शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी बांधवांना सोलार पंप उपलब्ध करून देण्यात येत आहे. याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये कुसुम सोलर पंप योजना राबविण्यात येत आहे. कुसुम सोलर पंप योजना(Kusum Yojana 2022 Maharashtra) अंतर्गत नवीन कोटा उपलब्ध झालेला असून नवीन अर्ज हे मागविण्यात येत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण कुसुम सोलर पंप योजना नवीन अर्ज संबंधात संपूर्ण माहिती तसेच या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया हे जाणून घेणार आहोत.
मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र (Kusum Yojana Maharashtra)अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सोलार पंप स्थापित करण्याकरिता अनुदान देण्यात येत आहे. कुसुम सौर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 3 एचपी ते 7.5 एचपी पर्यंत पंपाच्या स्थापनेकरिता 90 टक्केपर्यंत अनुदानित करण्यात येत आहे. कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत यापूर्वी उपलब्ध करून दिलेला सौर पंपाचा कोटा संपलेला असून नवीन कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार कुसुम सौर पंप योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील खालील 16 जिल्ह्यांंकरिता नवीन कोटा उपलब्ध करून दिल्यामुळे अर्ज सुरू झालेले आहेत.
कुसुम सोलर पंप योजना(Kusum Yojana Maharashtra 2022) अंतर्गत नवीन कोटा हा खालील 16 जिल्ह्यांना उपलब्ध करून दिलेला आहे त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, अकोला, वर्धा, ठाणे, अमरावती, सिंधुदुर्ग, सातारा, नागपूर, भंडारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, पालघर या 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जर तुम्ही सुद्धा या 16 जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि तुम्हाला कुसुम योजना अंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता कुसुम सौर पंप योजना ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत.
पीएम किसान नवीन नोंदणी सुरू; आत्ताच अर्ज करा
शेतकरी मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना(Kusum Yojana Maharashtra) अंतर्गत वरील जिल्ह्यातील शेतकरी असल्यास तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करायचा आहे कोटा संपायच्या पूर्वी तुम्ही अर्ज केला तर बरं होईल. अर्ज तुपे ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत असून आता आपण कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेणार आहोत.
कुसुम सोलर पंप योजना अनुदान
शेतकरी मित्रांनो वरील सोळा जिल्ह्यांकरिता कुसुम सोलर पंपाचे (Kusum Solar Pump Scheme Maharashtra)अर्ज सुरू झालेले असल्यामुळे तीन एचपीच्या पंपाकरिता तसेच पाच एचपी च्या पंपाकरिता 90% तर सात एचपी च्या पंपाकरिता 60 टक्के अनुदान वितरित करण्यात येत आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता राखीव कोटा ठेवण्यात आलेला असून त्यांना अनुदान सुद्धा जास्त देण्यात आलेले आहे सर्व साधारण प्रवर्गातील व्यक्तींना कुसुम योजना अंतर्गत 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे.
कुसुम सोलर पंप योजना आवश्यक कागदपत्रे Documents Required for Kusum Solar Pump Scheme
कुसुम सोलर पंप योजना(Kusum Yojana) अंतर्गत लाभ मिळण्याकरिता लाभार्थ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. जर आपण खाली दिलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात असाल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येतो.
1. सातबारा व आठ अ उतारा
2. शेतामध्ये विहीर किंवा कुपनलिका किंवा पाण्याचा स्त्रोत असावा लागतो
3. जमिनीच्या सातबारावर विहीर किंवा सिंचन स्त्रोतांची नोंद असावी लागते
4. शेतकऱ्याचे आधार कार्ड
5. सामायिक क्षेत्र असल्यास इतर व्यक्तींचे ना हरकत प्रमाणपत्र
6. बँक पासबुक
7. प्रतिज्ञापत्र
8. पासपोर्ट साईज चे फोटो
वरील कागदपत्रे आपल्याला कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज मिळवण्याकरिता सादर करावी लागतात.
कुसुम सोलर पंप योजना लाभार्थ्यांची निवड:-
कुसुम सोलर पंप योजना(Kusum Scheme Maharashtra) ही महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असून नवीन अर्ज सुरू झालेले असले तरीसुद्धा लाभार्थ्यांची निवड प्रत्येकाची करण्यात येईल असे नाही त्याकरिता काही पात्रता तसेच प्रक्रिया ठरविण्यात आलेली आहे.
या योजनेअंतर्गत शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळवता येतो जसे की विहीर असणारे शेतकरी त्याचप्रमाणे शेततळे व बोरवेल असणारे शेतकरी. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता तुमच्याकडे पारंपारिक विजेचे कनेक्शन उपलब्ध नसावे लागते. म्हणजे तुमच्या बोरवेल किंवा विहिरीवर महावितरण चे वीज कनेक्शन नसावे. त्याचप्रमाणे कुसुम सोलर पंप योजना(Kusum Scheme Maharashtra) अंतर्गत लाभ हा ज्यांनी अटल सौर कृषी पंप योजना अंतर्गत किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केलेला होता परंतु लाभ मिळाल्या नाही अशांना सुद्धा लाभ मिळवता येतो.
कुसुम सर पंप योजना अंतर्गत तीन एचपी तसेच पाच एचपी व साडेसात एचपी इत्यादीचा सौर कृषी पंप आपल्याला मिळवता येतो.
कुसुम सोलर पंप योजना संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करता या वेबसाईटवर भेट देत रहा.