पी एम किसान सन्मान निधी योजना नवीन यादी जाहीर; यादीत नाव असेल तरच मिळणार 6000 रुपये | PM Kisan Yojana List Maharashtra

शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आपल्या राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या वतीने सन्मान निधी म्हणून दरवर्षी सहा हजार रुपये वितरित करण्यात येत असतात. पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ त्यांना आर्थिक सहायता पुरवणारी महत्त्वपूर्ण योजना ही केंद्र सरकार राबवित असून या योजनेअंतर्गत नवीन यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे. पी एम किसान सन्मान योजना ची ही नवीन अपडेट केलेली यादी PM Kisan Yojana List Maharashtra असून जर तुमच्या यादीमध्ये pm kisan list नाव असेल तरच तुम्हाला सहा हजार रुपये चा लाभ मिळवता येणार आहे.

 

Pm kisan yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपयाची एक किस्त अशा एका वर्षात तीन किस्ती म्हणजेच एका वर्षात सहा हजार रुपये राशी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या वतीने या पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत आत्तापर्यंत 12 हप्ते वितरित करण्यात आलेल्या असून लवकरच तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येईल. परंतु त्यापूर्वी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेची नवीन यादी(PM Kisan Yojana New List Maharashtra) जाहीर केलेली आहे ज्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे नाव कमी झाले असून नवीन शेतकऱ्यांचे नाव सुद्धा ॲड करण्यात आलेले आहे.

 

त्यामुळे जर तुम्ही नवीन शेत जमीन मिळवली असेल आणि पी एम किसान योजना अंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेला असेल तर या यादीमध्ये तुमचे नाव आले का नाही ते तुम्ही चेक करायला पाहिजे. तसेच जर तुम्ही यापूर्वीसुद्धा पीएम किसान योजना (pm kisan yojna)अंतर्गत लाभ मिळत असाल तर तुमचे नाव या योजनेतून कपात करण्यात आलेले आहे का ते सुद्धा तुम्ही माहीत केले पाहिजे. पी एम किसान सन्मान योजना(pm kisan yojna list) अंतर्गत बरेच शेतकरी अपात्र असून सुद्धा लाभ मिळत होते त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नसून त्या शेतकऱ्यांची नाव या यादीमधून कट करण्यात आलेली असून पीएम किसान योजनेची नवीन यादी आता प्रकाशित करण्यात आलेली आहे.

 

पी एम किसान सन्मान निधी योजना पर अंतर्गत आतापर्यंत दहा कोटी शेतकरी बांधवांनी बाराव्या किस्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळवलेली आहे. परंतु आता पीएम किसान चा तेरावा हप्त्याची(pm kisan yojna next installment) रक्कम फक्त नवीन यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे जे डुप्लिकेट लाभार्थी होते किंवा या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील जास्त व्यक्तीला मिळत होते अशा लाभार्थ्यांची नावे या यादीतून कमी करण्यात आलेली असून नवीन नावे सुद्धा समाविष्ट करण्यात आलेली आहे.

 

 

पी एम किसान योजना नवीन यादी कशी पहायची?How to view PM Kisan Yojana New List?

केंद्र शासनाच्या वतीने नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची नवीन यादी पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पीएम किसान सन्मान निधी योजनेची नवीन यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. तुम्ही प्रधानमंत्री योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन सुद्धा ही यादी चेक करू शकतात. पी एम किसान योजना यादी(pm kisan yojna list) पाहण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

1. सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. योजनेची ऑफिशियल वेबसाईट खाली दिलेली आहे.

2. आता या ठिकाणी तुम्हाला benificery list या पर्यायावर जायचं आहे.

3. आता तुम्ही या ठिकाणी तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तुमची तहसील व तुमचे गाव निवडून घ्या.

4. आता get report या पर्यावर क्लिक करा.

5. आता तुमच्या समोर तुमच्या गावाची संपूर्ण नवीन यादी ओपन झालेली आहे त्या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करा.

 

पी एम किसान नवीन यादी पाहण्याची लिंक-

हा विडियो:

पी एम किसान योजना(pm kisan yojna) नवीन यादी संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटत असेल, पी एम किसान नवीन यादी संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून प्रश्न विचारा तुम्हाला असलेल्या प्रश्नांची नक्कीच समाधान आम्ही करू. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.