या शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभागातर्फे 18 लाख रु नुकसान भरपाई जाहीर | Lampy Nuksan Bharpai Maharashtra

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने या शेतकऱ्यांकरिता 18 लाख रु नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात चर्मरोग लंपी आजारामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जनावरांचे नुकसान झाले होते. बरीच जनावर दगावली होती. महाराष्ट्र शासनाच्या वतीने या चर्मरोगाच्या आजारावर नुकसान भरपाई(Lampy Nuksan Bharpai Maharashtra) जाहीर केलेली होती. त्यामुळे आता या संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती आता आपण विस्तृतपणे जाणून घेऊया.

 

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्र राज्यात झालेल्या लंपि रोगाच्या प्रादुर्भावामुळे ज्या पशुपालकांची नुकसान झालेली होती, त्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार आहे. यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने या चर्मरोगाच्या साथीमुळे ज्या पशुपालकांची नुकसान झालेले होते. Lumpy Nuksan Bharpai अशा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळपास 7000 पशुपालकांना 18 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. आणि आता पुढील शेतकऱ्यांना पुन्हा अठरा लाख रुपये नुकसान भरपाई वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे या रोगाच्या प्रादुर्भावामुळे ज्या पशुपालकांची नुकसान झालेले होते त्यांना दिलासा मिळालेला आहे. Nuksan Bharpai Yadi

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तांनी ही नुकसान भरपाई पशुपालकांना तात्काळ वितरित करण्याचे आदेश दिलेले आहे. चर्मरोगाच्या प्रादुर्भावामुळे वितरित करायची नुकसान भरपाईची रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली, असून त्यांच्यामार्फत पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ ही रक्कम जमा करण्यात येईल किंवा चेक देण्यात येईल. Lampy Nuksan Bharpai Nidhi Vitarit, Nuksan Bharpai Yadi

 

त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या वतीने सुद्धा या चर्मरोगाच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता पशुसंवर्धन विभागाची केंद्रीय पथके महाराष्ट्रात पाठवण्यात आलेली असून ही पथके तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे. या पथकाच्या असे निर्देशनास आले की महाराष्ट्रातील जवळपास 34 जिल्ह्यांमध्ये एकूण 366 संसर्ग केंद्र आहेत ज्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आलेला आहे. वरील संसर्ग केंद्रामध्ये जवळपास तीन लाख बाधित पशुधन आढळलेले आहे. त्याचप्रमाणे बाधित पशुधनावर उपचार सुद्धा सुरू असून त्यापैकी बरेच पशुधन बरे झालेले आहेत.

 

या चर्मरोगाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 20 हजार पशुधनाचा मृत्यू झालेला असून त्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने निधी सुद्धा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी 7000 पशुपालकांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 18 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे. उर्वरित पशुपालकांच्या खात्यामध्ये लवकरच नुकसान भरपाई जमा करण्यात येईल. याकरिता 18 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून लवकरच पशुसंवर्धन विभाग शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. Nuksan Bharpai Maharashtra

 

या लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत 12 जिल्ह्यातील मृत झालेल्या जनावरांच्या पशुपालकांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आलेल्या असून उर्वरित जिल्ह्यातील तसेच वरील 12 जिल्ह्यातील ज्या पशुपालकांच्या बँक खात्यामध्ये अजून रक्कम जमा झालेली नाही त्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे.