पर्सनल लोन काय आहे? पर्सनल लोन कसे मिळवायचे ? माहिती मराठी | Personal Loan Information In Marathi

मित्रांनो पर्सनल लोन म्हणजे काय आहे? पर्सनल लोन मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे? पर्सनल लोन मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच पर्सनल लोन कसे मिळवायचे? पर्सनल लोन विषयी विस्तृत माहिती Personal Loan Information In Marathi आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेऊया. 

 

पर्सनल लोन म्हणजे काय ? What is Personal Loan?

जे लोन आपल्याला कोणत्याही प्रकारचे तारण न ठेवता मिळते त्याला पर्सनल लोन असे म्हणतात. पर्सनल लोन मिळवण्याकरिता आपल्याला बँके कडे कोणत्याही प्रकारची वस्तू गहाण म्हणून ठेवण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये अनेक आर्थिक संकटे येत असतात. आपल्याला आपल्या दैनंदिन तसेच इतर आवश्यक गरजा पूर्ण करायच्या असतात. त्याकरिता आपल्याला पैशाची गरज आवश्यक असते. आपल्याला गाडी घ्यायची असेल किंवा घरामध्ये एखादी वस्तू आणायची असेल किंवा आजारपण अशा कारणांकरिता आपल्याकडे पैसे उपलब्ध असतील असे नाही. अशा कारणांसाठी आपल्याला पर्सनल लोन घ्यावी लागते. जर आपण एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल तर आपल्याला सहजपणे पर्सनल लोन मिळते. पर्सनल लोन हे आपले यापूर्वीचे आर्थिक व्यवहार तपासून दिले जाते. म्हणजेच आपला सिबिल स्कोर हे तपासून पर्सनल लोन मंजूर करण्यात येते. आपल्या भारत देशातील जवळपास सर्वच बँका पर्सनल लोन उपलब्ध करून देत आहे. आपल्याला एखादी नवीन गाडी घ्यायची असेल, घर बांधायचे असेल तर आपण पर्सनल लोन घेऊ शकतो. प्रसनल लोन चा व्याजाचा दर हा गृह कर्ज किंवा इतर कर्जा पेक्षा थोडा जास्त असतो. आपण पर्सनल लोन घेतल्यानंतर ते टप्प्याटप्प्याने परत करण्याची सुविधा आपल्याला बँक उपलब्ध करून देते. Personal Loan Information In Marathi. आत्तापर्यंत आपण होम लोन, कार लोन याविषयी ऐकले असेल परंतु आपल्याला पर्सनल लोन काय आहे? हा प्रश्न पडलेला असेल.

 

पर्सनल लोन मिळवण्याकरिता अर्ज प्रक्रिया कशी असते? Application Process For Personal Loan?

पर्सनल लोन मिळवण्याकरिता अर्ज प्रक्रिया ही सोपी असते. पर्सनल लोन मिळण्याकरिता अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन असू शकते. ज्याप्रमाणे आपण क्रेडिट कार्ड काढतो त्याचप्रमाणे पर्सनल लोन ला सुद्धा अर्ज करावा लागतो. पर्सनल लोन(Personal Loan In Marathi) संबंधित अर्ज करताना आपल्याला स्वतःची माहिती भरावी लागते. त्याचप्रमाणे आपण यापूर्वी केलेल्या व्यवहारांचा तपशील द्यावा लागतो व आपल्याला पर्सनल लोन कशाकरिता हवे आहे याची माहिती द्यावी लागते. पर्सनल लोन हे आपल्याला आपला सिबिल स्कोर चेक करून दिले जाते. पर्सनल लोन ( Personal Loan Information in Marathi)मध्ये कोणत्याही प्रकारचे तारण नसल्यामुळे सिबिल स्कोर हा महत्त्वाचा दुवा आहे. सिबिल स्कोर च्या माध्यमातून आपले आर्थिक व्यवहार समजतात. बँकाच नाही तर इतर संस्था सुद्धा आपल्याला पर्सनल लोन सुविधा पुरविते. Personal loan application process information in Marathi

 

पर्सनल लोन घेण्यासाठी आवश्यक बाबी

1. पर्सनल लोन घेण्याकरिता आपले वय हे 21 ते 60 या दरम्यान असावे लागते.

2. ज्या व्यक्तींनी दोन वर्ष सतत जॉब केलेले आहे किंवा ते सध्या जॉब करत असेल असे व्यक्ती पर्सनल लोन करता अर्ज करू शकतात.

