मित्रांनो आजकाल व्हाॅट्सऍप(What’s app) हे खूप प्रसिद्ध झालेले आहे. आपण व्हाट्सअप वर दररोज जितके काम करतो कष्ट करतो, त्यापेक्षा जास्त वेळ घालवत असतो. व्हाट्सअप च्या माध्यमातून आपण एकमेकांना माहितीचे आदान प्रदान करत असतो. मेसेजेस, व्हिडिओज, फोटोज अशा अनेक गोष्टी आपण व्हाट्सअप वर पाठवतो तसेच व्हिडिओ कॉल आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून आपण पेमेंट सुद्धा पाठवू शकतो. तसे पाहिले तर व्हाट्सअप वर आपल्याला सर्वात आधी कोणतीही माहिती प्राप्त होते. परंतु कधी कधी आपल्याला अनावश्यक असलेली माहिती वारंवार आल्यामुळे त्याचा आपल्याला खूप त्रास होतो. परंतु व्हाट्सअप वर आपण ब्लॉक फीचर्स ( Block Features) चा वापर करून या गोष्टी रोखू शकतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण आपल्याला व्हाट्सअप वर कोणी ब्लॉक केलेला आहे? हे कसं ओळखायचं? याविषयी काही टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेणार आहोत. how to know who blocked you on WhatsApp?
आपण व्हाॅट्सऍप(Block On WhatsApp) वर एखाद्या ला ब्लॉक केले की आपल्याला त्याच्याकडून कोणतेही प्रकारचे मेसेज, व्हिडिओ किंवा कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त होत नाही. म्हणजेच त्यांनी पाठवलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. व्हाट्सअप चे हे फीचर्स एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. परंतु आपल्याला व्हाट्सअप वर कोणी ब्लॉक केले? हे माहीत करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे फिचर उपलब्ध नाही. परंतु आपण काही गोष्टींच्या आधारे आपल्याला व्हाॅट्सऍपवर कोणी ब्लॉक केलेला आहे याची शंभर टक्के खात्री करू शकतो. त्यापूर्वी आपण व्हाट्सअप वर एखाद्याला ब्लॉक कसे करायचे याविषयी माहिती जाणून घेऊया.How to check who blocked you on WhatsApp. जर तुम्हाला सुद्धा व्हाॅट्सऍप वर ब्लॉक कसं करायचं? याबद्दल माहिती नसेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. block on WhatsApp in Marathi
व्हाॅट्सऍपवर ब्लॉक कसे करायचे? How to Block anyone on WhatsApp?
मित्रांनो जर आपल्याला एखादा व्यक्ती किंवा कोणीही व्हाट्सअप वर वारंवार मेसेजेस किंवा इतर माहिती पाठवून त्रास देत असेल. किंवा काही फेक युजर तुम्हाला व्हाट्सअप वर वेळोवेळी कॉल करत असेल किंवा इतर कोणतीही माहिती पाठवत असेल तर आपण त्यांना व्हाॅट्सऍपवर ब्लॉक करून त्यांच्यापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळवू शकतो. त्याकरिता व्हाट्सअप ने आपल्याला व्हाॅट्सऍप ‘ब्लॉक’ फीचर्स उपलब्ध करून दिलेले आहे. या व्हाॅट्सऍप ‘ब्लॉक’ फीचर्स(What’s App Block Features) च्या माध्यमातून आपण मोबाईल क्रमांक ब्लॉक करू शकतो. आपल्याला व्हाट्सअप वर कुणी ब्लॉक केलंय? हे देखील माहिती पाहिजे. How to block anyone on WhatsApp
व्हाॅट्सऍप वर ब्लॉक करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.
1. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचे व्हाॅट्सऍप ओपन करायचे आहे. आणि सेटिंग मध्ये जायचे आहे.
2. नंतर तुमच्यासमोर अकाउंट नावाचा पर्याय दिसेल, त्या पर्यावर क्लिक करा.
3. आता अकाउंट वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रायव्हसी नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
4. आता तुमच्यासमोर ‘Blocked Contacts’ हा पर्याय उपलब्ध असेल, त्यावर क्लिक करायचे आहे.
5. आता तुम्हाला ज्या कॉन्टॅक्ट ला ब्लॉक करायचे असेल. ऍड कॉन्टॅक्ट वर क्लिक करून तो नंबर तिथे ऍड करून घ्या. आता तो मोबाईल क्रमांक ब्लॉक झालेला आहे.
