पोलीस भरती 2022 अर्ज कसा करायचा? How to Apply Police Bharti 2022

विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात पोलीस भरती 2022 ही राबविण्यात येत आहे. पोलीस भरती 2022 महाराष्ट्र अंतर्गत 18 हजार पेक्षा जास्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. पोलीस भरती महाराष्ट्र ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा पोलीस भरती 2022 ची तयारी करत असाल तर अंतिम तारखेच्या आत पोलीस भरती 2022 अर्ज करून घ्या. आजच्या या पोस्टमध्ये आपण पोलीस भरती 2022 अर्ज कसा करायचा? How to Apply Police Bharti 2022 विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

पोलीस भरती 2022 अर्ज करण्यापूर्वी ह्या सूचना वाचून घ्या

1. अर्ज भरण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तसेच NCC प्रमाणपत्र इत्यादी अर्हतेनुसार तयार ठेवावे.

2. अर्जदाराने त्याचा ई-मेल आयडी व मोबाइल नंबर काळजी पूर्वक निवडावा. भरती संदर्भात सर्व माहिती नोंदविलेल्या ई-मेल आयडी व मोबाइल नंबरवर पुरवण्यात येईल.

3. अर्जदारास पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई अशा एकूण ३ पदांसाठी एकाच घटकात किंवा ३ वेगवेगळ्या घटकात आवेदन अर्ज सादर करता येईल. परंतु एकाच घटकात एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करता येणार नाही.

4. अर्जदारास प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असेल.

5. परीक्षेची निश्चित तारीख हि संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल.

 

पोलीस भरती 2022 महाराष्ट्र महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू झाल्याचा दिनांक :- 9/11/22

अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 30/11/22

शुल्क भरण्याची तारीख:- 30/11/22

 

पोलीस भरती 2022 अर्ज प्रक्रिया Police Bharti 2022 Application Process

विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती 2022 अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. खालील प्रमाणे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पोलीस भरती 2022 ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

1. सर्वात पहिल्यांदा पोलीस भरती 2022 अर्ज करण्यासाठी नोंदणी करायची आहे.

2. नोंदणी मध्ये तुम्हाला तुमची नवीन नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करून तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पूर्ण नाव, लिंग या बाबी भरून त्या खाली इमेज मध्ये दिसत असलेले टेक्स्ट रकान्यात भरून Register option वर क्लिक करा.

3. आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

4. आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड व इमेज मध्ये दिसत असलेले टेक्स्ट टाकून लॉगिन करून घ्या.

5. आता तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याकरिता अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून पदासाठी अर्ज करा वर क्लिक करा. आता तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती अर्जामध्ये भरायची आहे.

6. पोलीस भरती महाराष्ट्र अर्ज करण्यासाठी तुम्हाला 5 स्टेप पूर्ण करायच्या आहेत.

7. पहिली स्टेप म्हणजे अर्ज करा. यामध्ये तुम्हाला स्वतःचे नाव मराठी आणि इंग्लिश मध्ये टाकून पद व घटक टाकून पुढील पृष्ठ वर जा या ऑप्शन वर क्लिक करा.

8. आता तुम्ही प्रोफाईल या ऑप्शन वर गेला आहात, तुम्ही ज्या सवलतीचा लाभ घेणार ते निवडा. व पुढे जा.

9. आता तुम्हाला संपर्क तपशिलाचा माहिती व्यवस्थितपणे भरून पुढे जायचे आहे.

10. नंतर इतर तपशील टाकायचा आहे.

11. त्यानंतर शैक्षणिक तपशील मध्ये तुमची शैक्षणिक माहिती योग्य रीतीने भरायची आहे.

12. आता पोलीस भरती 2022 महाराष्ट्र अर्ज अचूकपणे भरल्या नंतर तुम्हाला कागदपत्रं अपलोड करायची आहे. त्यासाठी कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करा.

13. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे.

14. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचे आहे. त्याकरिता पेमेंट वर क्लिक करा.

15. ओपन या प्रवर्गातील असाल तर 450 रू पेमेंट करा व तुमचा अर्ज आता संपूर्ण रित्या भरल्या गेला आहे.

16. आता तुम्हाला पोलीस भरती महाराष्ट्र च्या अर्जाची प्रिंट काढून जपून ठेवायची आहे.

 

पोलीस भरती 2022 महाराष्ट्र अर्ज मोबाईल वरून भरता येतो का?

हो. मित्रांनो पोलीस भरती महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया ही वर दिलेली आहे. अधिक माहिती करिता आम्ही खाली संपूर्ण व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे. त्यानुसार आपण मोबाईल वरून पोलीस भरती 2022 अर्ज भरू शकतो.

पोलीस भरती महाराष्ट्र अर्ज मोबाईल वरून करणार असाल तर Google Chrome वरून भरा. मोबाईल वरून पोलीस भरती अर्ज करताना Google Chrome ला desktop mode मध्ये ओपन करा. त्यानंतर खाली दिलेल्या प्रमाणे व्यवस्थित अर्ज भरा. अर्ज करताना स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्या

पोलीस भरती महाराष्ट्र कागदपत्रे सादर करण्यासाठी cam scanner या मोबाईल ॲप्लिकेशन च्या मदतीने फोटो स्कॅन करून q reduce या ॲप वरून त्यांची हवी असलेली साइज बनवून घ्या. त्यानंतर अर्ज करा.

 

पोलीस भरती 2022 अर्ज प्रक्रिया संबंधित संपूर्ण माहिती करिता हा व्हिडिओ पहा.

पोलीस भरती महाराष्ट्र महत्वाची कागदपत्रे Police Bharti Maharashtra 2022

1. कास्ट सर्टिफिकेट

2. Non Cremelayer

3. आधार कार्ड

4. दहावी बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्रे

5. जन्म प्रमाणपत्र

6. EWS सर्टिफिकेट

 

पोलीस भरती महाराष्ट्र हेल्पलाईन

खाली दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकांवर पोलीस भरती महाराष्ट्र 2022 अंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरणाऱ्या व्यक्तींना संपर्क साधायचा आहे. पोलीस भरती महाराष्ट्र संदर्भात कुठल्याही प्रकारचे अडचण असल्यास पोलीस भरती महाराष्ट्राच्या ऑफिशियल वेबसाईटवर खालील संपर्क नंबर तसेच ईमेल आयडी प्रकाशित करण्यात आलेले आहेत.

पोलीस भरती हेल्पलाईन: 022-61316418

ईमेल: mahapolicerecruitment.support@mahait.org

 

Police Bharti Maharashtra 2022 FAQ:

उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का?

पोलीस भरती महाराष्ट्र अंतर्गत उमेदवाराला एका पदाकरिता एकच अर्ज करता येतो. प्रत्येक अर्जाकरिता वेगवेगळे शुल्क भरावे लागते.

 

परीक्षा शुल्क परत मिळते का?

नाही

पोलीस भरती महाराष्ट्र अंतर्गत केलेला अर्ज चुकला! तर तो रद्द करता येतो का?

हो. पोलीस भरती महाराष्ट्र अंतर्गत केलेला अर्ज चुकला असेल तर पेमेंट ची प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यास. योग्य ते कारण प्रविष्ट करून पहिला अर्ज रद्द करून नवीन अर्ज करता येतो.

हे नक्की वाचा:- पर्सनल लोन कशी मिळवायची?

आजच्या या पोस्टमध्ये आपण पोलीस भरती 2022 अर्ज कसा करायचा? या विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. How to Apply Police Bharti 2022 संदर्भातील ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.