महिला व बालविकास भरती 2022 महाराष्ट्र सुरू | Mahila Bal Vikas Vibhag Bharti Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याच्या महिला व बाल विकास विभागांमध्ये विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता खुशखबर प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवणे सुरू झालेले आहे. महिला व बाल विकास विभाग(Mahila Bal Vikas Vibhag Bharti Maharashtra) अंतर्गत भरतीची जाहिरात सुद्धा काढण्यात आलेली असून याबाबत सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो महिला व बाल विकास विभाग उस्मानाबाद अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील महिला व बालविकास (Mahila Bal Vikas Vibhag Bharti) विभागामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता अर्ज करण्याची आवाहन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या वतीने महिलांकरिता एक नवा उपक्रम हा केंद्रीय बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आला होता. त्याचे नाव सखी वन स्टॉप सेंटर असे होते. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागांमध्ये रिक्त असणाऱ्या प्रदान करिता भरती करण्याचे ठरले होते. आणि आता या संबंधित सविस्तर जाहिरात सुद्धा काढण्यात आलेली आहे.

 

महिला व बाल विकास विभागामध्ये(Bal Vikas Vibhag Bharati) होत असलेली भरती प्रक्रिया विषयी संपूर्ण माहिती करिता तसेच संपूर्ण तपशील जाणून घेण्याकरिता प्रकाशित करण्यात आलेली मूळ जाहिरात पहावे. या विभागात होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून महिला व बाल विकास विभागांमध्ये भरती प्रक्रिया करिता करावयाचा अर्ज सुद्धा ऑफलाईनच करायचा आहे. आता आपण महिला व बाल विकास विभाग अंतर्गत असणाऱ्या पदांचा तपशील जाणून घेणार आहोत.

 

भरती करिता शैक्षणिक पात्रता

1. उमेदवार कमीत कमी दहावी पास असावा

2. मनाचा प्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला असावा

 

महिला व बालविकास विभाग भरती पदांचा तपशील

महिला व बाल विकास विभागामध्ये खालील पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

1. कार्यालय सहाय्यक – 01 जागा

2. कायदासमूपदेशक – 01 जागा

3. सुरक्षारक्षक – 03 जागा

4. वैद्यकीय मदतनीस – 01 जागा

5. केंद्र प्रशासक – 01 जागा

6. व्यक्ती अध्ययन कर्ता – 02 जागा

7. बहुउद्देशीय कर्मचारी/स्वयंपाकी – 03 जागा

8. मनोसामाजिक समुपदेशक – 01 जागा

वयोमर्यादा

महिला व बालविकास भरती(Mahila Bal Vikas Vibhag Bharti) अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांची वयोमर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे तसेच जास्तीत जास्त 43 वर्ष असावे.

 

महिला व बालविकास भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख

महिला व बाल विकास विभाग भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 नोव्हेंबर 2022 आहे.

 

अर्ज प्रक्रिया व अर्ज कुठे करायचा?

मित्रांनो महिला व बाल विकास विभाग उस्मानाबाद अंतर्गत होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून या भरती अंतर्गत अर्ज हा तुम्हाला खालील पत्त्यावर जमा करायचा आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रूम नंबर 10, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळमजला, उस्मानाबाद

महत्वाचं अपडेट : वन विभाग भरती महाराष्ट्र सुरू आत्ताच अर्ज करा 

महिला व बाल विकास विभाग भरती अंतर्गत उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना

जर तुम्ही या विभागांतर्गत भरती करिता अर्ज भरणारा असाल तर या सूचना नक्की तुम्ही वाचून घेतल्या पाहिजे.

मित्रांनो महिला व बालविकास विभागामध्ये (mahila balvikas vibhag bharti) होणारी ही भरती प्रक्रिया कंत्राटी बेस असून ज्यांची निवड करण्यात येईल त्यांना कंत्राटी तत्वावर काम देण्यात येणार आहे तसेच कंत्राटाची मुदत ही 11 महिने असणार आहे. या भारतीय अंतर्गत अनाथ उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया अस्थायी स्वरूपाची असल्यामुळे उमेदवारांना शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर हमीपत्र नियुक्तीच्या वेळेस सादर करावे लागणार आहे. या भरती अंतर्गत अर्ज करणारा अर्जदार हा मानसिक शारीरिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा लागतो. नियुक्तीच्या वेळेस निवड झालेल्या उमेदवारांना पोलीस चरित्र प्रमाणपत्र सादर करावे लागेल. जर निवड झाल्यानंतर एखाद्या उमेदवाराला नोकरी सोडायची असेल तर तशी सूचना एक महिन्यापूर्वी द्यावी लागेल. या भरती अंतर्गत उमेदवारांची गुणवत्ता यादी ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे अंतर्गत करण्यात येईल.

 

अटी व शर्ती :-

1. भारतीय अंतर्गत भरावयाचा अर्ज हा अर्जदाराने कार्यालयांमध्ये अंतिम तारखेच्या आत ते सुद्धा कार्यालयीन वेळेमध्ये जमा करायचा आहे.

2. उशिरा प्राप्त होणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

3. अर्ज व्यवस्थितपणे वाचून न चुकता भरावा त्याचप्रमाणे सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावा.

4. एखाद्या उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यास त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येईल.

5. अर्जावर उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यावा.

6. Mahila Bal Vikas Vibhag Bharti अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी.

 

भरती ची जाहिरात डाऊनलोड करा

महिला व बालविकास विभाग भरती संदर्भातील ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत राहा