आपल्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत? असे करा चेक | How to check how many SIM cards are registered in your name

मित्रांनो आजचे युग हे डिजिटल आहे. त्यामुळे आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आज स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. जस जसे युग डिजिटल बनत आहेत तस तसे ऑनलाईन गुन्हा करणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. आपल्या कानावर सायबर क्राईमच्या अनेक घटना आलेल्या असेल. त्यामध्ये तुम्ही सिम, सिम कार्ड चा वापर याबद्दल नक्कीच ऐकले असेल. आपल्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत? हे सर्वात अगोदर आपण माहीत केले पाहिजे. आपल्या नावावर असलेले सिम कार्ड दुसरे कोणी वापरत आहेत का? तसेच ते वापरत असल्यास आपण त्याला बंद कसे करायचे? याविषयीची संपूर्ण प्रोसेस आजच्या या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो सिम कार्ड(sim card) हे एक महत्त्वपूर्ण असे साधन आहे. मोबाईल हा सिम कार्ड शिवाय अपूर्ण आहे. आपण आपल्या मोबाईल मध्ये बँकेचे व्यवहार करतो. तसेच इतर अनेक प्रकारचे डिजिटल व्यवहार करतो. तेव्हा आपण बँकेच्या माध्यमातून करत असल्यामुळे जो आपला मोबाईल नंबर बँकेची लिंक आहे ते सिम कार्ड आपण त्या मोबाईल मध्ये टाकून व्यवहार करू शकतो. म्हणजेच बँकेचे व्यवहार करण्याकरता आपले सिम त्याला एक्सेस देते. त्यामुळे सिम कार्ड अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयोगी आहे. मित्रांनो अनेक ऑनलाईन गुन्ह्यांमध्ये सिम कार्ड हे प्रमुख साधन आहे. ज्याप्रमाणे आपण सिम कार्डचा चांगला वापर करतो. त्याचप्रमाणे तुमच्या विरोधात सिम कार्डचा खरा वापर सुद्धा केल्या जाऊ शकतो. त्यामुळे सहसा आपण आपल्या नावावर सिम कार्ड कोणालाही देऊ नये. स्वतःचे सिम कार्ड स्वतःच्या नावावर असावे. इतर कोणत्याही व्यक्तीला आपल्या नावावर सिम कार्ड काढून देऊ नये.How to check how many SIM cards are registered in your name

 

जर आपल्या नावावरील सिम कार्ड(Sim Card) दुसरा कोणताही एखादा व्यक्ती वापरत असेल. आणि जर त्याच्याकडून काही चूक झाली किंवा त्याने एखादा गुन्हा केला तर ते सिम कार्ड आपल्या नावावर असल्यामुळे, सर्वप्रथम त्या गुन्ह्याची नोंद आपल्या नावावर होईल. त्यामुळे आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. जर एखादा व्यक्ती तुमच्या नावाचे सिम कार्ड वापरत असेल. आणि तुम्हाला त्याबाबत कोणतीही माहिती नसल्यास तुम्ही खाली दिलेली प्रोसेस पूर्ण करून ते सिम कार्ड बंद सुद्धा करू शकतात. Adhar Sim Status Check

हे नक्की वाचा:- एकात्मिक बाल विकास सेवा योजना

आपल्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत? हे असे पाहा How many SIM cards are registered in your name? See it like this

आता आपण आपल्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत, हे पाहण्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत. Sim Card Adhar card, Check Sim Card Status

1. सर्वप्रथम या https://tafcop.dgtelecom.gov.in/ वेबसाईटवर जा.

2. आता तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे.

3. आता सेंड ओटीपी या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

4. तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी गेलेला असेल तो त्या रकान्यामध्ये प्रविष्ट करा.

5. आता तुमच्यासमोर संपूर्ण डिटेल ओपन झालेली असेल. त्यामध्ये तुमच्या आधार कार्डवर किती मोबाईल नंबर रजिस्टर आहेत याची संपूर्ण माहिती आलेली असेल.

6. तसेच जर तुम्हाला त्यापैकी एखादा मोबाईल नंबर बंद करायचा असेल तर; त्या ठिकाणी नंबर बंद करायचे ऑप्शन वर क्लिक करून आपण तो नंबर बंद सुद्धा करू शकतो. Check Sim Card Status Online

हे नक्की वाचा:- शेतकरी अनुदान योजना 2022-23 महाराष्ट्र

अशाप्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने फक्त दोन ते तीन मिनिटात आपल्या आधार कार्ड नंबर सोबत किती मोबाईल नंबर रजिस्टर आहेत. म्हणजेच आपल्या नावावर किती सिम कार्ड सध्या चालू आहेत याची संपूर्ण माहिती काढू शकतो. तसेच एखादा नंबर बंद करायचा असल्यास तो नंबर सुद्धा बंद करू शकतो.

Leave a Comment