ग्रामीण ची नवीन यादी ओपन झालेली असेल.

घरकुल योजना यादी पाहण्याची लिंक

अशाप्रकारे आपण घरकुल योजना ग्रामीण ची नवीन यादी पाहू शकतो. यादी डाऊनलोड करण्याकरता त्या ठिकाणी डाऊनलोड पीडीएफ असा तुम्हाला ऑप्शन दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करावे. जर तुमचे घरकुल योजनेच्या नवीन यादी मध्ये नाव आलेले नसेल परंतु तुम्ही घरकुल मिळवण्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधायचा आहे. घरकुल योजने संदर्भात नवीन अर्ज करण्याकरिता तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जायचे आहे घरकुल योजनेचा ग्रामीणचा अर्ज आपल्याला स्वतः ऑनलाईन करतात येत नाही तो ग्रामपंचायत मार्फतच ऑनलाईन करावा लागत असतो.

 

घरकुल मिळाले नाही तर तक्रार करता येते का?

मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आजच्या काळात जर आपण कोणताही व्यवहार बिना पैशाशिवाय केला म्हणजेच समोरच्याला चार दोन पैसे दिले नाहीत तर आपले काम उशिराच होत असते. परंतु एक नागरिक म्हणून आपण कोणत्याही अधिकाऱ्याला लाच न देता आपले काम झाले पाहिजे असते. जर तुम्ही घरकुल मिळण्यासाठी पात्र असून सुद्धा तुम्हाला घरकुल यादीतून(Gharkul Yadi) वगळण्यात आलेले असेल, तर याची तुम्हाला ऑफलाईन लेखी तक्रार दाखल करता येते. घरकुल योजनेची तक्रार करण्याची माहिती आम्ही यापूर्वी तुम्हाला दिलेली आहे.

घरकुल योजना तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करून माहिती जाणून घ्या 

watch gharkul yadi video:

 

घरकुल यादी 2022-23 संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. ही माहिती इतरांना नक्की शेअर करा. अश्याच योजने संदर्भातील माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

1 thought on “घरकुल यादी 2022-23 महाराष्ट्र जाहीर; आत्ताच डाउनलोड करा आणि नाव चेक करा | Gharkul Yadi 2022-23 Maharashtra”

Comments are closed.