नवीन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र; अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे व पात्रता | Navin Vihir Anudan Yojana Maharashtra

नवीन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र; अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे व पात्रता | Navin Vihir Anudan Yojana Maharashtraशेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन शेतकरी बांधवांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता अनेक प्रकारच्या शेतकरी योजना राबवित असते. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सिंचनाच्या सुविधांमध्ये विहीर हे एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात सिंचन साधनांमध्ये विहीर बांधकाम करिता अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण नवीन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र (Navin Vihir Anudan Yojana Maharashtra ) संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधकाम करण्याकरिता 2 लाख 50 हजार रुपये अनुदान येणाऱ्या योजना सध्या महाराष्ट्र राज्य मध्ये सुरू आहेत. शेतकऱ्यांना सिंचन विहीर योजनेअंतर्गत नवीन विहिरीचे बांधकाम करण्याकरिता 100% पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र राज्यात नवीन विहीर बांधकाम करण्याकरिता सुरू असलेल्या योजनांविषयी माहिती जाणून घेत आहोत.

 

जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर नसेल आणि त्या शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधकाम करायची असेल तर तो शेतकरी या योजना अंतर्गत अर्ज करून नवीन विहिरीचे(Navin Vihir Anudan Yojana Maharashtra) बांधकाम करू शकतो. त्याकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया या विषयी सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत.

 

नवीन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र Navin Vihir Yojana Maharashtra

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये नवीन विहिरीचे बांधकाम करायचे असेल तर महाराष्ट्र राज्य मध्ये खालील योजना सुरू आहेत, यापैकी कोणत्याही योजनेमध्ये अर्ज करून तुम्हाला नवीन विहिरीचे बांधकाम(Navin Vihir Anudan Bandhkam Yojana) करता येईल.

 

1. महाडीबीटी अंतर्गत नवीन विहीर अनुदान योजना

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांना एकाच पोर्टलच्या माध्यमातून विविध शेतकरी योजनांचा लाभ मिळवता यावा. याकरिता महाडीबीटी पोर्टल ची स्थापना केली होती. या महाडीबीटी पोर्टल नंतर आपल्याला नवीन विहिरीकरिता अर्ज करता येतो. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नवीन विहीर बांधकाम करिता 2.50 लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. ज्या शेतकरी बांधवांना महाडीबीटी पोर्टल अंतर्गत नवीन विहीर करीत अर्ज करायचा असेल त्यांनी सर्वप्रथम महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर नोंदणी करायची आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने या पोर्टल च्या माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्याची निवड होईल. त्यानंतर कागदपत्रे ऑनलाईन सबमिट करायचे. पूर्वसंमती मिळाल्यानंतर विहिरीचे बांधकाम सुरू करायचे, योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते. महाराष्ट्र राज्यातील कुठलाही शेतकरी ज्याच्या सातबारावर विहिरीची नोंद नाही त्याला या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.

महा डीबीटी पोर्टल वेबसाईट

 

2. मनरेगा/रोहयो विहीर योजना

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला विहीर बांधण्याकरिता अनुदान हवे(Sinchan Vihir Anudan Yojana) असेल तर तुम्हाला मनरेगा किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीकरिता अर्ज सादर करता येतो. या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड होईल त्यांना विहिरीचे बांधकाम करण्याकरिता 2 लाख 50 हजार रुपये अनुदान देण्यात येईल. नवीन विहिरीचे बांधकाम करण्याकरिता या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याला अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. मनरेगाच्या निकषाप्रमाणे लाभार्थ्याची निवड करण्यात येईल. मनरेगा अंतर्गत नवीन विहीर बांधकाम (Navin Vihir Anudan Yojana Maharashtra) करिता अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये करायचा आहे. अर्ज सादर केल्यानंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते.

 

3. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा योजना) अंतर्गत नवीन विहीर योजना

