आपल्या महाराष्ट्र राज्यात विविध आजारांचा उपचार मोफत व्हावा याकरिता तसेच विविध सर्जरी तसेच शस्त्रक्रिया मोठमोठ्या बिमाऱ्या यांच्यावर लागणारा खर्च शासनाद्वारे उचलण्यात यावा याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही राबविण्यात येत आहे. Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Maharashtra अंतर्गत एका कुटुंबातील व्यक्तींना वार्षिक पंधरा लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत मिळवता येतो. आजच्या पोस्टमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
आपल्या भारत देशात केंद्र शासनाच्या वतीने आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही राबविण्यात येत असते. तसेच आपल्या महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही एकत्रित पणे राबविण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील गरीब व गरजू लोकांना उपचाराच्या खर्चामध्ये सवलत देण्यात येते. आपल्या महाराष्ट्र राज्यातच महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चे अंतर्गत ही योजना राबविण्यात येत असते.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana अंतर्गत मोठमोठ्या गंभीर आजारांवर उपचार करून देण्यात येत असतो. या योजनेअंतर्गत जवळपास 271 उपचार पद्धतीचा समावेश आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 121 रुग्णालयांच्या मार्फत तज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने मोठमोठ्या आजारांवर मोफत उपचार करून देण्यात येतो.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभ कसा मिळवायचा?
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र कुटुंबातील व्यक्तींना एखाद्या बिमारीवर उपचार मिळवण्याकरिता किंवा एखादी सर्जरी करण्याकरिता ज्या रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार सुविधा उपलब्ध आहे म्हणजेच ज्या दवाखान्यांचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे अशा रुग्णालयात योजनेचे एक मदत केंद्र असेल तिथे आरोग्यमित्र ला भेटून या संबंधित प्रोसिजर पूर्ण करायचे आहे. Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana अंतर्गत लाभ मिळण्याकरिता त्या रुग्णालयाला कोणत्याही प्रकारची शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही.
या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता रुग्णांना या योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयांमध्ये भरती करावे लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून रुग्णालयातील योजने संबंधित आरोग्य मित्रांना ही कागदपत्रे सुपूर्द करावी लागेल.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत कोण लाभ मिळवू शकतो?
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana अंतर्गत अंत्योदय कार्ड असणारे व्यक्ती किंवा कुटुंब धारक तसेच पांढरे किंवा अन्नपूर्णा कार्ड धारक कुटुंब, पिवळे रेशन कार्ड धारक कुटुंब तसेच केसरी रेशन कार्ड धारक कुटुंब व शेतकरी कुटुंब तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगार इत्यादी कुटुंब धारकांना या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभ मिळवता येतो.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत किती रुपये लाभ मिळता येतो?
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पंधरा लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य लाभ मिळवता येतो.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आवश्यक कागदपत्रे
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Maharashtra अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आरोग्य सेवांचा लाभ मिळण्याकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1. रेशन कार्ड
2. आधार कार्ड
3. मतदान कार्ड
वरील कागदपत्रे सादर करून पात्र कुटुंब महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभ मिळवू शकतात. जर एखाद्या लहान बालकाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर त्याचा जन्माचा दाखला व त्या बालकाचा त्याच्या वडीला सोबतचा फोटो लागतो.
या योजने अंतर्गत संपर्क
या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास जसे की कोणत्या रुग्णालयांचा समावेश या योजनेअंतर्गत होतो कोणकोणत्या उपचार पद्धती या अंतर्गत समाविष्ट आहेत तसेच इतर माहिती करिता तुम्ही खाली संपर्क क्रमांक वर संपर्क साधू शकतात.
फोन नंबर: 18002332200/ 155388
या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट जा
वर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे, योजने संदर्भात विस्तृत माहिती हवी असेल किंवा कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रत्येक रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे का?
नाही. ही योजना प्रत्येक रुग्णालयामध्ये उपलब्ध नाही, मोठमोठे रुग्णालय या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या रुग्णालयांची माहिती तुम्हाला या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत जे रुग्णालय समाविष्ट आहे त्या रुग्णालयामध्ये जाऊन तुम्ही मोफत उपचार घेऊ शकतात.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत वर्षातून किती वेळा लाभ मिळवता येतो?
मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोठमोठ्या व गंभीर आजारांवर उपचार करण्यात येतो त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या गंभीर आजार झाला तर या योजनेअंतर्गत उपचाराची जी लिमिट ठरवून देण्यात आलेली आहे तोपर्यंत मोफत उपचार मिळवून देण्यात येतो. जर वर्षभरात तुमच्यावर दोन ट्रीटमेंट करण्यात आल्या तरी सुद्धा करून देण्यात येऊ शकतात.
या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक लाभ मिळवू शकतो का?
असे कुठेही नमूद करण्यात आलेले नसून या योजनेअंतर्गत पिवळे, केशरी तसेच पांढरे व अंत्योदय व बांधकाम कामगार कार्डधारक कुटुंबातील व्यक्तींना लाभ मिळण्यात येतो.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संदर्भातील ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर इतरांना देखील नक्की शेअर करा. जेणेकरून एखाद्या गरजू व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येईल आणि मोठ्या आजारांपासून मुक्तता मिळवता येईल.