शेतकरी मित्रांनो जे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये कांदा या पिकाचे उत्पादन घेतात. अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने कांदा चाळ अनुदान योजना अंतर्गत कांदा चाळ स्थापित करण्याकरिता अनुदान वितरित करण्यात येत असते. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा चाळ मध्ये त्यांचा कांदा साठवून ठेवू शकतात. कांदा हे नाशवंत पीक आहे त्यांना जास्त दिवस आपण इतर पिकांप्रमाणे पोत्यामध्ये दाबून किंवा घरामध्ये एका कोपऱ्याला ठेवू शकत नाही. कांदा पिकांना जास्त दिवस टिकवण्याकरिता कांदा चाळ असणे आवश्यक असते. त्यामुळे कांदा चाळ(Kanda Chal Anudan Yojana) अंतर्गत नवीन अर्ज सुरू झालेल्या असून त्यासंदर्भात विस्तृत माहिती आता आपण जाणून घेऊया.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभ आता मिळणार आहे. या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून कागदपत्रे सुद्धा ऑनलाईनच सादर करावी लागतात. या योजनेअंतर्गत फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. Kanda Chal Anudan Yojana अंतर्गत आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी लाभ मिळवलेला आहे. आणि आता नवीन अर्ज करिता सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळवायचा आहे त्यांनी खालील प्रकारे ऑनलाईन अर्ज करावा. Kanda Chal Anudan Yojana Maharashtra
महत्वाचं अपडेट : 50,000 अनुदान योजना अंतर्गत पुढील हप्ता फक्त याच शेतकाऱ्याना मिळणार . यादी जाहीर
कांदा चाळ अनुदान योजना Kanda Chal Anudan Yojana Maharashtra ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. कांदा चाळ योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू असून पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच कांदा उत्पादनाचे प्रमाण महाराष्ट्रातील वाढावे याकरिता या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जर आपण कांदा चाळ मध्ये कांदा ठेवला तरच तो जास्त काळ टिकू शकतो. कांदा हे पीक टिकवणे महत्त्वाचे असते तसेच कष्टाची असते त्याकरिता योग्य व्यवस्थापन पाहिजे असते.
कांदा चाळ योजना अनुदान किती? How much is the Kanda Chaal Yojana subsidy?
मित्रांनो कांदा चाळ अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान महाराष्ट्र शासन वितरित करीत आहे. कांदा चाळ योजनेअंतर्गत शेतकरी पाच ते पंचवीस मॅट्रिक टन कांदा चाळ साठवून ठेवता येईल एवढ्या प्रमाणात कांदा चाळ भरू शकतो. कांदा चाळ योजना अंतर्गत एका शेतकऱ्याला 25 मॅट्रिक टन क्षमतेच्या कमाल दोन मर्यादेपर्यंतच अनुदान मिळते.
कांदा चाळ योजना आवश्यक कागदपत्रे Kanda Chaal Yojana Required Documents
कांदा चाळ योजना (kanda chal yojana maharashtra)अंतर्गत लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1. आधार कार्ड
2. कास्ट सर्टिफिकेट
3. बँक पासबुक
4. कांद्याचा योजनेचा यापूर्वी लाभ घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
5. आधार कार्ड बँकेसोबत लिंक असावे
महत्त्वाचा अपडेट: 5000 कोटी रुपयांच्या पिक विम्याची नवीन यादी आत्ताच जाहीर झाली! लगेच डाउनलोड करा
कांदा चाळ योजना अंतर्गत लाभ कोण मिळवू शकतो?
कांदा चाळ योजना अंतर्गत कांदा(kanda chaal) उत्पादक खालील घटकांना लाभ मिळता येतो. Kanda Chal Yojana Maharashtra
1. ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा वर कांदा या पिकांची नोंद आहेत असे शेतकरी
2. स्वतःच्या नावावर जमीन असलेले शेतकरी
3. शेतकरी महिला गट
4. स्वयंसहायता गट
5. शेतकरी उत्पादक संघ तसेच शेतकऱ्यांची सहकारी संस्था
वरील दर्शविलेल्या सर्वांना कांदा चाळ अनुदान योजना अंतर्गत लाभ मिळवता येतो.
कांदा चाळ अनुदान योजना संदर्भातील ही माहिती महत्त्वपूर्ण वाटत असल्यास सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच माहिती करता या वेबसाईटवर भेट देत रहा.