घरकुल योजना तक्रार कशी करायची? | Gharkul Yojana Complaint

Pm Awas Yojana अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यात घरकुल योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारने देशात 2015 पासून सुरू केलेली आहे. या घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील गरीब व दुर्बल घटकातील कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्याकरिता शासनाच्या वतीने आर्थिक मदत पुरविण्यात येते. परंतु या योजनेअंतर्गत घरकुल मिळण्याकरता सर्व सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गावातील राजकारणामुळे बऱ्याच वेळेस गरजू व्यक्तीचे घरकुल मंजूर होऊ देत नाही. अश्या वेळेस जर आपण पात्र असून सुद्धा आपले नाव घरकुल यादीतून वगळण्यात आलेले असेल तर त्याची तक्रार(Gharkul Yojana Complaint) आपल्याला दाखल करता येते. आजच्या या पोस्टमध्ये आपण घरकुल योजना तक्रार कशी करायची? याविषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

Gharkul Yojana Complaint आपल्याला ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येते. जर तुम्हाला वाटत असेल की आपण पात्र असून सुद्धा त्याला वगळण्यात आलेले असेल किंवा कोणत्याही प्रकारची घरकुल योजने संदर्भातील अडचण दूर करण्याकरिता आपण तक्रार(PM Awas Yojana complaint) दाखल करू शकतो. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत गरजू लोकांना वगळून ज्यांच्याकडे आधीपासूनच स्वतःचे पक्के घर आहे अशा नागरिकांना घर देण्यात येत आहे त्यामुळे केंद्र सरकारने या संबंधात तक्रारी दूर करण्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जर तुमच्यासोबत ही असेच घडले असेल आणि तुमच्या मनात घरकुल योजना तक्रार कशी करायची? हा प्रश्न येत असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

 

देशातील प्रत्येक नागरिकांना 2024 पर्यंत स्वतःचे हक्काचे घर बांधून देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारच्या वतीने ठेवण्यात आलेले आहे. सुरुवातीला ही घरकुल योजना 2022 (Gharkul Yojana Maharashtra) पर्यंतच राबविण्यात येणार होती परंतु या योजनेतील लक्षांक पूर्ण झालेला नसल्यामुळे केंद्र शासनाच्या वतीने ही योजना 2024 पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. PM Awas Yojana complaint करण्याची प्रोसेस आता आपण जाणून घेऊया.

 

घरकुल योजना ऑफलाईन तक्रार कशी करायची? How to complain Gharkul Yojana offline?

मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना(pm awas yojna gramin complaint) अंतर्गत घरकुल योजनेची तक्रार आपल्याला ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे करता येते. आता आपण घरकुल योजनेची ऑफलाईन तक्रार कशी करायची याविषयी माहिती जाणून घेत आहोत.

पीएम आवास योजना कंप्लेंट(Gharkul Yadi Complaint) करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे ऑफलाइन पद्धत होय. केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत तक्रारी सोडवण्याकरिता तसेच अडचणी सोडवण्याकरिता प्रणाली विकसित केलेले आहे. घरकुल योजना संदर्भातील तक्रार आपण ग्रामपंचायत मध्ये करू शकतो या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम सॉल झाला नाही तर गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करता येते. यापेक्षाही मोठी सुविधा म्हणजे राज्यस्तरावर तक्रार करण्याची सोय उपलब्ध आहे. घरकुल योजना अंतर्गत यादी मधून तुम्हाला डावलण्यात आलेले असेल पात्र असून सुद्धा लाभ मिळत नसेल तर तक्रार दाखल करता येते.

महत्वाचं अपडेट : खरीप पीक विम्याचे 1200 कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा;

पीएम आवास योजना (Gharkul Yojana Maharashtra Complaint) संदर्भात तक्रार आपण तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात ऑफलाईन पद्धतीने करू शकतो. गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर आपण केलेल्या घरकुलच्या तक्रारीचे निवारण 45 दिवसाच्या आत करण्यात येते. ही झाली घरकुल योजनेची ऑफलाइन तक्रार नोंदवण्याची पद्धत आता आपण घरकुल योजना ऑनलाईन तक्रार संदर्भात माहिती जाणून घेऊया.

 

पीएम आवास योजना संदर्भात कोणत्याही प्रकारची मदत हवी(Gharkul Yojana Compliant) असल्यास किंवा कोणत्याही प्रकारची माहिती जाणून घ्यायची असल्यास आपण 1800-11-3377 किंवा 1800-11-3388 या क्रमांकावर कॉल करून अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. हे क्रमांक टोल फ्री असून याकरिता कोणत्याही प्रकारची शुल्क लागत नाही.

 

घरकुल योजना ऑनलाइन तक्रार कशी करायची? How to complain Gharkul Yojana online?

मित्रांनो पीएम आवास योजना अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी ऑनलाईन तक्रार प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. घरकुल योजना(Gharkul Yojana) संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आपण ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतो. घरकुल योजनेची ऑनलाईन तक्रार दाखल करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

  1. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वरून पीएम आवास योजना चे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या.
  2. सर्वप्रथम तुम्हाला आता या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे
  3. किंवा आपण आपला मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून सुद्धा लॉगिन करू शकतात.
  4. आता तुम्हाला रजिस्टर कंप्लेंट या ऑप्शनवर क्लिक करून या योजने संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करता येते.

वरील दोन्ही प्रकारे आपल्याला घरकुल योजना संदर्भात तक्रार दाखल करता येते. घरकुल योजनेची तक्रार ऑनलाइन किंवा ऑफलाइन दाखल केल्यानंतर 45 दिवसाच्या आत आपल्या तक्रारीचे निवारण करण्यात येते.

 

मित्रांनो घरकुल योजना संदर्भात तक्रार दाखल कशी करायची? याविषयी विस्तृत माहिती तुम्हाला नक्कीच मिळालेली असेल अशी आशा करतो या पोस्ट संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास नक्की कमेंट करा आम्ही तुमच्या शंकांचे निरसन करू.