शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत असते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्र व अवजारांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून अनुदान वितरित करण्यात येत असते. शेतकऱ्यांनी या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते. निवड झालेल्या शेतकऱ्यांना पूर्व संमती पत्र वितरित करण्यात येत असून ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे, त्यांची यादी आता आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेची MahaDBT Farmers Scheme Maharashtra पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत.mahadbt shetkari yojana 2022
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतीच महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण योजनांची लॉटरी काढलेली आहे. या महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ऑनलाइन सोडतीमध्ये अनेक शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली असून पात्र शेतकऱ्यांना निवड झाल्याचा एसएमएस सुद्धा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आता अशा शेतकऱ्यांना पूर्व समिती पत्र मिळणे सुरू झालेल्या असून याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. MahaDBT Farmers Scheme
महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर पूर्वसंमती काय असते?
शेतकरी मित्रांनो महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर विविध योजना राबविण्यात येत असून एखाद्या योजनेअंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याची निवड झाल्यास त्या शेतकऱ्याला सर्वप्रथम पूर्व संमती पत्र देण्यात येत असते. महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या नियमानुसार शेतकरी बांधवांनी कोणत्याही योजनेची सुरुवात म्हणजेच योजनेअंतर्गत लाभ मिळवल्यानंतर त्या योजनेचे काम पूर्ण करायचे असते जसे की तुम्हाला महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमचा अर्ज डिलीट झालेला असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमची लॉटरी पद्धतीने निवड करून पूर्व संमती पत्र वितरित करण्यात येते. सदर शेतकऱ्याला आता ट्रॅक्टर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर करिता अनुदान मिळणार असून पूर्वसंमती मिळाल्यानंतरच त्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरची खरेदी करावी लागते. पूर्व संमती मिळण्याच्या आधी कोणत्याही योजनेअंतर्गत काम सुरू करता येत नाही. त्यामुळे या योजनांमध्ये शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला पूर्वसंमती ऑनलाइन पद्धतीने देऊन नंतर काम सुरू करायची असते.MahaDBT Farmers Scheme, mahadbt shetkari yojana 2022
50000 अनुदान दुसरी यादी या तारखेला येणार | MJPSKY 50000 Anudan 2nd Yadi
शेतकरी योजनांच्या ऑनलाईन लॉटरीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड होत असते त्यांना पूर्व संमती मिळाल्यानंतर पोर्टलवर काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात त्यानंतर शेतकऱ्यांना ते यंत्र किंवा ती वस्तू खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती वितरित करण्यात येत असते. जर एखाद्या शेतकऱ्याने पूर्वसंमती मिळण्याआधीच वस्तूची खरेदी केली तर त्या वस्तूवर अनुदान मिळत नाही. Maha Dbt Farmers Portel
पूर्व संमती मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी कुठे मिळेल? Maha Dbt Farmers List
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध योजना अंतर्गत शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे अशा शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिलेली असून अशा शेतकऱ्यांची यादी आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. जय शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांची यादी आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील विविध योजनांकरिता पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी डाऊनलोड करू शकता.
अकोला,अमरावती,अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्याची यादी डाऊनलोड करा.
पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांची यादी डाऊनलोड करा
वरील दहा जिल्ह्यातील पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी आपल्याकडे उपलब्ध झालेली असून इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी उपलब्ध झाल्यानंतर नवीन पोस्ट च्या माध्यमातून तुम्हाला कळविण्यात येईल. महाडीबीटी शेतकरी योजना संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटत असेल. ही माहिती तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा, अशाच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.