किसान क्रेडिट कार्ड करिता अर्ज कसा करायचा? शेतकऱ्यांनो आता कर्जाच टेन्शन सोडा! मिळवा 3 लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज | How to Apply For Kisan Credit Card

किसान क्रेडिट कार्ड करिता अर्ज कसा करायचा? शेतकऱ्यांनो आता कर्जाच टेन्शन सोडा! मिळवा 3 लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज | How to Apply For Kisan Credit Cardशेतकरी बांधवांना केंद्र शासनाच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती उपयोगी कार्याकरिता 3 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करिता कोणत्याही कारणासाठी कर्ज हवे असल्यास सावकाराकडे किंवा बँकांकडे जाण्याची आवश्यकता नाही. हे किसान क्रेडिट कार्ड असल्यास शेतकरी तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज तेही अतिशय कमी व्याज दरात मिळवू शकतात. या लेखात आपण किसान क्रेडिट कार्ड काढण्याची ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धत जाणून घेणार आहोत.

 

किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे?

मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा किसान क्रेडिट कार्ड काढून शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या कर्जाचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी दोन प्रकारे अर्ज करू शकतात. किसान क्रेडिट कार्ड काढण्याची पहिली महत्त्वाची पद्धत म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे. किसान क्रेडिट कार्ड काढण्याची दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे.

 

किसान क्रेडिट कार्ड करिता आपण ऑनलाइन किंवा ऑफलाईन दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने अर्ज करू शकतो.

 

किसान क्रेडिट कार्ड करिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

जर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड ऑनलाइन पद्धतीने काढू इच्छित असाल तर खालील प्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

1. किसान क्रेडिट कार्ड ऑनलाइन पद्धतीने काढण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून ते काढावे लागेल.

2. सर्वप्रथम तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

3. त्या वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड संदर्भात ऑप्शन दिसेल. ते पर्याय निवडून घ्या.

4. आता तुम्ही त्या पर्यावर गेल्या नंतर Apply now या ऑप्शनवर क्लिक करा.

5. आता तुमच्यासमोर किसान क्रेडिट कार्ड काढण्याचा संपूर्ण अर्ज ओपन झालेला असेल. हा अर्ज तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचा आहे.

6. किसान क्रेडिट कार्डचा अर्ज काळजीपूर्वक भरल्यानंतर शेवटी सबमिट करा.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई 13 हजार रुपये आताच पहा: जिल्हा निहाय यादी जाहीर येथे पहा

अशाप्रकारे आपण किसान क्रेडिट कार्ड करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी बँकेच्या वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याला बँकेच्या माध्यमातून संपर्क करून माहिती तपासून सर्व गोष्टी व्हेरिफाय झाल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येते.

महत्वाचं अपडेट: सातबारा उतारा मध्ये शासनाने केले 11 महत्त्वपूर्ण बदल; सातबारा उतारा मधील हे बदल प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असायलाच हवे. येथे पहा कसा आहे नवीन सातबारा

 

किसान क्रेडिट कार्ड करिता ऑफलाइन अर्ज कसा करायचा?

शेतकरी बांधवांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी ऑफलाईन सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. सर्वच बँका ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देत नाहीत परंतु शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कोणतेही बँकेकडे ऑफलाइन अर्ज करता येतो.

1. ऑफलाइन पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या संबंधित बँकेकडे जावे लागेल.

2. त्यानंतर बँकेकडे तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड काढण्याचा ऑफलाईन अर्ज मागवून तो भरावा लागेल.

3. किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे देखील बँकेला शेतकऱ्यांनी उपलब्ध करून द्यावी लागेल.

4. त्यानंतर बँक शेतकऱ्यांनी केलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे यांची पूर्तता करून शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देते.