शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत या शेतकऱ्यांनी अल्पमुदतीची कर्ज घेतलेले होते व त्यांच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली आहे. अशा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याच्या खात्यावर 50 हजार रुपये प्रत्येकी वितरित करण्यात येणार होते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने यापूर्वी 50000 अनुदान योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सर्व शेतकऱ्यांची यादी प्रकाशित केलेल्या आहेत. पन्नास हजार अनुदान योजनेची पहिली यादी प्रकाशित झालेली असून त्या यादीतील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. आता 50000 अनुदान योजनेअंतर्गत दुसरी यादी लवकरच प्रकाशित होणार आहे. 50,000 अनुदान दुसरी यादी(MJPSKY 50,000 Anudan 2nd Yadi ) कधी येणार या संदर्भातील माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
मित्रांनो राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये राबविण्यात आलेली होती. या योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमाफी योजनेत बसले होते अशा शेतकऱ्यांना शासन 50000 प्रोत्साहन म्हणून वितरित करीत आहे. पन्नास हजार अनुदानाची पहिली यादी यापूर्वी शासनाने प्रकाशित केलेली होती आता लवकरच महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50 हजार अनुदान योजनेची दुसरी यादी प्रकाशित करण्यात येत आहे. 50000 अनुदानाची यादी कधी येणार? 50000 अनुदानाच्या दुसऱ्या यादीत कोणत्या शेतकऱ्यांची नाव येणार याविषयी माहिती आता आपण जाणून घेऊया. mahatma jyotirao phule shetkari karjmukti yojana MJPSKY 2019
50000 अनुदान योजनेच्या पहिल्या यादी ज्यांचे नाव आलेले नव्हते परंतु ते नियमित कर्ज परतफेड करत होते अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची वाट पहावी लागत आहे. राज्यातील अनेक शेतकरी 50 हजार अनुदान योजनेची दुसरी यादी कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत असून आता त्यांच्याकरिता महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे दुसरी यादी येण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच दुसरी यादी येऊन या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहे. regular karjmafi, MJPSKY 50,000 Anudan 2nd List, Niyamit Karjmafi 50000 Anudan
50000 योजना दुसरी यादी कधी येणार? MJPSKY 50,000 Anudan 2nd List
शेतकरी मित्रांनो पन्नास हजार अनुदान योजनेची दुसरी यादी लवकरच प्रकाशित करण्यात येणार असून याची तारीख सुद्धा महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे. पन्नास हजार प्रोत्साहन रकमेची दुसरी यादी 7 डिसेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधी दरम्यान येणार आहे. mahatma jyotirao phule shetkari karjmukti yojana
दुसऱ्या यादीत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार?
शेतकरी मित्रांनो पन्नास हजार अनुदान योजनेच्या दुसऱ्या यादीमध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची नाव येणार असून ज्या शेतकऱ्यांचे पन्नास हजार अनुदान योजनेच्या पहिल्या यादीत नाव आलेले नाही अशा शेतकऱ्यांना 50000 अनुदान योजनेअंतर्गत दुसऱ्या यादीत समाविष्ट करून लाभ वितरित करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2017- 20 या कालावधीमध्ये घेतलेले अल्पमुदती पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली आहे असे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र असतील. 50000 Anudan Yojna Maharashtra
50000 अनुदानाची दुसरी यादी कुठे मिळेल?
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरच 50000 अनुदानाची दुसरी यादी ही उपलब्ध करून देण्यात येणार असून या यादीत आपले नाव आले का ते चेक करण्याकरिता तुम्हाला जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन तुमचे नाव पहावे लागेल. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर ही यादी प्रकाशित करण्यात येणारा असून सीएससी केंद्र चालकांकडे ही यादी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे ही यादी तुम्हाला तुमच्या बँकेकडे सुद्धा उपलब्ध होईल. MJFKY
50000 अनुदान योजना दुसऱ्या यादी संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी अशा व्यक्त करतो. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.