शेतकऱ्यांना या योजने मार्फत कमी व्याज दरात मिळतय कर्ज; आता वेळेत आणि गरजेनुसार कर्ज मिळणार; जाणून घ्या कर्ज मिळवण्याची प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे | Loan on KCC Card

वेळोवेळी संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी राज्य तसेच केंद्र शासन विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवित असते. तसेच आपल्या महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची ध्येय निश्चित केलेल्या असून त्याकरिता वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत पुरविणाऱ्या अनेक योजना सुरू करण्यात येत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती उपयोगी कार्याकरिता कर्ज उपलब्ध करून देणारी महत्त्वपूर्ण अशी योजना म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू आहे. या योजनेच्या मार्फत शेतकरी सुलभरीत्या कर्ज मिळवू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जाच टेन्शन मिटलेला असून या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज मिळण्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेऊया.

 

शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला Agriculture Loan हवे असेल तर ते किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून मिळवणे सोपे झाले आहे. शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामधून दरवर्षी अपेक्षित उत्पन्न होईल याची कोणत्याही प्रकारची हमी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाने साथ न दिल्यास त्याच्यावर उपासमारीची वेळ येते. त्यामुळे शेतकऱ्यांना सहज व सुलभ रित्या शेती उपयोगी कार्याकरिता कर्ज मिळवण्यासाठी शासनाने किसान क्रेडिट कार्ड सुरू केलेले आहे.

 

अनेकदा शेतकऱ्यांनी शेतीवर केलेला खर्च सुद्धा निघत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अन्य प्रकारच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले पीक संपूर्णता नष्ट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या शेतीवर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जातो तसेच पदरात काहीच पडत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. परंतु शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घेणे परवडत नाही. जर शेतकरी बँकांकडे कर्ज मागण्यास गेला तर त्यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणजेच शेतकऱ्यांना सुलभ रित्या बँका कर्ज देत नाही त्याकरिता अनेक प्रकारच्या जाचक अटी असतात.

 

शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू

हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने संपूर्ण देशभरात किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केलेली आहे. या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज देण्यात येत असतं. या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी बांधव तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकतात. या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळालेल्या कर्जावर शेतकऱ्यांना अत्यंत कमी दराने व्याजदर आकारण्यात येतो. तसेच शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज परतफेड केल्यास व्याज दरामध्ये सवलत देखील उपलब्ध करून देण्यात येते.

कोणतीही सहकारी तसेच ग्रामीण बँक तसेच नॅशनल बँका शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून देते.

 

किसान क्रेडिट कार्ड करिता कोणते शेतकरी पात्र आहे

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी सहज प्रकारचे शेतकरी पात्र असून जे शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवत आहेत असे शेतकरी देखील हे कार्ड काढण्यास पात्र ठरतात. अल्पभूधारक शेतकरी तसेच गरीब शेतकरी या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड काढून कर्ज मिळण्यास पात्र आहेत.

 

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा ते येथे पहा

 

आवश्यक कागदपत्रे

मित्रांनो जर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड काढून तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा लाभ मिळवायचा असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असायला पाहिजे.

1. अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड

2. जमिनीचा सातबारा आठ अ उतारा

3. मतदान कार्ड आवश्यक असल्यास

4. जमिनीशी संबंधित इतर कागदपत्रे

 

वरील कागदपत्रे किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आवश्यक आहे.

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा ते येथे पहा

 

वरील लिंक वरून तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी ऑफलाइन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा या संदर्भात माहिती मिळवू शकतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे किसान क्रेडिट कार्ड अत्यंत महत्त्वाचे असून शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड अत्यंत महत्त्वाचे ठरते.

 

Leave a Comment