ग्रामपंचायत मध्ये किती निधी आला आणि कुठे खर्च केला गेला संपूर्ण माहिती पहा | Gram Panchayat Nidhi

मित्रांनो ग्रामपंचायतीला विविध प्रकारच्या योजना राबवणे करिता तसेच ग्रामपंचायत हद्दीतील विविध प्रकारची कामे पूर्ण करण्यासाठी भरपूर असा निधी दरवर्षी प्राप्त होत असतो. ग्रामपंचायत मध्ये अनेक कामे असतात त्याकरिता शासन वेळोवेळी ग्रामपंचायतला निधी मिळवून देते आणि हा निधी ग्रामपंचायतला आल्यानंतर ग्रामपंचायत मधील सरपंच व ग्रामपंचायत मध्ये असणारी ग्रामपंचायत बॉडी यांच्यामार्फत ग्रामपंचायत हद्दीत विविध प्रकारची योजना राबवून तसेच कामे करून हा निधी खर्च करण्यात येत असतो. त्यामुळे आपल्या ग्रामपंचायत मध्ये किती निधी आलेला आहे आणि तो निधी कोणत्या कामावर कशा पद्धतीने खर्च करण्यात आला याची संपूर्ण माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने चेक करता येते. ग्रामपंचायत मध्ये आलेला निधी चेक करण्याची माहिती आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेत आहोत.

 

ग्रामपंचायत मध्ये आलेला निधी असा चेक करा:-

मित्रांनो आपल्या ग्रामपंचायत मध्ये आलेला एकूण निधी किती आहे त्याचप्रमाणे तो निधी कोणत्या कामाकरिता खर्च केला हे पाहण्याची सोपी प्रोसेस आता आपण जाणून घेत आहोत.

1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअर मध्ये जा आणि त्या ठिकाणी ई ग्राम स्वराज्य नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या.

2. किंवा या ई ग्रामस्वराज्य यांच्या वेबसाईटवर जा.

3. आता या ठिकाणी तुम्ही तुमचा जिल्हा निवडा राज्य निवडा तसेच तुमच्या गाव व तालुका निवडून घ्या.

4. त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या वर्षासाठी निधी पाहायचा आहे ते वर्ष या ठिकाणी निवडून घ्या.

5. आता तुमच्यासमोर तुमच्या ग्रामपंचायत मधील सरपंच उपसरपंच तसेच सचिव यांची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन झालेली आहे.

6. आता ग्रामपंचायत ची संपूर्ण डिटेल तुमच्यासमोर आलेली आहे त्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तुम्ही निवडलेल्या वर्षांमध्ये किती निधी आला व तो कसा खर्च केला गेला ज्या योजनेकरिता निधी आला ज्या कामाकरिता निधी आला ती सर्व माहिती या ठिकाणी आहे.

 

ग्रामपंचायत निधी जाणून घेण्याचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याची लिंक. 

 

मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये एकूण किती निधी आला व तो कोणत्या कामाकरिता खर्च केला गेला याची संपूर्ण माहिती मोबाईल वरून मिळू शकतो.