महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना मिनी डाळ मिल योजना अंतर्गत डाळ मिल वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिनी डाळ मिलकरिता 65 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. मिनी डाळ मिल(Mini Dal Mill Subsidy Yojana Maharashtra) संदर्भातील विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांकरिता महत्त्वपूर्ण अशी मिनी डाळ मिल योजना(mini dal mill yojana) सुरू केलेली आहे. राज्यातील शेतकरी समृद्ध व्हावा या उद्देशाने शेतकऱ्यांना मिनी दाल मिलकरिता 65% पर्यंत अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. ही योजना राज्य शासन कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून राज्यातील शेतकरी जास्तीत जास्त आधुनिकीकरणाकडे वळला पाहिजे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे या उद्देशाने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे त्यापैकी ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच मिनी डाळ मिल स्थापन करून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवून घेऊ शकतात. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर झाल्यास शेतकरी समृद्ध होईल आणि शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल.
मिनी डाळ मिल योजना अंतर्गत अनुदान :-
शेतकरी मित्रांनो मिनी डाळ मिल योजना ही संपूर्ण राज्यातील सर्व शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येणारा असून या योजनेअंतर्गत अर्जदार महिला शेतकरी असल्यास त्याला 65 टक्के अनुदान किंवा एक लाख 25 हजार रुपये अनुदान त्यापैकी जी रक्कम कमी असेल ती वितरित करण्यात येईल. त्याचप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गातील इतर शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 50 टक्के पर्यंत अनुदान वितरित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेऊन मिनी डाळ मिल स्थापन(mini dal mill subsidy scheme maharashtra) करू शकतात. याकरिता महाराष्ट्र शासन अर्थ सहाय्य पुरवित आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणारी महत्त्वपूर्ण अशी ही योजना ठरणार आहे.
मिनी डाळ मिल योजना आवश्यक कागदपत्रे :-
शेतकरी मित्रांनो मिनी दाल मिल योजना(mini dal mill yojana maharashtra) अंतर्गत लाभ मिळण्याकरिता अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
1. शेतकऱ्यांच्या जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा
2. अर्जदार हा जात प्रवर्गातून लाभ मिळणार असेल तर त्या संबंधित जातीचा दाखला
3. शेतकऱ्यांची आधार कार्ड
4. आधार संलग्न बँक पासबुक
5. पासपोर्ट आकाराचे फोटोज
6. दरपत्रक
7. उपकरणे घेण्याच्या अधिकृत विक्रेत्याचे कोटेशन
इत्यादी कागदपत्रे या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता आवश्यक आहेत.
मिनी डाळ मिल योजना संदर्भात संपर्क तसेच अधिक माहिती
राज्यातील शेतकऱ्यांकरिता राबवण्यात येणारी मिनी डाळ मिल योजना mini dal mill subsidy ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणारी महत्त्वपूर्ण अशी शासकीय योजना असून या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असल्यास त्याचप्रमाणे या योजने संदर्भात कोणत्याही प्रकारचा अडचण असल्यास व इतर माहिती हवी असल्यास तुम्ही तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी तसेच कृषी सहाय्यक जिल्हा कृषी अधिकारी यांना भेटू शकतात व माहिती मिळवू शकतात.
मिनी डाळ मिल योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया Mini Dal Mill Yojana
शेतकरी मित्रांनो मिनी डाळ मिल योजना अंतर्गत अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने मागविण्यात येणार आहे. तुमच्या तालुक्याच्या कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून तुम्हाला ऑफलाइन विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करायचा आहे. तो अर्ज मिळाल्यानंतर त्या अर्जावर विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरायची तसेच वर दिलेली सर्व कागदपत्रे जोडायची आणि अर्ज कृषी अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करायचा. कृषी अधिकारी यांच्या मार्फत अर्जाची छाननी करण्यात येईल व पात्र अर्जांना पुढील प्रक्रिया करिता पाठवून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात येईल.
दाल मिल योजना संदर्भातील ही माहिती सर्व मित्रांना नक्की शेअर करा. मिनी दाल मिल योजना संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करून प्रश्न विचारू शकतात. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची आम्ही वेळेमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करू. व तुमच्या शंकांचे नक्कीच समाधान करू. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा शासकीय तसेच निमशासकीय योजनांकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.