शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी शासनाच्या वतीने तुमचे पैसे दुप्पट करून देणारी महत्त्वपूर्ण अशी सरकारी योजना राबविण्यात येत आहे. सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत आपण गुंतवणूक करून काही दिवसातच आपले पैसे दुप्पट करू शकतो. आपण गुंतवणार असलेल्या या योजने अंतर्गत सरकार आपल्याला गॅरंटी प्रदान करते. या योजनेमध्ये तुम्हाला पैसे दुप्पट करण्याकरिता सुरुवातीला पैसे गुंतवावे लागतील. तर चला मित्रांनो किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra Yojana 2022) संदर्भात विस्तृत माहिती आता आपण जाणून घेऊया.
सरकारच्या वतीने खास शेतकरी बांधवांकरिता शेतकऱ्यांचे पैसे दुप्पट करून देणारी महत्त्वपूर्ण अशी किसान विकास पत्र योजना ही राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंतर्गत आपण किमान एक हजार रुपये गुंतवून गुंतवू शकतो तर जास्तीत जास्त रक्कम गुंतवण्यावर कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. किसान विकास पत्र(Kisan Vikas Patra Scheme) योजनेअंतर्गत गुंतवलेला तुमचा पैसा सुरक्षित असणारा असून यावर सरकार हमी देत आहे.
किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra Scheme Maharashtra)ही केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे तसेच शेतकरी आत्मनिर्भर व्हावा या दृष्टीने केंद्र सरकार वेळोवेळी महत्त्वपूर्ण अशी पावले उचलत आहे. याच उद्देशाने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी तसेच सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गुंतवणुकीवर गॅरंटी मिळावी याकरिता महत्त्वपूर्ण अशी किसान विकास पत्र योजना(Kisan Vikas Patra Yojana 2022 Maharashtra) राबवली आहे.
किसान विकास पत्र योजना(kisan vikas patra yojana maharashtra) अंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर सरकारच्या वतीने 6.9 टक्के दराने व्याज दिले. ज्याच्या माध्यमातून काही वर्षातच आपण आपले पैसे दुप्पट करू शकतो. त्याचबरोबर ही योजना शेतकऱ्यांच्या हितार्थ असल्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या मार्फत गुंतवलेल्या रकमेवर गॅरंटी प्रदान करते जेणेकरून शेतकरी त्यांचा पैसा या योजनेमध्ये बिनधास्त गुंतवू शकतात.
किसान विकास पत्र योजना रक्कम दुप्पट होण्यास लागणारा कालावधी
शेतकरी मित्रांनो किसान विकास पत्र योजना अंतर्गत सरकारच्या वतीने गुंतवलेल्या रकमेवर 6.9 टक्के दराने वार्षिक व्याज दिली जाते. या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड हा दहा वर्ष चार महिने असा आहे. म्हणजेच दहा वर्षांमध्ये शेतकरी त्यांच्या मार्फत या योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम दुप्पट करू शकतात. म्हणजेच किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेले पैसे दहा वर्षात दुप्पट होते. या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या पैशांमध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क राहत नाही. Kisan Vikas Patra Scheme
किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक कशी करावी?
केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या किसान विकास पत्र योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला आपले पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना किसान विकास पत्र सर्टिफिकेटच्या स्वरूपात प्रदान करण्यात येते. जे आपण खरेदी करू शकतो आणि योजनेचा कालावधी पूर्ण होतात आपली रक्कम दुप्पट मिळवू शकतो.
किसान विकास पत्र (kisan vikas patra yojana 2022 Maharashta)आपण एक हजार रुपये, पाच हजार रुपये तसेच दहा हजार रुपये आणि पन्नास हजार रुपयांच्या स्वरूपात खरेदी करू शकतो. जर एखाद्या गुंतवणूकदाराला 50 हजार रुपये पेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल तर जास्त गुंतवणूक सुद्धा करता येते परंतु त्याकरिता तुम्हाला पॅन कार्ड डिटेल द्यावी लागेल.
किसान विकास पत्र (kisan vikas patra yojana maharashtra)अंतर्गत आपण पोस्ट ऑफिस मधून मॅच्युरिटी पिरेड संपल्यानंतर पैसे काढू शकतो. किसान विकास पत्र मध्ये गुंतवणूक करताना जी डिटेल दिली होती ज्या प्रकारची माहिती दिली होती तीच माहिती त्या ठिकाणी देऊन आपण आपली रक्कम काढू शकतो.
किसान विकास पत्रावर कर्ज सुविधा उपलब्ध आहे का?
किसान विकास पत्रावर गुंतवणूक केलेल्या रकमेवर आपल्याला कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येते. किसान विकास पत्र मध्ये गुंतवणूक केली आणि आपला मॅच्युरिटी पिरेड आणखीन पूर्ण व्हायचा असेल तर आपल्याला कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.