कापूस बाजार भाव 10,000 पार आजचे सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव | Kapus Bajar Bhav

मित्रांनो आजच्या या बातमीत आपण आजचे कापुस बाजार भाव जाणून घेणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील विविध बाजार समिती मधील कापसाचे बाजार भाव आपण जाणून घेणार आहोत. कापसाचे बाजार भाव दहा हजार पार झालेले आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. पांढऱ्या सोन्याला दहा हजार रुपये पेक्षा जास्त दर Kapus Bajar Bhav मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वेगवेगळ्या बाजार समितीतील कापसाचे बाजार भाव जाणून घेऊया

 

मित्रांनो दिवाळीपासून बाजार समितीमध्ये कापसाची आवक थोड्या प्रमाणात चालू झालेली होती त्याप्रमाणे सुरुवातीला आठ ते नऊ हजार रुपये असणारे कापसाचे बाजार भाव मागील महिन्यात दहा हजार पाचशे रुपये पर्यंत पोहोचले असल्यामुळे शेतकऱ्यांनी हळूहळू बाजारात कापूस विकायला सुरुवात केली होती. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाचे भाव वाढेल या अपेक्षने कापूस अजून पर्यंत विकलेल्या नाही. त्यानंतर कापसाच्या भावात चल उतार चालत होता नंतर कापसाचे भाव कमी व्हायला सुरुवात झालेली होती आणि ते पुन्हा आठ हजार रुपये पर्यंत पोहोचले होते. Kapus Bajar Bhav

हे नक्की वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत नवीन अर्ज सुरू 

सध्या कापसाच्या बाजारभावाचा विचार केल्यास साडेनऊ हजार ते दहा हजार दोनशे रुपये पर्यंत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये बाजार भाव आहेत. Kapus Bajar Bhav यावर्षी शेतकऱ्यांना कापसाची पीक घेण्याकरिता येणाऱ्या खर्चात वाढ झाली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली असल्यामुळे कापसाच्या पिकाची प्रचंड नुकसान झालेले होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे कापसाचे उत्पादन यावर्षी होणार नाही असा तज्ञांनी विचार व्यक्त केला होता. Cotton Rate In Maharashtra

 

कापसावर येणाऱ्या खर्चाचा विचार केल्यास कापसाला दरवर्षी दहा हजार रुपये पेक्षा जास्त भाव मिळाला तर ते शेतकऱ्यांना परवडेल अन्यथा खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरणार नाही. त्यामुळे आता कापसाचे भाव ( Kapus Bajar Bhav ) दहा हजार रुपये पर्यंत पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे. हळूहळू शेतकरी बाजारामध्ये कापसाची विक्री करण्यास आणत आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी कापसाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकरी करत असून त्यापेक्षाही चांगला भाव मिळण्याची संकेत दिसत आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्यात कापूस आणि सोयाबीन ही दोन पिके मोठ्या प्रमाणावर पिकवली जातात. सध्या शेतकऱ्यांची कापसाचे विकणे चालू आहे आणि शेतकरी त्यांच्या गरजेनुसार थोडा थोडा कापूस बाजारामध्ये विक्रीकरिता आणत असल्यामुळे कापसाच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत नसून बाजार भाव हे नऊ हजार ते दहा हजार रुपये पर्यंत स्थिर राहत आहे.

 

आजचे सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा – 

 

कापुस बाजार भाव वाढणार का? Kapus Bajar Bhav :-

शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी कापसाला तेरा हजार रुपये 14 हजार रुपये पर्यंत जास्तीत जास्त दर मिळालेला होता. परंतु गेल्या वर्षीचा विचार केल्यास सुरुवातीला म्हणजेच गेल्या वर्षी याच महिन्यात कापसाचा बाजार भाव हा 7000 ते 8000 रुपये होता. परंतु या वर्षीचा याच महिन्याचा विचार केल्यास ते भाव आठ हजार ते दहा हजार या दरम्यान असल्यामुळे आणखीन बराच काळ शेतकऱ्यांचा कापूस बाजारात विक्री करण्याकरिता येणार नाही. त्यामुळे येणाऱ्या पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचा कापूस संपूर्ण प्रमाणात वेचनी होऊन ते शेतकरी साठवून ठेवतील. त्यामुळे पुढील चार ते पाच महिन्यात कापसाच्या बाजारभावाची गेल्या वर्षी सारखीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजेच कापसाचे बाजार भाव वाढण्याची शक्यता आहे.

 

हे आम्ही वर्तवलेली शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःचे विश्लेषण स्वतः करूनच त्यांचा कापूस विक्री करिता आणावा. आम्ही सांगतो म्हणून बाजार भाव वाढेल असे काहीही नाही. येणाऱ्या काळात कापसाचे होणारी उत्पादन त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी यावर कापसाचे भाव वाढणार की नाही हे अवलंबून आहे.

Leave a Comment