पिक विम्याचे स्टेटस असे चेक करा ऑनलाईन | Pik Vima Status Check Online

मित्रांनो प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यात आपण आपले शेती पिकांचे पिक विमा काढत असतो. पिक विमा हा पण रब्बी हंगाम तसेच खरीप हंगाम त्याचप्रमाणे फळबागांकरिता पिक विमा काढत असतो. आपण स्वतः पैसे भरून पिक विमा काढतो किंवा जर आपण एखाद्या बँकेकडून कृषी कर्ज घेतलेले असेल तर ती बँक आपल्या नावाने आपल्या शेतातील पिकांचा पीक विमा काढते. जर आपण Pik Vima Yojana पिक विमा काढलेला असेल आणि आपल्या शेती पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे नुकसान झाले तर पिक विम्याची नुकसान भरपाई आपण मिळवू शकतो त्याकरिता आपल्याला पिक विमा कंपनीकडे 72 तासाच्या आत पिक विमा नुकसान भरपाईचा क्लेम दाखल करावा लागतो. इथपर्यंतची प्रक्रिया सर्वांना माहिती आहे परंतु आता आपण पीक विम्याचा दावा दाखल केलेला आहे त्यामुळे आपल्याला पिक विमा मिळणार का ते आपण पिक विम्याचे स्टेटस चेक करून जाणून घेऊ शकतो. पिक विमा योजनेच्या अंतर्गत आपल्याला पिक विम्याची स्टेटस ऑनलाईन(Pik Vima Status Check Online ) पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर चला जाणून घेऊया पिक विम्याचे स्टेटस ऑनलाइन चेक करण्याची प्रक्रिया.

pm kisan yojana new list declaired 

शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री Pik Vima Yojana ही केंद्र शासनाच्या वतीने आपल्या राज्यात राबविण्यात येत आहे. पिक विमा योजनेच्या अंतर्गत तिघा जणांचा सहभाग असतो तो म्हणजे सर्वात पहिल्यांदा शेतकरी त्यानंतर राज्य सरकार व केंद्र सरकार. आपण पिक विमा अर्ज(pik vima Yojana online application) केल्यानंतर पिक विमा कंपनीला आपल्या वाटेवर येणारी रक्कम ऑनलाईन अदा करतो त्यानंतर राज्य सरकार त्यांच्या वाटेवर येणारी रक्कम विमा कंपनीस सुपूर्द करते. त्याचप्रमाणे केंद्र सरकार सुद्धा करते. पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास नियमानुसार 72 तासाच्या आत क्लीन केल्यास आपण नुकसान भरपाई मिळवण्यास पात्र असतो.

 

त्यामुळे आपण पिक विमा योजने(Pik Vima Yojana Status)अंतर्गत नुकसान भरपाई चा दावा दाखल केलेला असेल तर पिक विमा नुकसान भरपाई आपल्याला मिळेल का ते चेक करण्याकरिता पिक विम्याची स्टेटस(Pik Vima Status) चेक करणे महत्त्वाचे असते.

 

पिक विम्याची स्टेटस कसे चेक करायचे?

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला पिक विम्याची स्टेटस चेक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. Pik Vima Status 2022

1. सर्वप्रथम पिक विम्याची स्टेटस चेक करण्याकरिता तुमच्याजवळ मोबाईल किंवा कम्प्युटर असला पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे.

2. पिक विमा योजनेचे स्टेटस चेक करण्याकरिता अधिकृत वेबसाईटवर जाण्याची लिंक

3. आता वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आलेले असाल.

4. आता पिक विमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला होम पेजवर सहा प्रकारचे विविध पर्याय दिसत असतील त्यापैकी

5. application status या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

6. आता तुम्हाला तुमच्या पिक विम्याची स्टेटस चेक करण्याकरिता तुमच्याजवळ पिक विमा योजनेचा अर्ज केल्यानंतर एक पावती मिळालेली असेल ती असणे आवश्यक आहे.

7. पिक विमा योजनेच्या पावतीवरील नंबर म्हणजेच रिसिप्ट नंबर तुम्हाला या रखाण्यामध्ये प्रविष्ट करायचा आहे.

8. आता तुमच्यासमोर खाली असलेल्या कॅपच्या कोड त्या रकान्यामध्ये प्रविष्ट करायचा आहे.

9. आता शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करा आता आपण केलेल्या अर्जाची स्थिती आपल्यासमोर ओपन झालेली आहे.

10. आता तुमच्यासमोर तुमच्या पिक विमा ची माहिती जसे की तुम्ही अर्ज कोणत्या तारखेला सबमिट केला होता त्यानंतर तुमची पेमेंट प्राप्त झाल्याची माहिती तसेच एप्लीकेशन स्टेटस या प्रकारची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन झालेली आहे.

11. जर तुम्ही पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा क्लेम केलेला असेल, तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे.

12. त्याचप्रमाणे पिक विमा योजनेअंतर्गत तुमच्या तक्रारीची स्थिती पिक विमा मंजूर झाला का, पिक विम्याची संपूर्ण माहिती ही तुमच्या समोर आलेली आहे.

पिक विमा चे स्टेटस ऑनलाइन (Pik Vima Status Online) चेक करण्या संदर्भातील ही माहिती सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या पिक विमा संदर्भातील माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.