महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये नवीन भरती जाहीर; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज | MSRTC Recruitment 2022

मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेली असून आपल्या महाराष्ट्र राज्यातील परिवहन महामंडळामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात दहावी पास उमेदवारांना सुद्धा अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही दहावी पास असाल तर एसटी महामंडळामध्ये नोकरी करण्यासाठी तुमच्यासाठी उत्तम संधी आलेली आहे. वेगवेगळ्या पदांकरिता महामंडळामध्ये भरती निघालेली असून अर्ज प्रक्रिया तसेच कागदपत्रे याविषयी विस्तृत माहिती जाणून घेऊया.MSRTC Recruitment 2022

नुकतीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामध्ये नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून जे उमेदवार पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने राज्य परिवहन महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. MSRTC Bharti Apply. या भरती अंतर्गत अर्ज करणारा उमेदवार हा किमान दहावी पास असावा लागतो.MSRTC Recruitment 2022

 

महाराष्ट्र राज्य परिवहन भरती अंतर्गत पदे

मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या भरतीच्या अंतर्गत विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पदांकरिता वेगवेगळ्या अर्ज करू शकतात. एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या भरती अंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या अर्जासाठी वेगवेगळी फी भरावी लागेल. MSRTC Recruitment 2022

राज्य परिवहन महामंडळ भरती अंतर्गत खालील पदे भरण्यात येणार आहे.

1. पेंटर

2. इलेक्ट्रिशियन

3. मेकॅनिकल

4. वेल्डर

5. शीट मेटल वर्कर

अशा प्रकारच्या पाच वेगवेगळ्या पदांकरिता एसटी महामंडळामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. MSRTC Bharti Apply

 

एस टी महामंडळ भरती अंतर्गत जागा

एस टी महामंडळ भरती अंतर्गत वरील पाच पदे भरण्यात येणार असून याकरिता एकूण 39 जागा उपलब्ध आहेत. सदर पात्र उमेदवारांना ज्या जागी करिता तो पात्र असेल त्यासाठी अर्ज करायचा आहे. जसे की तुम्ही वेल्डरचा आयटीआय केलेला असेल तर तुम्ही वेल्डर या पदाकरिता अर्ज करावा.

एस टी महामंडळ भरती अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

एसटी महामंडळ भरती वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या एसटी महामंडळ भरती अंतर्गत उमेदवारांचे वय 18 ते 30 यादरम्यान असावे लागते. मागासवर्गीय उमेदवारांना वयाच्या मर्यादेमध्ये पाच वर्षाची सूट देण्यात येत आहे. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 18 ते 30 मर्यादा आहे.

 

एसटी महामंडळ भरती आवश्यक कागदपत्रे

मित्रांनो एस टी महामंडळाच्या भरती करिता अर्ज करण्यासाठी आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र

2. कास्ट सर्टिफिकेट

3. आधार कार्ड

4. दहावी बोर्ड प्रमाणपत्र किंवा मार्कशीट

वरील कागदपत्रे असल्यास आपण एसटी महामंडळ भरती अंतर्गत अर्ज करू शकतो.

एस टी महामंडळ भरती सूचना

एस टी महामंडळ भरती अंतर्गत उमेदवारांना अर्ज हा केवळ ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. एस टी महामंडळ भरती अंतर्गत अर्ज रद्द करण्याचा तसेच पद भरती मध्ये बदल करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेला अर्ज करावा. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान योजना नवीन यादी जाहीर

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या एसटी महामंडळ भरती संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर यांना देखील नक्की शेअर करा, अशाच महत्वपूर्ण माहिती करता या वेबसाईटवर भेट देत राहा.