नाशिक महानगरपालिका विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू | Nashik Mahanagatpalika Requirements 2022

मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून जर तुम्ही बारावी पास असाल तरीसुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. सदर भरती प्रक्रिया सुरू झालेल्या असून उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्ज करायचा आहे. नाशिक महानगरपालिकेतील भरती प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून या संदर्भात विस्तृत माहिती आता आपण जाणून घेऊया.

 

नाशिक महानगरपालिका भरती 2022 Nashik Mahanagarpalika Requirements

मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध पदांकरिता भरतीची जाहिरात काढलेली आहे. उमेदवारांना अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन देण्यात आलेली असून नाशिक महानगरपालिका भरती अंतर्गत कोणत्याही प्रकारचा पेपर घेण्यात येणार नसून उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा नाशिक महानगरपालिकेमध्ये नोकरी करायची असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आलेली आहे.

नाशिक महानगरपालिका भरती अंतर्गत विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला करायचा असून दिलेल्या तारखेच्या आत भरतीचा अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. नाशिक महानगरपालिका अंतर्गत करावयाचा अर्ज सुद्धा आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज डाऊनलोड करून घ्या त्या अर्जाची प्रिंट करा व त्यावर विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा व त्याला कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करा. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध पदांकरिता नोकर भरतीची जाहिरात सुद्धा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे.

 

नाशिक महानगरपालिका भरती पदांचा तपशील

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने खालील पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून तुम्हाला पात्रतेनुसार खालीलपैकी कोणत्याही पदांकरिता अर्ज करता येणार आहे.

1. Staff Nurse स्त्री – 09 जागा

2. Staff Nurse पुरुष – 01 जागा

3. General Medicine – 01 जागा

4. General Surgeon – 01 जागा

5. Anesthetist – 01 जागा

6. Microbiologist – 01 जागा

7. Obstetrician/Gynaecologist -01 जागा

8. Medical officer- 27 जागा

9. Senior medical officer- 01 जागा

10. Pharmacist – 16 जागा

11. Incharge sister- 01 जागा

12. X-ray technician – 01 जागा

13. Technician – 23 जागा

वरील सर्व पदांकरिता नाशिक महानगरपालिका मध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत. आता आपण नाशिक महानगरपालिका भरती अंतर्गत शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया.

महिला व बाल विकास भरती सुरू 

नाशिक महानगरपालिका अंतर्गत अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

नाशिक महानगरपालिका भरती अंतर्गत अर्ज करण्याकरिता तुम्हाला खालील कागदपत्रे जोडावी लागतात.

1. पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र

2. कोणत्याही शासकीय संस्थेमध्ये काम केलेले असल्यास त्याबाबत अनुभव प्रमाणपत्र

3. कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र

4. वयाचा पुरावा असलेले कोणतेही एक कागदपत्र

 

नाशिक महानगरपालिका भरती करिता शैक्षणिक पात्रता

नाशिक महानगरपालिका भरती अंतर्गत शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण ठेवण्यात आलेली आहे. बारावी उत्तीर्ण असलेला उमेदवार नाशिक महानगरपालिकेच्या भरती अंतर्गत पात्र पदांकरिता अर्ज करू शकतो. काही पदान करीता शैक्षणिक पात्रता ही पदवी किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रते संदर्भात सविस्तर माहिती करिता नाशिक महानगरपालिकेची जाहिरात पहावी.

 

वेतन श्रेणी

नाशिक महानगरपालिका भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यास तुम्हाला तर महिन्याला 17000 ते 75 हजार रुपये महिना वेतन मिळू शकते. तुम्ही ज्या प्रदान करिता निवडले गेलेले आहात त्यानुसार तुमचे वेतन ठरते.

 

अर्ज शुल्क किती आहे?

नाशिक महानगरपालिका भरती अंतर्गत अर्ज करण्याकरिता अर्ज शुल्क ठेवण्यात आलेली असून खुल्या प्रवर्गाकरिता 150 रुपये शुल्क असून राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये शुल्क ठेवण्यात आलेले आहे. तुम्हाला शुल्क डिमांड ड्राफ्ट च्या माध्यमातून अदा करावे लागतील. डी.डी.एच.एस.नाशिक या नावाने डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे.

 

अर्ज करण्याची तारीख

नाशिक महानगरपालिका भरती अंतर्गत 22 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज सुरू झालेले असून उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. ज्यांनी अर्ज सादर केलेला आहे त्यांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येणार आहे.

खालील पत्त्यावर मुलाखत घेण्यात येईल

वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक – 422 002.

नाशिक महानगरपालिकेची मूळ जाहिरात डाऊनलोड करण्याची लिंक

अर्ज करण्यापूर्वी या महत्त्वाच्या सूचना वाचून घ्या :

वर दिलेल्या काही पदाकरिता अर्ज करण्याची आवश्यकता नसून ज्या दिवशी महानगरपालिकेतर्फे मुलाखत ठरवण्यात येईल त्या दिवशी डायरेक्ट मुलाखतीला जाऊन तुम्ही तुमची निवड करून घेऊ शकतात. तर काही पदान करिता सुरुवातीला अर्ज करावा लागेल त्यानंतर मुलाखतीला बोलावण्यात येईल. अर्ज करण्यापूर्वी महानगरपालिकेची मूळ जाहिरात वाचून घ्यावी. ती आम्ही तुम्हाला वर उपलब्ध करून दिलेली आहे. थेट मुलाखत दर मंगळवारी घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी अर्जाचा नमुना सोबत घेऊन हजर राहावे. वरील सर्व भरती प्रक्रिया ही कंत्राटी पदांकरिता आहे. त्यामुळे वरील पदांकरिता तुमची निवड झाल्यास तुमचा कालावधी हा 11 महिने किंवा त्यापेक्षा कमी असणार आहे.

नाशिक महानगरपालिका नवीन भरती संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल अशी आशा व्यक्त करतो. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा अशाच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.