मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र; राज्य सरकारची नवीन योजना | Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र ही राबविण्यात येत आहे. या मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी ही Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra सुरू केली आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

 

मुख्यमंत्री किसान योजना Mukhyamantri Kisan Yojana आपल्या महाराष्ट्र राज्यात लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची 6000 रुपये आणि मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्राचे 6000 रुपये अशी मिळून वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यामध्ये कृषी विभागाची बैठक आयोजित केलेली होती. त्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण शेतकरी बांधवांसाठी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांनी या योजनेचे स्वागत केलेले आहे. Mukhyamantri Kisan Yojana ही पूर्णतः राज्य पुरस्कृत योजना असणार आहे.

 

मुख्यमंत्री किसान योजना अंतर्गत किती अनुदान मिळणार?

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री किसान योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये अनुदान मिळणार आहे.Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra

 

मुख्यमंत्री किसान योजना अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे?

मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र (Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra)

अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील अल्प व अतल्पभूधारक शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे.

हे नक्की वाचा:- किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र

कुटुंबातील किती व्यक्तींना लाभ मिळणार आहे?

मुख्यमंत्री किसान सन्मान योजना(Mukhyamantri Kisan Yojna) अंतर्गत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळता येईल.

 

शेतकऱ्यांना 12,000 कसे मिळणार?

मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांना पूर्वीपासूनच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये मिळत आहेत. आणि आता मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये मिळणार आहे. असे मिळून आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहे.

 

मुख्यमंत्री किसान योजना अटी व पात्रता Mukhyamantri Kisan Yojana

मुख्यमंत्री किसान सन्मान योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये हे मानधन म्हणून वितरित करण्यात येईल. या योजनेअंतर्गत ज्यांना लाभ मिळवायचा असेल त्यांच्या नावावर पाच एकर पेक्षा कमी जमीन असावी लागते. म्हणजे शेतकरी हा अल्प व अत्यल्प भूधारक असला पाहिजे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी असेल तर त्यास लाभ मिळता येणार नाही. त्याचप्रमाणे जे शेतकरी आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही.

 

मुख्यमंत्री किसान योजना करिता आवश्यक कागदपत्रे Required Documents for Mukhyamantri Kisan Yojana

मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र(Mukhyamantri Kisan Samman Nidhi Yojana Maharashtra) अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. शेतकऱ्यांचे आधार कार्ड

2. शेतकऱ्यांच्या जमिनीचा 7/12 व 8-अ उतारा

3. रेशन कार्ड

4. प्रधानमंत्री किसान योजनेचा नोंदणी क्रमांक

 

वरील कागदपत्रे असल्यास आपण नक्कीच मुख्यमंत्री किसान योजना अंतर्गत अर्ज करून लाभ मिळवू शकतो.

 

मुख्यमंत्री किसान योजना अर्ज प्रक्रिया Mukhyamantri Kisan Yojana Application Process

मुख्यमंत्री किसान सन्मान योजना ची नुकतीच घोषणा झालेली आहे. Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra ची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. आणि लवकरच अर्ज प्रक्रिया ही सुरू करण्यात येईल. मुख्यमंत्री किसान योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही सहसा ऑनलाईनच राबवण्यात येईल. अंतर्गत अर्ज सुरू झाल्यास तुम्हाला नवीन पोस्ट टाकून कळविण्यात येईल.

 

मुख्यमंत्री किसान सन्मान योजना संदर्भातील ही माहिती महत्वपूर्ण वाटत असेल तर इतर शेतकरी बांधवांना देखील नक्की शेअर करा. अशाच माहिती करिता आपल्या वेबसाईटवर भेट देत राहा.