महाडीबीटी शेतकरी योजनांची तिसरी लॉटरी लागली; लॉटरीत तुमचे नाव आहे का ते असे चेक करा | Mahadbt Lottery

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत विविध प्रकारच्या शेतकरी योजना राबविण्यात येत असतात. शेतकऱ्यांना एकाच पोर्टलच्या अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळवता यावा याकरिता महाडीबीटी शेतकरी पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. महाडीबीटी शेतकरी पोर्टल करू शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येत असते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत विविध शेतकरी योजनांकरिता अर्ज केलेला होता त्या योजनांची लॉटरी आता लागलेली आहे. महाडीबीटी शेतकरी योजनांच्या तिसऱ्या लॉटरीमध्ये तुमचे नाव चेक करण्यासाठी तुम्हाला ती लॉटरी पहावी लागेल. महाडीबीटी तिसऱ्या लॉटरी संदर्भातील विस्तृत माहिती आता आपण जाणून घेऊया.

 

MahaDBT former scheme अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येत असते. आपल्याकडे महाडीबीटी लॉटरी ची संपूर्ण लिस्ट आलेली आहे. त्यामुळे आपण त्या लॉटरीच्या यादीमध्ये नाव चेक करून संबंधित योजनेअंतर्गत लाभ मिळवू शकता.

 

महाडीबीटी शेतकरी योजनांची लॉटरी MahaDBT Lottery Maharashtra संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्याची लागलेली असून या यादीमध्ये पहिल्या व दुसऱ्या यादीच्या ज्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता अशा शेतकऱ्यांना घेण्यात आलेले आहे. महाडीबीटी शेतकरी योजनांची तिसरी लॉटरी संपूर्ण पीडीएफ महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे. ही आधी आपण आपल्या मोबाईल तसेच कम्प्युटरवर पाहू शकतो या यादी मध्ये आपली संपूर्ण माहिती आहे जसे की अर्जदाराचे नाव त्यांचा मोबाईल नंबर त्याचप्रमाणे अर्जदाराला कोणती लॉटरी लागली, शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान या संदर्भात विस्तृत माहिती लॉटरीमध्ये दिलेली आहे.

हे नक्की वाचा : कापसाचे बाजारभाव 10000 पार 

MahaDBT List मध्ये ज्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही अशा शेतकऱ्यांना पुढील यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांची नाव महाडीबीटी तिसऱ्या यादीत नाही अशा शेतकऱ्यांना त्यांचा अर्ज रद्द करण्याची आवश्यकता नाही तसेच पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही त्यांचा अर्ज आपोआप पुढील यादी करिता पात्र ठरणार आहे.

 

महाडीबीटी लॉटरी मध्ये नाव आले आता काय करायचे? Maha Dbt Lottery 2022-23 Maharashtra

शेतकरी मित्रांनो ज्यांचे नाव महाडीबीटी तिसऱ्या लॉटरीमध्ये आलेले आहे त्यांनी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर लॉगिन करायचे आहे त्यानंतर पूर्व संमती पत्र डाउनलोड करून इतर सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की शेतकऱ्यांची वैयक्तिक कागदपत्रे व योजने संबंधित कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केलेली आहे त्यांनाच पुढील लाभ मिळवता येईल. जर आपली लॉटरीमध्ये निवड होऊन सुद्धा आपण कागदपत्रे अपलोड केली नाही तर आपला अर्ज रद्द करण्यात येईल. कागदपत्रे, बिल तसेच पूर्वसंमती पत्र हे अपलोड करून अनुदानाची मागणी शेतकऱ्यांना करायची आहे. mahadbt lottery

 

शेतकरी योजनांचे अनुदान कधी मिळेल?

महाडीबीटी लॉटरी MahaDBT Lottery मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना शेतकरी योजनांचे अनुदान हे अनुदानाची मागणी ऑनलाईन पद्धतीने केल्यानंतर मिळत असते. योजने संबंधित अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतावर येऊन योजनेच्या कामाची पाहणी करतात त्यानंतर अप्रूवल देतात आणि नंतर शासनाच्या वतीने निधी प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करतात. shetkari yojana lottery

Maha Dbt Lottery मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एसएमएस प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना महाडीबीटी लॉटरी मध्ये नाव आलेले आहे किंवा नाही ते पाहायचे असेल त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायांमध्ये जाऊन चेक करायचा आहे. जर तिथे तुम्हाला eligible for lottery असे दिसत असेल तर तुमची निवड झालेली नाही. आणि त्या ठिकाणी win Lottery किंवा upload documents असे दिसत असल्यास तुमची निवड महाडीबीटी लॉटरी मध्ये झालेली आहे असे समजावे.

Maha Dbt Lottery संदर्भातील ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment