आता बघितले असता सर्वांच्याच घरी गॅस आहे त्यामुळे गॅस बुकिंग करताना आता टेन्शन घेण्याची काही गरज नाही कारण व्हाट्सअप वरून आता गॅस बुकिंग करता येणार आहे अशी सुविधा निघालेली आहे. त्याचप्रमाणे अशीच अनेक प्रकार आहेत ज्या प्रकारावरून घरबसल्या गॅस बुकिंग करता येतो. परंतु आता व्हाट्सअप वरून सुद्धा गॅस सिलेंडर बुकिंग करता येते. त्यासाठी विविध गॅस बुकिंग करण्याकरिता विविध गॅस नंबर खालील प्रमाणे दिलेले आहे, त्या नंबर वरून बुकिंग करता येते.
पुढील नंबर वरून गॅस बुकिंग करा व्हाट्सअप द्वारे
जर तुमचा एचपी गॅस असेल तर तुम्हाला गॅस बुकिंग करण्याकरता सर्वप्रथम 9222201122 हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव करा सेव्ह केल्यानंतर बुक असा मेसेज पाठवा त्यानंतर तुमचा गॅस बुकिंग होईल.
जर तुमच्याकडे इंडियन गॅस असेल तर,बुकिंग करण्याकरता तुम्हाला पुढील क्रमांक तुमच्या मोबाईल नंबर मध्ये सेव करावा लागेल 7588888824 हा क्रमांक सेव केल्यानंतर व्हाट्सअप वरून मेसेज पाठवा बुकिंग पूर्ण होईल.
भारत गॅस सिलेंडरची बुकिंग करायची असल्यास तुमच्या मोबाईल मध्ये 1800224344 हा नंबर सेव्ह करा. सेव झाल्यानंतर बुकिंग असा मेसेज पाठवा नंतर तुमचा गॅस बुकिंग होईल.
आज-काल सर्वीकडे गॅस आहे त्यामुळे सर्वांना गॅस बुकिंग करायचे काम वेळोवेळी पडते त्यामुळे आता सर्वात सोपी पद्धत आलेली आहे या पद्धतीने नुसार तुम्ही घरबसल्या तुमचा गॅस सिलेंडर बुकिंग करू शकता, त्यामुळे कुठे जाण्याची गरज पडत नाही व वेळ वाया जात नाही.
आजकाल शक्यतो सर्वजण कामांमध्ये गुंतलेली असते, त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष जाऊन सिलेंडर बुकिंग करणे शक्य होत नाही त्यामुळे आता सर्वांकडून मोबाईल असते त्यामुळे व्हाट्सअप वरून गॅस बुकिंग करणे अत्यंत सोपे झालेले आहे.