3. पर्सनल लोन मिळवण्याकरिता मासिक पेमेंट हे 25000 किंवा त्यापेक्षा जास्त असावी लागते.

4. पर्सनल लोन मिळवण्याकरिता आपला सिबिल स्कोर चांगला असावा लागतो.

 

पर्सनल लोन करिता आवश्यक कागदपत्रे Documents required for personal loan

पर्सनल लोन करिता अर्ज करण्याकरिता आपल्याकडे खाली कागदपत्रे असणे आवश्यक आहे. Personal loan documents

1. विहित नमुन्यातील अर्ज

2. आधार कार्ड

3. पॅन कार्ड

4. पासपोर्ट किंवा मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स

5. पासपोर्ट साईज चे फोटो

6. ऍड्रेस प्रूफ

7. मागील तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट

8. सॅलरी स्लिप

 

पर्सनल लोन आणि सिबील स्कोर Personal Loan and CIBIL score

पर्सनल लोन(Personal loan) मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सिबिल स्कोर. ज्या बँका किंवा इतर पतसंस्था किंवा पर्सनल लोन देणाऱ्या संस्था झटपट आणि लवकरात लवकर पर्सनल लोन मंजूर करतात त्या संस्था किंवा बँका तुमचा सिबिल स्कोर पाहूनच तुम्हाला पर्सनल लोन देत असतात. याच्या माध्यमातून तुम्ही यापूर्वी किती लोन घेतलेले आहेत? त्या लोणची परतफेड वेळेवर केलेली आहे किंवा नाही? या सर्व बाबी विचारात घेऊन तुम्हाला पर्सनल लोन मंजूर करण्यात येत असते. पर्सनल लोन मिळवण्यासाठी आपला सिबिल स्कोर हा 300 ते 900 या दरम्यान असावा लागतो. या दरम्यान आपला सिबिल स्कोर असेल तरच आपल्याला लवकर पर्सनल लोन मंजूर करण्यात येते. त्याचप्रमाणे किती लोन मिळेल हे सुद्धा सिबिल स्कोर वर डिपेंड असते. Personal loan Mahiti Marathi

हे नक्की वाचा:- SIP म्हणजे काय? SIP करण्याचे फायदे व तोटे

पर्सनल लोन घेण्याचे फायदे Advantages of taking a personal loan

पर्सनल लोन घेण्याचे विविध फायदे आहेत, ते आता आपण जाणून घेऊया.

1. पर्सनल लोन चा दर हा क्रेडिट कार्ड च्या व्याजदरापेक्षा कमी असतो

2. पर्सनल लोन आपण हप्त्यामध्ये परत करू शकतो. एकाच वेळेस पर्सनल लोन परतफेड करण्याची आवश्यकता नाही.

3. पर्सनल लोन चा व्याजाचा दर हा पाच टक्के ते आठ टक्के या दरम्यान असतो. पर्सनल लोन चा व्याजाचा दर फिक्स नसतो तो कमी जास्त होत असतो.

4. पर्सनल लोन आपण गाडी घेण्यासाठी तसेच वैद्यकीय खर्च पेड करण्यासाठी सुद्धा घेऊ शकतो. Personal Loan Mahiti Marathi

 

पर्सनल लोन घेण्याचे तोटे

पर्सनल लोन घेण्याचे ज्याप्रमाणे फायदे आहेत, त्याचप्रमाणे तोटे सुद्धा आहेत, ते आता आपण जाणून घेऊया.

1. पर्सनल लोन घेण्यासाठी आकारले जाणारे फी ही जास्त असते.

2. पर्सनल लोन वेळेवर न भरल्यास दंड आकारले जाऊ शकतो.

3. पर्सनल लोन च्या कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यास रक्कम वाढत जाते.

4. पर्सनल लोन ची रक्कम दर हप्त्याला भरावीच लागते.

हे नक्की वाचा:- Instagram वरून पैसे कसे कमवायचे? संपूर्ण माहिती 

अशाप्रकारे आपण आजच्या या पोस्टमध्ये पर्सनल लोन म्हणजे काय आहे? पर्सनल लोन मिळवण्याकरिता आवश्यक कागदपत्रे तसेच पर्सनल लोन आणि सिबिल स्कोर चा संबंध, पर्सनल लोन चे फायदे व तोटे याविषयी विस्तृत माहिती जाणून घेतलेली आहे.