आपण आत्ताच व्हाॅट्सऍपवर ब्लॉक कसं करायचं ते जाणून घेतलेला आहे. आता आपण व्हाॅट्सऍपवर आपल्याला कुणी ब्लॉक केले हे कसं ओळखायचं? या विषयी माहिती जाणून घेऊया.How do we know if anyone blocked us on WhatsApp?
आपल्याला व्हाॅट्सऍपवर कुणी ब्लॉक केलंय? असे करा माहीत How to check who blocked you on WhatsApp
मित्रांनो आपल्याला व्हाॅट्सऍपवर कुणी ब्लॉक केलंय? हे माहिती करण्याच्या 4 टिप्स आणि ट्रिक्स आम्ही तुम्हाला खाली सांगितलेल्या आहेत.
1. स्टेटस (Status)आणि डी पी Profile Photo तपासणे
व्हाॅट्सऍपवर (What’s App)आपल्याला कोणी ब्लॉक केलं हे पाहण्याची सोपी आणि साधी पद्धत म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला ब्लॉक केले असेल तर आपण त्या व्यक्तीचे व्हाॅट्सऍप स्टेटस तसेच त्या व्यक्तीचा व्हाॅट्सऍप वरील प्रोफाइल फोटो पाहू शकत नाही. ते आपल्याला दिसत नाही. जर तुम्हाला यापूर्वी त्या व्यक्तीचा प्रोफाइल फोटो आणि व्हाट्सअप स्टेटस दिसत होते, आणि अचानक दिसणे बंद झाल्यास त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेले असू शकते. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर समोरच्या व्यक्तीचे व्हाट्सअप वर्जन जुने असेल तरीसुद्धा तुम्हाला हे दिसणार नाही. या ट्रिक वरून आपण अंदाज लावू शकतो की समोरच्या व्यक्तीने आपल्याला व्हाॅट्सऍप वर ब्लॉक केलेले आहे किंवा नाही.
2. मेसेज पाठवणे
मेसेज पाठवणे ही व्हाॅट्सऍपवर आपल्याला कोणी ब्लॉक केलं हे पाहण्याची दुसरी आणि महत्त्वाची पद्धत आहे. कारण की जर आपल्याला एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केलेले असेल तर आपण पाठवलेला मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाही. म्हणजेच आपण त्याला आपण व्हाॅट्सऍपवर मेसेज पाठवू शकत नाही. आपण त्याला मेसेज सेंड केल्यानंतर मेसेज पोहोचल्याच्या दोन टिक तिथे कधीच येणार नाही आणि असे झाल्यास समजून घ्यायची की त्या व्यक्तीने आपल्याला व्हाॅट्सऍपवर ब्लॉक केलेले आहे.
3. कॉल करून पाहणे
जर तुम्हाला व्हाॅट्सऍपवर एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केलेले आहे असे वाटत असेल तर, तुम्ही त्या व्यक्तीला व्हाॅट्सऍपवर कॉल करून पहावा. जर त्या व्यक्तीने तुम्हाला व्हाॅट्सऍपवर ब्लॉक केलेले असेल तर, तुमचा कॉल त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणजे तुमचा कॉल लागणार नाही. त्यामुळे तुम्ही या टिप्स ने सहजपणे तुम्हाला व्हाॅट्सऍपवर ब्लॉक केलेले आहे किंवा नाही हे जाणून घेऊ शकतात.
4. व्हाॅट्सऍप ग्रुप मध्ये ऍड करून पाहणे
व्हाॅट्सऍपवर आपल्याला कोणी ब्लॉक केलं हे पाहण्याची व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून पाहणे ही अतिशय सोपी आणि महत्त्वपूर्ण प्रोसेस आहे. जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या व्यक्तीने तुम्हाला व्हाॅट्सऍपवर ब्लॉक केलेले आहे, तर त्या व्यक्तीला तुम्ही व्हाॅट्सऍप ग्रुप मध्ये ऍड करून पहा. जर त्या व्यक्तीला तुम्ही व्हाॅट्सऍप ग्रुप मध्ये समाविष्ट करू शकले तर समजून घ्यायची की तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केलेले नाही. जर तुम्ही त्या व्यक्तीला व्हाॅट्सऍप ग्रुप मध्ये समाविष्ट करू शकले नाही तर समजून घ्यायची की त्या व्यक्तीने तुम्हाला व्हाॅट्सऍप वर ब्लॉक केलेले आहे.
अशाप्रकारे आपण वरील चार टिप्सच्या माध्यमातून आपल्याला व्हाॅट्सऍप वर कुणी ब्लॉक केले का ते चेक करू शकतो. या विषयावर आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतरांना देखील शेअर करा.