शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही संपूर्ण भारत देशात केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकरी बांधवांना त्यांच्या सन्मानार्थ सहा हजार रुपये रक्कम दरवर्षी त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येत असते. शेतकरी हा देशाचा पालन पोषण करत असल्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्याकरिता सहा हजार रुपये ची राशी शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ केंद्र शासन त्यांना वितरित करीत आहे. या पी एम किसान योजना(pm kisan yojna) अंतर्गत आतापर्यंत 12 हप्ते वितरित करण्यात आलेले असून पी एम किसान योजना तेरावा हप्ता खालील शेतकऱ्यांना मिळणार नाही. पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता (pm kisan yojana 13th installment date) कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही या संदर्भात विस्तृत माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.
मित्रांनो प्रधानमंत्री किसान योजना ही महत्त्वपूर्ण अशी योजना असल्यामुळे देशातील अनेक शेतकरी या योजनेची जोडले गेलेले आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये राशी शेतकऱ्यांना अनेक शेती उपयोगी कामांकरिता महत्त्वपूर्ण असते. पी एम किसान योजनेचा लाभ देशभरातून अनेक व्यक्ती घेत आहेत. या योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरातून दहा कोटी पेक्षा जास्त शेतकरी लाभ मिळवत आहेत. pm kisan yojana 13th installment
त्यामुळे आता पीएम किसान योजना संदर्भात महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील तेरावा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. बरेच शेतकरी पीएम किसान सन्मान योजना(pm kisan yojna) अंतर्गत अपात्र आहे तरीसुद्धा त्यांना लाभ मिळत बरेच शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य या योजनेअंतर्गत नोंदणी करून लाभ मिळवत होते. यासंबंधी माहिती शासनाच्या दरबारी पोचल्यानंतर अपात्र असणाऱ्या पीएम किसान लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत वगळण्यात आलेले आहे. पी एम किसान सन्मान योजना चा पुढील हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही याविषयी विस्तृत माहिती आता आपण जाणून घेऊया.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही 13 वा हप्ता :-
शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान योजना (pm Kisan samman nidhi yojana)अंतर्गत दोन हजार रुपयांचा तेरावा हप्ता खाली दिलेल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही.
पी एम किसान सन्मान योजना(Pm Kisan Yojana Maharashtra) अंतर्गत कर्जदार असलेल्या व्यक्तींना हा पुढील हप्ता मिळणार नाही. त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत लाभ मिळवला परंतु ते लोक त्यांची शेत जमीन शेती व्यतिरिक्त इतर कामांकरिता वापरत होते अशा शेतकऱ्यांना आता पुढे लाभ मिळणार नाही. एकाच कुटुंबात जास्त व्यक्ती अपात्र असून सुद्धा लाभ मिळत असेल तर त्यांना आता लाभ मिळणार नाही. या योजनेच्या नियमानुसार कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळवता येतो त्यामुळे जर एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ मिळवत असेल तर त्यांना लाभ मिळवता येणार नाही. जर एखादा व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल तर त्या व्यक्तीस या योजनेअंतर्गत लाभ मिळता येणार नाही. जर एखादा व्यक्ती आयकर भरत असेल तर त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळता येत नाही. जर एखादा व्यक्ती माझी किंवा आजी आमदार किंवा खासदार किंवा मंत्री असेल तर त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत पुढील हप्ता मिळणार नाही. त्याचप्रमाणे ज्या शेतकरी बांधवांनी अजून पर्यंत पीएम किसान योजना अंतर्गत ई केवायसी केलेली नाही त्यांना आता पुढचा हप्ता मिळणार नाही.
पी एम किसान योजना अंतर्गत तेरावा हप्ता(pm kisan yojna 13th installment) वरील शेतकऱ्यांना मिळणार नसून या संदर्भात विस्तृत माहिती ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता तुम्हाला मिळणार किंवा नाही या संदर्भात नवीन यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. ती आधी चेक करून तुम्ही तुमचा हप्ता मिळणार की नाही ते चेक करू शकतात.
पी एम किसान योजना 13 वा हप्ता यादी जाहीर! आत्ताच यादीत नाव चेक करा.
पी एम किसान योजना अंतर्गत शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जेणेकरून त्यांना पुढील सर्व हप्ते मिळवण्याकरिता कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही. आजच्या या पोस्टमध्ये आपण पी एम किसान योजना अंतर्गत तेरावा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तसेच अपात्र शेतकऱ्यांची यादी या संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटत असेल. ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.