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील 5142 गावांमध्ये पोखरा योजना राबविण्यात येत आहे. या पोखरा योजने अंतर्गत आपल्याला नवीन विहीर बांधकाम(Navin Vihir Anudan Yojana Maharashtra)करण्याकरिता अनुदान देण्यात येत आहे. जर तुमचे गाव पोखरा योजनेमध्ये असेल म्हणजे जर तुमच्या गावाचा समावेश पोखरा योजनेअंतर्गत करण्यात आलेला असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करता येतो. ही योजना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सुरू नसून महाराष्ट्र राज्यातील 5142 गावांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर या योजनेअंतर्गत तुमचे गाव असेल तरच तुम्हाला अर्ज करता येतो. पोखरा योजनेअंतर्गत नवीन विहीर बांधकाम करण्याकरिता 2.50 लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना पोखरा योजनेअंतर्गत नवीन विहीर अनुदान योजना अंतर्गत अर्ज करायचा असेल त्यांनी पोखरा योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची नवीन विहीर बांधकाम योजना अंतर्गत निवड होईल त्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होईल. त्यानंतर पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर शेतकरी बांधवांनी योजनेचे काम सुरू करायचे आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पोखरा योजनेची अधिकारी तुमच्या कामाची पाहणी करतील. आणि तुम्हाला तुमच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम हस्तांतरित करण्यात येईल.

पोक्रा योजना वेबसाईट 

 

अशाप्रकारे आपल्याला वरील तीन योजना अंतर्गत नवीन विहीर बांधकाम(Navin Vihir Anudan Yojana) करण्याकरिता नवीन विहीर अनुदान योजना अंतर्गत अर्ज करता येतो. होईल तिन्ही योजनांविषयी माहिती आपण एकाच पोस्टमध्ये पाहिलेली आहे. वरील तीनही योजना अंतर्गत लाभ मिळवण्याकरिता आपल्याला कागदपत्रे सादर करावी लागते. मनरेगा अंतर्गत विहिरीचे बांधकाम करायचे असल्यास रोजगार हमी योजना किंवा मनरेगाच्या निकषाप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे तुम्हाला सादर करावे लागतील. जर तुम्ही पोखरा योजना किंवा महाडीबीटी विहीर योजना अंतर्गत अर्ज केल्यास तुम्हाला खालील प्रमाणे कागदपत्रे अपलोड करावी लागते.vihir anudan yojana maharashtra

 

नवीन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे

शेतकरी मित्रांनो आपल्याला नवीन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र(Navin Vihir Anudan Yojana Maharashtra) अंतर्गत लाभ मिळविण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करावी लागतात.

1. जमिनीचा सातबारा व आठ अ

2. कास्ट सर्टिफिकेट

3. उत्पन्नाचा दाखला

4. लाभार्थ्याचे प्रतिज्ञापत्र पाचशे रुपये किंवा शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर

5. अपंगत्व प्रमाणपत्र – असल्यास

6. पाणी उपलब्धतेचा दाखला- तलाठी यांच्याकडून मिळेल

7. क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र – गटविकास अधिकारी देतील

8. ग्रामसभेचा ठराव

9. विहिरीच्या जागेचा फोटो

वरील सर्व कागदपत्रे असेल तर आपण नवीन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहोत.

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 महाराष्ट्र नवीन यादी जाहीर; लगेच डाऊनलोड करा.

नवीन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया Navin Vihir Anudan Yojana Maharashtra Application Process

विहीर अनुदान योजना अंतर्गत अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आता आपण जाणून घेऊया.

1. सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर जा.

2. त्या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती टाकून नोंदणी करून घ्या. बँकेची माहिती, शेत जमिनीची माहिती तसेच पिकांची माहिती व सिंचनाची माहिती व्यवस्थितपणे ऍड करा.

3. आता लॉगिन करून घ्या. आता तुम्हाला नवीन डॅशबोर्ड मध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना दिसतील. त्यापैकी सिंचन साधने व सुविधा या पर्यायांमध्ये विहीर या ऑप्शन वर क्लिक करा.

4. आता व्यवस्थितपणे अर्जातील माहिती भरून अर्ज सादर करा. तुमचा अर्ज व्यवस्थितपणे भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होईल.

5. लाभार्थी निवड प्रक्रिया दरम्यान तुमची निवड झाल्यास तुम्हाला तुमची निवड झाल्याचा एसएमएस तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल.vihir anudan yojana maharashtra

 

हे नक्की वाचा:- शेतकरी अनुदान योजना महाराष्ट्र संपूर्ण यादी व अर्ज प्रक्रिया

 

नवीन विहीर बांधकाम योजना संपर्क :-

नवीन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास, तुमच्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकतात. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मध्ये सुद्धा विविध प्रकारच्या योजना अंतर्गत काही अडचण असल्यास त्या ठिकाणी सुद्धा संपर्क साधता येतो.

ही महत्वपूर्ण माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर मिळवण्याकरिता आपल्या वेबसाईटवर भेट देत राहा. जर तुम्हाला या योजने संदर्भात काही शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकतात. आम्ही तुमच्या शंकांचे रिप्लाय देऊन नक्कीच निरसन करू.