शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याकरिता पशु किसान क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यात आलेले होते. या पशु किसान क्रेडिट कार्डचे अंतर्गत जे शेतकरी पशुपालन करतात अशा शेतकऱ्यांना पशु किसान क्रेडिट कार्ड द्वारे कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते. पशु किसान क्रेडिट कार्ड (Pashu Kisan Credit Card) द्वारे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्यात आलेली असून अर्ज सुद्धा सुरू झालेल्या आहेत. तर चला जाणून घेऊया पशु किसान क्रेडिट कार्ड द्वारे कसे कर्ज मिळवायचे.
मित्रांनो जे शेतकरी शेती बरोबरच पशुपालन त्यामध्ये गाय, म्हैस यापासूनचे पालन करत असाल तर तुम्ही पशु किसान क्रेडिट कार्ड (Pashu Kisan Credit Card) अंतर्गत अत्यंत कमी व्याजदरावर कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहात. परंतु त्याकरिता तुम्हाला पशु किसान क्रेडिट कार्ड काढावे लागते ते कसे काढायचे याची सुद्धा प्रक्रिया आपण पुढे जाणून घेणार आहोतच. जर आपण गाय पालन करत असाल तर चाळीस हजार रुपये कर्ज आणि म्हैस पालन करत असाल तर साठ हजार रुपये कर्ज या योजनेअंतर्गत मिळवू शकतो. या योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जावर अत्यंत कमी व्याजदर आकारण्यात येतो त्याप्रमाणे दिलेल्या मुदतीच्या काळात कर्जाच्या रकमेची परतफेड केल्यास व्याज सुद्धा माफ करण्यात येते.
मित्रांनो देशातील केंद्र सरकार तसेच राज्य सरकारचे उद्दिष्ट हे देशातील शेतकऱ्यांचे तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न 2024 पर्यंत दुप्पट करण्याचे ध्येय आहे. त्याच अनुषंगाने देशातील शेतकरी व शेतीची संबंधित व्यवसाय करणारे जसे की पशुपालन व्यवसाय अशा शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याकरिता क्रेडिट कार्ड kisan credit card- KCC Card द्वारे कर्ज उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल म्हणूनच सरकार द्वारे पशु किसान क्रेडिट कार्ड द्वारे कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कोणत्या पशुपालकांना कर्ज मिळेल
पशु किसान क्रेडिट कार्ड(Pashu Kisan Credit Card) द्वारे आपण गाय पालन तसेच म्हैस पालन त्याचप्रमाणे कुक्कुटपालन तसेच मेंढी पालन मत्स्य पालन इत्यादी बाबींकरिता कर्ज मिळवू शकतो. शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट व्हावे याकरिता सरकारच्या वतीने कर्जाच्या रूपात प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येत आहे. त्या करिता जास्तीत जास्त पशुपालन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पशु किसान क्रेडिट कार्ड काढून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
पशुधन किसान क्रेडिट कार्डचे फायदे कोणते?
मित्रांनो पशुधन किसान क्रेडिट(Kisan Credit Card) कार्डचे अनेक फायदे आहेत त्याचप्रमाणे पशु किसान क्रेडिट कार्ड द्वारे मिळालेल्या कर्जावर सुद्धा अनेक प्रकारच्या सवलती सरकार उपलब्ध करून देतात त्या खालील प्रमाणे आहेत.
या क्रेडिट कार्डद्वारे Pashu Kisan Credit Card Yojana Maharashtra कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याजाची सूट देण्यात येत आहे. पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत देण्यात येणारे क्रेडिट कार्ड शेतकरी डेबिट कार्ड प्रमाणे सुद्धा वापरू शकतात. त्याचप्रमाणे या पशु किसान क्रेडिट कार्ड च्या अंतर्गत पशुपालकांना दीड लाख रुपयांपर्यंतची पशुधन कर्ज बिना गॅरंटी वितरित करण्यात येते याकरिता केवळ सात टक्के दर आकारण्यात येतो. व या योजनेअंतर्गत कर्जाच्या रकमेची परतफेड वेळेच्या आत केल्यास चार टक्के पर्यंत व्याज सवलत सुद्धा वितरित करण्यात येते.
मोफत स्कूटर योजना 2022 महाराष्ट्र, मुलींना मिळणार मोफत स्कूटर अर्ज सुरू
पशु किसान क्रेडिट कार्ड अर्ज प्रक्रिया
शेतकरी मित्रांनो पशु किसान क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत ते आपण जाणून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत कर्ज मिळण्याकरिता आपल्याकडे ती क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे तर चला जाणून घेऊया या पशु किसान क्रेडिट कार्डची अर्ज प्रक्रिया. Pashu Kisan Credit Card Maharashtra
पशु किसान क्रेडिट कार्ड काढण्याकरिता तुम्हाला तुमच्या जवळील बँकेत जायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला पशु किसान क्रेडिट कार्ड संबंधित एक अर्ज मिळेल तो अर्ज बँकेला मागून तो व्यवस्थितपणे भरायचा आहे त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची आहे आणि तो अर्ज बँकेमध्ये जमा करायचा आहे.
त्या अर्जामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक तसेच इतर माहिती विचारण्यात येईल ती माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर बँके वाले तुम्हाला एक रिसिप्ट देतील आणि क्रेडिट कार्ड आल्यानंतर तुम्हाला बँकेत बोलतील किंवा तुमच्या घरी पाठवून देतील. या पशु किसान क्रेडिट कार्ड अर्ज सोबत तुम्हाला कागदपत्रे जोडावी लागतात ती खाली दिलेली आहेत.
पशु किसान क्रेडिट कार्ड करिता आवश्यक कागदपत्रे Required Documents for Pashu Kisan Credit Card
शेतकरी मित्रांनो पशु किसान क्रेडिट कार्ड (pashu Kisan Credit Card Scheme Maharashtra) काढण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत ही कागदपत्रे तुम्हाला बँकेमध्ये जमा करावे लागतात.
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराची दोन फोटो
- ओळखपत्र
- प्राण्यांचे आरोग्य प्रमाणपत्र
- पशूंचे विमा प्रमाणपत्र
मोफत सायकल योजना महाराष्ट्र; मुलींना मिळणार मोफत सायकल
पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत किती कर्ज मिळते?
मित्रांनो पशु किसान क्रेडिट कार्ड( pashu Kisan Credit Card Scheme Maharashtra) काढल्यानंतर आपण एकूण जास्तीत जास्त तीन लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकतो. यामध्ये वेगवेगळ्या पासून करिता वेगवेगळे कर्ज दिले जाते जसे की म्हशीकरिता साठ हजार रुपये तर गायी करिता चाळीस हजार रुपये तसेच कोंबड्यांकरिता 7000 तर शेळी किंवा मेंढीकरिता चार हजार रुपये कर्ज आपण मिळू शकतो याकरिता केवळ चार टक्के व्याजदर करण्यात येतो.