मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात मेंढी पालन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकरिता महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण अशी योजना राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत 20 मेंढ्या व 1 नर मेंढा पालन करण्याकरिता अनुदान वितरित करण्यात येत आहे. या योजनेचे नाव महामेष योजना(Mahamesh Mendhi Palan Yojana) असे असून या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच योजनेचा उद्देश व कागदपत्रे याविषयी माहिती आता आपण जाणून घेऊया.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील पशुपालकांना अनुदानित तत्त्वावर मेंढ्या व नर मेंढा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यात महत्त्वपूर्ण अशी मेंढ्यांचा गट वाटप करणारी योजना राबविण्यात येत आहे. या महामेष मेंढी पालन योजना(Mahamesh Mendhi Palan Yojana) अंतर्गत त राज्यातील भटक्या जमाती प्रवर्गातील व्यक्तींना या मेंढ्यांच्या गटाचे वाटप करण्यात येणार आहे. मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येणारी ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. sheli mendhi palan yojana online application
मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबांना या मेंढ्यांच्या गटाचे वाटप करण्यात येत असल्यामुळे या समाजातील आर्थिक अडचणी दूर होतील तसेच लोकांना शेतीबरोबरच एक दुसरा शेती संबंधित व्यवसाय सुरू करता येईल तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील जवळपास एक लाख कुटुंबांना मेंढ्यांच्या गटाचे वाटप(Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra) करण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने हा महत्त्वपूर्ण असा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असून भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारावी तसेच समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा याकरिता या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या महामेष योजनेअंतर्गत ऑनलाइन(sheli mendhi palan yojana online application) अर्ज करायचा आहे.
मेंढी पालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वीस मेंढ्या व एक नर मेंढा वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती प्रवर्गातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेअंतर्गत अर्ज करता येतो. भावेश मेंढी पालन योजना संदर्भात विस्तृत माहिती महामंडळाच्या वेबसाईटवर दिलेली आहे.sheli mendhi palan yojana
मेंढी व नर मेंढा वाटप योजना आवश्यक कागदपत्रे :-
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या वीस मेंढ्या व एक नर मेंढा गट वाटप योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
1. अर्जदाराकडे भटक्या जमाती प्रवर्गातील असल्याबाबतची जात प्रमाणपत्र असावे
2. आधार कार्ड
3. रहिवासी दाखला
4. व इतर कागदपत्रे महामंडळाने सांगितलेली
वरील कागदपत्रे या योजनेअंतर्गत असल्यास आपण लाभ मिळवू शकतो.
महामेष योजना अंतर्गत अर्ज कुठे करायचा?
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणाऱ्या महामेष मेंढी पालन योजना(Mahamesh Mendhi Palan Yojana) अंतर्गत अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने महामेष मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अधिकृत व्यवसाय आम्ही खाली उपलब्ध करून दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.
मित्रांनो वर दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही या योजनेअंतर्गत वीस मेंढ्या व एक नर मेंढा करिता अनुदान मिळवू शकतात. मेंढी पालन योजना संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल अशी आशा व्यक्त करतो. योजने संदर्भात कोणतीही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करून विचारा आम्ही तुमच्या अडचणीचे नक्कीच उत्तर देऊ. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा.