महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर विविध योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरू | MahaDBT Famers Portel Application Start

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल एक योजना अनेक अंतर्गत विविध शेतकरी योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर विविध योजनांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून या पोर्टल अंतर्गत शेतकरी बांधवांना एकाच ठिकाणाहून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात येतो. जे शेतकरी महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळू इच्छित असेल त्यांना ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे. विविध योजनांकरिता MahaDBT Famers Portel ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

 

महा डीबीटी शेतकरी योजना MahaDBT Shetkari Yojana :-

शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना एकाच पोर्टलवरून विविध योजनांचा लाभ मिळवता यावा तसेच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांकरिता वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करण्याची आवश्यकता पडू नये त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध असाव्या या दृष्टीने शासनाने हे महाडीबीटी फार्मर्स पोर्टल विकसित केले आहे. या MahaDBT Famers Portel अंतर्गत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना अर्ज करण्यात येतो. तसेच ज्यांच्या नावावर शेती आहे असे कोणतेही शेतकरी लाभ मिळविण्यास पात्र आहे.

 

महाडीबीटी शेतकरी MahaDBT Shetkari Yojana योजनांची महत्त्वाची अशी वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांनी एक वेळेस या पोर्टल अंतर्गत अर्ज केल्यानंतर पुन्हा त्याच शेतकऱ्याला त्याच योजने करिता अर्ज करण्याची आवश्यकता नाही. जर शेतकरी योजनांच्या पहिल्या लॉटरीमध्ये त्या शेतकऱ्याची निवड झाली नसेल तर तो शेतकरी येणाऱ्या दुसऱ्या लॉटरी करिता त्या योजनेकरिता पात्र असतो त्यामुळे पुन्हा पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता भासत नाही. शेतकऱ्यांकरिता हे एक महत्त्वपूर्ण असे पोर्टल असून या अंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन सबमिट करावी लागतात व शेतकऱ्यांना मिळालेले योजनांची अनुदान डायरेक्टली शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.MahaDBT Famers Portel

 

महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर समाविष्ट योजना

महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर एकाच पोर्टलच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना प्रदान करण्यात येत असल्यामुळे या मध्ये अनेक योजनांच्या समावेश करण्यात आलेला आहे. महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर समाविष्ट असणाऱ्या विविध योजना खाली दिलेल्या आहेत.MahaDBT Shetkari Yojana

1. मधुमक्षिकापालन

2. हरितगृह

3. शेडनेट हाऊस

4. प्लास्टिक मल्चिंग

5. पॅक हाऊस

6. फळबागांना आकार देणे

7. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन

8. कांदा चाळ

9. फळबाग लागवड योजना

10. शेततळ्यातील पन्नी

11. सामायिक शेततळे

12. इतर फळबाग लागवड योजना

13. ट्रॅक्टर

14. ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे

15. प्रक्रिया संच

16. पावर टिलर

17. कल्टीवेटर

18.कापणी यंत्र

19. नांगर

20. बैलचलित अवजारे

21. मनुष्य अवजारे

22. स्वयंचलित अवजारे

23. पेरणी यंत्र

24 मल्चिंग यंत्र

25. मळणी यंत्र

26. रोटावेटर

27. वखर

28. ठिबक सिंचन

29. तुषार सिंचन

30. व इतर अनेक योजना

 

अशा प्रकारच्या अनेक योजनांचा लाभ एकाच पोर्टलच्या MahaDBT Famers Portel अंतर्गत शेतकऱ्यांना मिळत आहे. वरील सर्व योजना महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर राबविण्यात येत असतात.

महत्वाचं अपडेट : मिनी डाल मिल योजना अर्ज सुरू 

महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर विविध योजनांकरिता असा अर्ज करा

शेतकरी मित्रांनो वरील प्रकारच्या कोणत्याही योजनांकरिता तुम्हाला महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर MahaDBT Shetkari Yojana  ऑनलाईन अर्ज सादर करावा लागत असतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या योजना या पोर्टलवर सुरू करण्यात आलेल्या असतात त्यावेळेस तुम्हाला या योजनांकरिता अर्ज करावा लागत असतो. आपण तुम्हाला समजण्याकरिता एखाद्या योजनेचे उदाहरण घेऊन चालू जर तुम्हाला वरील योजनांपैकी कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर या योजनेकरिता अर्ज करायचा असेल तर ज्यावेळेस ट्रॅक्टर योजना अंतर्गत नवीन अर्ज सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. आम्ही तुम्हाला खाली स्टेपच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया समजून सांगितलेली आहे.

1. सर्वप्रथम माहिती शेतकरी पोर्टलवर शेतकरी म्हणून तुम्हाला नोंदणी करायची आहे.

2. तुमची नोंदणी केल्यानंतर तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड तयार केला असेल किंवा तुमचा आधार कार्ड नंबर आणि ओटीपी च्या माध्यमातून हे पोर्टल लॉगिन करून घ्यावे.

3. यामध्ये तुम्ही कोणते पीक घेता तसेच तुमच्या शेतातील जलसिंचनाची साधने इत्यादी माहिती प्रविष्ट करा.

4. नोंदणी करताना शेतकऱ्याची संपूर्ण माहिती विचारलेली प्रविष्ट करा.

5. आता वरीलपैकी कोणत्याही योजना अंतर्गत अर्ज करायचा असल्यास या पोर्टलच्या होम पेजवर अर्ज करा हा ऑप्शन तुम्हाला दिसेल.

6. त्यावर क्लिक करा विविध योजना तुमच्यासमोर दिसतील त्यापैकी ज्या योजना सुरू आहेत त्यावर क्लिक करून अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अर्जाचा फॉर्म ओपन होईल तो व्यवस्थितपणे भरा आणि शेवटी अर्ज सबमिट करा.

7. या स्टेप मध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे आता अर्ज सबमिट झाल्याचा तुम्हाला एसएमएस प्राप्त झाला असेल.

 

महाडीबीटी शेतकरी पोर्टल अर्ज केल्यानंतर प्रक्रिया

शेतकरी मित्रांनो महाडीबीटी फार्मर्स पोर्टलवर तुम्ही एक वेळ अर्ज केल्यानंतर अनेक वेळा त्या अर्जाची लॉटरी लागत असते पहिल्या वेळेस निवड न झाल्यास तो अर्ज तसाच ठेवायचा आहे पुढच्या वेळेस तुमचा नंबर लागू शकतो. शेतकरी पोर्टलच्या अंतर्गत अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड होत असते. ज्या शेतकऱ्यांची योजने करिता निवड झाली त्यांना एसेमेस प्राप्त होतो त्यांनी पोर्टलवर लॉगिन करून कागदपत्रे व पूर्वसंबंधी पत्र अपलोड करायचं आहे त्यानंतर पेमेंट मागणी करायची आहे. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या वतीने लाभार्थ्याच्या बँक खात्यात योजनेची अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते.

 

महाडीबीटी फार्मर्स पोर्टल नवीन अर्ज सुरू :-

शेतकरी मित्रांनो महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या अंतर्गत सन 2022 23 करिता शेतकरी योजनांकरिता अर्ज सुरू झालेले असून विविध योजनांचे अर्ज सध्या सुरू आहेत. ज्यांना या पोर्टल अंतर्गत अर्ज करायचे असतील त्यांनी पोर्टलवर लॉगिन करून लवकरात लवकर अर्ज करण्याची आवाहन करण्यात येत आहे.

महाडीबीटी शेतकरी योजना संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी अशा व्यक्त करतो. ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा अशाच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.