जिल्हा परिषदेच्या विविध योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरू; ही लागतात कागदपत्रे असा करा अर्ज | Jilha parishad yojana

मित्रांनो जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्ह्यातील महिलांकरिता तसेच पुरुषांकरिता व अपंगांकरिता विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांकरिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा? Jilha parishad yojana maharashtra आवश्यक कागदपत्रे इतर संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

 

जिल्हा परिषद योजना Jilha Parishad Yojana Maharashtra 2022

मित्रांनो जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध घटकांकरिता अनेक प्रकारच्या योजना या वेळोवेळी राबविण्यात येत असतात. अनेक योजना या महिलांशी संबंधित असतात तर अनेक योजना शेतकरी बांधवांची तसेच पशुपालन करणाऱ्यांशी संबंधित त्याचप्रमाणे बऱ्याच योजना अपंगांची निगडित असतात. जिल्हा परिषदेचे अनेक विभाग आहेत जे वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना राबवून जिल्ह्यातील लोकांना सन्मानाने जगता यावे तसेच त्यांच्या गरजा पूर्ण व्हावे याकरिता प्रयत्न करीत असते.

अशाच प्रकारे जालना जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सुद्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या विविध प्रवर्गातील व्यक्तींकरिता अनेक प्रकारचे योजना सध्या राबविण्यात येत आहे. याकरिता जालना जिल्हा परिषद ऑनलाईन अर्ज(Jilha Parishad Yojana Maharashtra) मागवित आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पुरुष तसेच महिला यांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा तसेच जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्या व जिल्ह्यातील व्यक्ती व्यवसायभिमुख व्हावे या उद्देशाने विविध योजना राबविण्यात येत आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत खालील योजनांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत :-

1. शेतकरी बांधवांसाठी तुषार संच

2. मिनी पिठाची गिरणी योजना

3. अपंग व्यक्तींना सायकल पुरविणारी योजना

4. पिठाची गिरणी योजना

5. मिरची कांडप यंत्र उपलब्ध करून देणारी योजना

6. झेरॉक्स मशीन उपलब्ध करून देणारी योजना

7. शेतकरी बांधवांना पंप संच उपलब्ध करून देणारी योजना

वरील सात योजनांकरिता जिल्हा परिषदेअंतर्गत(Zilla Parishad Scheme) ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी अर्ज करण्याची आव्हान सुद्धा करण्यात आलेली आहे.

 

जिल्हा परिषद योजना आवश्यक कागदपत्रे Required Documents for Zp Scheme

मित्रांनो जिल्हा परिषदेच्या(jilha parishad yojana) वरील योजनांचा लाभ मिळण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. अर्जदाराच्या नावाचे आधार कार्ड

2. अर्जदार ज्या गावात राहतो त्या गावचा रहिवासी दाखला

3. सातबारा

4. अपंग असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र

5. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अशा योजनांचा लाभ न घेतल्या बाबतचे ग्रामपंचायत मधील प्रमाणपत्र

महत्वाचं अपडेट : निराधार योजना नवीन नोंदणी सुरू 

योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता पात्रता व निकष :-

मित्रांनो जिल्हा परिषदेच्या वरील योजनांचा लाभ मिळण्याकरिता आपण खालील पात्रता व निकषांची पूर्तता करायला पाहिजे. जिल्हा परिषद योजना (Jilha Parishad Yojana) पात्रता व निकष खालील प्रमाणे आहेत.

1. अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा लागतो.

2. जिल्हा परिषद योजना अंतर्गत अर्ज करणारा अर्जदार मागासवर्गीय प्रवर्गातील असावा

3. अर्जदार दारिद्र रेषेखालील असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे लागते.

4. योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वय अठरा वर्षापेक्षा कमी असू नये

5. यापूर्वी अशा योजनांचा लाभ मिळालेला असल्यास आता लाभ मिळणार नाही

अशा प्रकारचे पात्रता व निकष हे या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता ठरवून देण्यात आलेले आहेत. जर तुम्ही सुद्धा या जिल्ह्यातील असाल आणि या योजनांचा लाभ मिळालेला नसेल तर तुम्ही आत्ताच अर्ज करावा.

 

जिल्हा परिषद योजना अर्ज कसा करायचा? How to apply Zilla Parishad Scheme?

जिल्हा परिषद योजना (Zilla Parishad Scheme) जालना अंतर्गत अर्ज करण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम गुगल वर जाऊन जालना जिल्हा परिषदेची वेबसाईट ओपन करायची आहे. त्यानंतर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

1. सर्वप्रथम जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत लाभ मिळण्याकरिता त्या जिल्ह्यातील जिल्ह्याची जिल्हा परिषद वेबसाईट ओपन करा

2. आता तुम्हाला योजना या ऑप्शन मध्ये जायचे आहे.

3. तुम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषदेचे विविध विभाग दिसत असेल त्यापैकी तुम्हाला ज्या विभागाअंतर्गत ऑनलाइन अर्ज करायचा आहे तो विभाग निवडून घ्या.

4. आता त्या विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तुम्हाला दिसत असतील त्यापैकी ज्या योजना अंतर्गत अर्ज करायचा आहे त्या योजनेवर क्लिक करा

5. आता तुम्हाला या ठिकाणी तुमचे आधार कार्ड नंबर टाकून पात्रता चेक करायची आहे.

6. आता तुमच्या समोरच्या योजनेचा संपूर्ण अर्ज ओपन झालेला आहे त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि शेवटी अर्ज सबमिट करा.

जिहा परिषद योजना आत्ताच अर्ज करा 

जिल्हा परिषद योजना संदर्भातील ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर जिल्ह्यातील सर्व मित्रांना व नातेवाईकांना पोहोचवा. अशाच प्रकारच्या योजना संदर्भात माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.