प्रधानमंत्री किसान मानधन योजना; शेतकऱ्यांना पेन्शन देणारी योजना | PM Kisan Mandhan Yojana in Marathi

मित्रांनो आपल्या भारत देशातील शेतकरी बांधवांना पंतप्रधान किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) अंतर्गत मानधन देण्याकरिता महत्त्वपूर्ण अशी किसान मानधन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा पेन्शन दिले जाते. या योजनेअंतर्गत आपल्याला काही योगदान द्यावे लागते म्हणजेच आपल्या वतीने थोडी थोडी रक्कम जमा करावी लागते, त्यानंतर आपल्याला वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर शासनातर्फे मानधन मिळते. आजच्या या पोस्टमध्ये आपण प्रधानमंत्री किसान मानधन योजना संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

केंद्र शासनाच्या वतीने खास शेतकरी बांधवांकरिता किसान मानधन योजना(Kisan Mandhan Yojana) राबविण्यात येत आहे. आपल्याला आपल्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, ठराविक व निश्चित रकमेचे पेन्शन मिळावे व आपल्या वृद्धापकाळातील जीवन सुखरूप व्हावे, याकरिता केंद्रशासन हे महत्त्वपूर्ण अशी पेन्शन देणारी योजना राबवित आहे. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अनेक कल्याणकारी योजनांपैकी ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.

 

पी एम किसान मानधन योजना माहिती मराठी pm Kisan Mandhan Yojana information in Marathi

Kisan Mandhan Yojana ही केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या योजनेचा उद्देश हा शेतकरी बांधवांना पेन्शन उपलब्ध करून देणे आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना लाभ घेण्याकरिता अर्ज करावा लागतो. त्यानंतर शेतकरी बांधवांची या योजनेअंतर्गत किसान मानधन खाते उघडले जाते. त्यानंतर शेतकरी बांधवांना ठराविक रक्कम या खात्यामध्ये जमा करावी लागते. जेवढी रक्कम शेतकरी या खात्यामध्ये भरतो तेवढीच रक्कम शासन सुद्धा या खात्यामध्ये शासनाच्या वतीने भरते. या योजनेअंतर्गत आपल्याला आपल्या वयाच्या नुसार पैसे भरावे लागतात. साठ वर्षापर्यंत आपल्याला या योजनेच्या खात्यामध्ये पैसे भरायचे आहे. आणि आपल्याला साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या वतीने दर महिन्याला पेन्शन दिले जाते. या योजनेच्या खात्यामध्ये जास्त रक्कम भरल्यास आपल्याला भविष्यामध्ये साठ वर्षानंतर जास्त पेन्शन मिळणार आहे. PM Kisan Mandhan Yojana

 

पी एम किसान मानधन योजना आवश्यक कागदपत्रे Required Documents for PM Kisan Mandhan Yojana

पी एम किसान मानधन योजना( PM Kisan Mandhan Yojana) अंतर्गत अर्ज करण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. PM Kisan Mandhan Yojana in Marathi

1. शेतकऱ्यांच्या नावाचे आधार कार्ड

2. शेतकऱ्यांच्या नावाचे बँक पासबुक

3. पॅन कार्ड

4. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा 7/12 व 8-अ

 

पी एम किसान मानधन योजना अटी PM Kisan Mandhan Yojana in Marathi

किसान मानधन योजना अंतर्गत जर शेतकरी बांधवांना लाभ मिळवायचा असेल तर त्यांच्या नावावर दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन नसायला पाहिजे. या योजनेअंतर्गत कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असेल तरच अर्ज भरता येतो. त्याचप्रमाणे जर जास्तीत जास्त वय हे 40 वर्षे असेल तर अर्ज भरता येतो. योजनेअंतर्गत अर्ज करणारा अर्जदार व्यक्ती हा आयकर भरणारा नसावा लागतो. त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्यास सरकारी नोकरी नसायला पाहिजे. त्याचप्रमाणे अर्जदार हा इतर कोणत्याही पेन्शन योजना अंतर्गत लाभ मिळवणारा नसला पाहिजे.

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 नवीन यादी जाहीर. आत्ताच डाऊनलोड करा 

ही योजना आपण सुरू केल्यानंतर, आपल्याला बंद करता येते का? PM Kisan Mandhan Yojana in Marathi

जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेअंतर्गत पैसे भरलेले असेल, आणि तुम्हाला जर या योजनेतून बाहेर पडायची असेल तर तुम्हाला बाहेर सुद्धा पडता येते. म्हणजे ही योजना तुम्ही बंद सुद्धा करू शकतात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्ही जेवढी रक्कम भरलेली आहे तेवढी रक्कम तुम्हाला व्याजासहित परत करण्यात येते. आणि या योजनेचे खाते बंद केल्यानंतर इथून पुढे तुमचे पैसे कटणार नाही.

 

या योजनेअंतर्गत पेन्शन कधीपर्यंत मिळेल?

पी एम किसान मानधन योजना अंतर्गत वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणारी पेन्शन ही जोपर्यंत शेतकरी जिवंत आहे , तोपर्यंत मिळणार आहे.pm Kisan Mandhan Yojana information in Marathi

हे नक्की वाचा:- मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना. दरवर्षी या शेतकऱ्यांना मिळणार 6000 रुपये

पी एम किसान मानधन योजना अर्ज प्रक्रिया

शेतकरी मित्रांनो किसान मानधन योजना अंतर्गत आपल्याला अर्ज करायचा असेल तर खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने अर्ज करू शकतात.

1. सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करावा.

2. शेतकरी स्वतः पी एम किसान मानधन योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

वरील दोन पद्धतीने आपण किसान मानधन योजना अंतर्गत अर्ज करून लाभ घेऊ शकतो.pm Kisan Mandhan Yojana information in Marathi

 

पी एम किसान मानधन योजना ऑनलाइन अर्ज कसा करायचा ? How to apply for Kisan Mandhan Yojana online

शेतकरी मित्रांनो पीएम किसान मानधन योजना( pm kisan mandhan yojana) अंतर्गत आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने स्वतः अर्ज करू शकतो. ऑनलाइन अर्ज करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.

1. सर्वप्रथम तुम्हाला किसान मानधन योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे.

वेबसाईट:- https://maandhan.in/

2. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे.

3. या योजनेअंतर्गत नोंदणी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहे.

4. तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत भरायच्या पहिल्या हप्त्याची पैसे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

5. आता तुम्ही सक्सेसफुली किसान मानधन योजना अंतर्गत नोंदणी करून पहिला हप्ता भरलेला आहे.

Leave a Comment